Showing posts with label ImpPoints2018. Show all posts
Showing posts with label ImpPoints2018. Show all posts

We are Sorry

काही बदल
आम्ही गेले काही दिवस हे अॅप अपडेट करणे बंद केले होते. त्याला मुख्य कारण होते - आम्ही जे करीत होतो ते पूर्णपणे आम्हालाच पटत नव्हते. आमच्या पोस्ट्स चा दर्जा आम्ही नेहमी सांभाळला, परंतु दररोज अपडेट देण्याच्या नादात काही वेळेस फारच कमी महत्वाच्या बाबी देखील समाविष्ट कराव्या लागत होत्या. परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांचा वेळ अनावश्यक अपडेट वर वाया जाणे मनाला पटत नव्हते.

स्पर्धा परीक्षांशी संदर्भातील सर्व पॉप्युलर अॅप्स चा अभ्यास केल्यानंतर आणि स्पर्धा परीक्षांचे सद्यस्थितीची गरज लक्षात घेऊन आम्ही आमच्या अॅप मध्ये काही बदल करत आहोत.

स्पर्धा परीक्षांच्या यशात चालू घडामोडी घटकाचा नक्कीच महत्त्वाचा वाटा असतो. पण याचा अर्थ हा घटक अगदी दररोज आणि अनावश्यक बाबी लक्षात ठेवत तयार करण्याचा नसावा. ह्या घटकाला इतर अन्य घटकाइतकेच महत्त्व दिले जावे आणि इतर घटक तयार करताना चालू घडामोडी मधील चर्चित घटकांच्या अनुषंगाने केलेली तयारी उपयुक्त असेल.

परंतु दुर्दैवाने बहुतांश जण केवळ वृत्तपत्रातील बातम्यांचे संकलन ह्या स्वरूपात ह्या घटकाचे साहित्य उपलब्ध करून देतात. हा 'अनावश्यक भडीमार' चांगल्या बाबी देखील दृष्टीआड करतो.
स्पर्धा परीक्षांसाठी त्या परीक्षेपासून साधारणत: मागील वर्ष दीड वर्ष या कालावधी पर्यंतच्या घटना चालू घडामोडी मध्ये मोडतात.

म्हणून आम्ही यापुढे परीक्षे साठी प्रश्नसंच उपलब्ध करीत आहोत.आता पासून आमचे प्रश्नसंच हे तारखेनुसार नसतील. तर ह्या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षामध्ये उपयुक्त ठरतील असे असतील. हे प्रश्नसंच मे 2017 पासून पुढील सर्व कालावधी एकत्रितपणे विचारात घेऊन अभ्यासांती तयार केले जातील. आशा आहे, हे आपणास आवडतील.

सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या किमान वेळेत जास्तीत जास्त परीक्षाभिमुख तयारीसाठी ते उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.

Read More »

वृत्तपत्र वाचन- एक कला


दररोज तुम्ही वाचत असलेले वृत्तपत्र स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कशा प्रकारे वाचा हे सांगणारा हा लेख.newspaper

A. Avoidअनावश्यक बाबी टाळा. गाव, भोवतालचा प्रदेश, बहुचर्चित (ख्यातनाम ) नसलेल्या व्यक्तींचे विचार, राजकीय खमंग बातम्या, सत्कार, छोटे-मोठे सत्कार, कार्यक्रम, संमेलने आदि बाबी टाळा.
बहुतांश वृत्तपत्रे आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ प्रादेशिक/ जिल्हा/ परिसर किंवा यासमान आशयाची उपशीर्षके प्रत्येक पानावर देतात त्यांचा वापर करून काय वाचायचे आणि काय टाळायचे हे ठरवा.

B. Brief महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त किंवा वरवर वाचा. त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित (Highlight) करा. सोबत ज्या बातम्या सविस्तरपणे वाचणे गरजेचे वाटत आहे त्यांवर खुणा (Marking) करून ठेवा.read news

C. Classic Approach
गल्ली ते दिल्ली दृष्टिकोन ठेवा. मात्र ह्या सर्व बातम्या insplst वर आधारित असावा ह्या नमूद केलेल्या वर्गवारीत त्या बातम्या कोठे मोडतात ते लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती गोळा करा.science

i= International आंतरराष्ट्रीय
n= national राष्ट्रीय
s= sports क्रिडा
p= person चर्चित व्यक्ती
l=location चर्चित स्थळे
st= science & technology विज्ञान-तंत्रज्ञान
उदा: चर्चित व्यक्ती ह्या उपशीर्षकाखाली माहिती गोळा करताना व्यक्ती आणि त्याचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, संबंधित संस्था, पुस्तके, ठळक प्रसंग आदीची नोंद करावी.

D. Details विस्तृतअतिमहत्त्व पूर्ण बातम्या ज्या तुम्ही आधीच खुणा केल्या आहेत, त्या सविस्तरपणे वाचा.

E. Editorial संपादकीयसंपादकीय पाने हि अतिशय काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. त्यांच्यावर सारासार विचार, चर्चा केल्या पाहिजे. तुमचे मत तयार करायला, परीक्षांमधील निबंधां(Esssay)सारख्या बाबींवर पकड घेण्यासाठी या पानांचे वाचन अत्यावश्यक आहे.

F-Finance वित्तवित्त आणि अर्थव्यवस्था ह्या घटकासाठी वेगळ्या प्रकाराची तयारी आवश्यक आहे. महत्त्वाचे मुद्दे 'नोटडाऊन' कराच पण हे करतानाच सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील परिभाषा आणि अनुषंगिक पध्दती यांचा अर्थ योग्य ती संदर्भपुस्तके वापरून समजावून घेतला पाहिजे.

G-Geography & H-History (इतिहास व भूगोल)वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये असलेले चर्चित स्थळे नकाशात कोठे आहेत, त्या भूभागाची वैशिष्ट्य व बातमीवरील त्याचा परिणाम हे नकाशाच्या सहाय्याने समजावून घेतले पाहिजे.
उदा. जम्मू आणि काश्मीर मध्ये प्रलयंकारी पूर आला तर त्या राज्याचा नकाशा पहा, पूरग्रस्त भूभाग शोधा. त्यातील नद्या कोणत्या, त्या कोणत्या महासागराला मिळतात, धरणे कोणती, प्रकल्प कोणते, त्यातील सीमाभागात कोणते आहेत हे समजावून घेतलेच पाहिजे. यासारखेच, इतिहासाच्या अनुषंगाने चर्चित स्थळांचा पूर्वइतिहास काय आहे ह्याचा अभ्यास करा. उदा. पॅलेस्टाईन संघर्ष. पॅलेस्टाईनचे स्थान, त्या संघर्षाची पार्श्वभूमी, इतिहास जाणून घ्या.

I-Internetinternetविकिपीडिया, गुगल ह्या सारख्या संकेतस्थळांचा तुमच्या तयारीत योग्य व मुक्त वापर करा. सुधारित परीक्षा पध्दतीत तुम्ही इंटरनेटला दुर्लक्षित केले तर त्याची किंमत तुम्हाला नक्कीच मोजावी लागु शकते.
Read More »

रोग आणि त्यांमुळे प्रभावित होणारे अवयव

vitamin-D
आजार/रोग प्रभावित होणारा अवयव
कावीळ यकृत
रातांधळेपणा डोळे
रक्तदाब धमनी
गलगंड थॉयरॉइड ग्लँड्स
एक्झिमा त्वचा
टायफॉईड मोठे आतडे
मोतीबिंदू डोळे
हेपाटाइटिस यकृत
पोलियो मज्जासंस्था
ल्युकेमिया रक्त
न्यूमोनिया फुफ्फुसे
क्षयरोग फुफ्फुसे
मलेरिया प्लीहा
human health

Read More »

महाराष्ट्रातील किल्ले


जिल्हा
किल्ले
औरंगाबाद
देवगिरी(दौलताबाद)
उस्मानाबाद
नळदुर्ग
परंडा
sea-fort







रायगड
अवचितगड
उंदेरी
कर्नाळा
कुलाबा
कोथळीगड (पेठचा किल्ला) कोरलई
कौला किल्ला॑
खांदेरी
घोसाळगड
चंदेरी
तळेगड
तुंगी
धक
पेब
प्रबळगड
बिरवाडी
भिवगड
मंगळगड-कांगोरी
मलंगगड
माणिकगड
मानगड॑
रतनगड
रायगड
लिंगाणा
विशाळगड
विश्रामगड
सांकशी
सागरगड
सुरगड
सोनगिरी
मुरुड-जंजिरा


कोल्हापूर
कलानिधीगड
पन्हाळा
पारगड
पावनगड
बावडा
भूधरगड
रांगणा
सामानगड
विशाळगड
अहमदनगर
अहमदनगरचा भुईकोट किल्ला
पेडगावचा बहादूरगड
रतनगड
हरीश्चंद्रगड
Janjira
 अमरावती
गवळीगड(गाविलगड)
गोंदिया
गोंदियाचा प्रतापगड
चंद्रपूर
चंद्रपूरचा किल्ला
बल्लारशा
नंदुरबार
अक्काराणीचा किल्ला
(अक्राणीचा किल्ला)
धुळे
सोनगीरचा किल्ला
raigad

नागपूर
आमनेरचा किल्ला
उमरेडचा किल्ला
गोंड राजाचा किल्ला
नगरधन(रामटेक)(भुईकोट किल्ला)
भिवगड
सिताबर्डीचा किल्ला






रत्नागिरी-सिंधुदुर्ग
अंजनवेल
आंबोळगड
आवर किल्ला
कनकदुर्ग
कुडाळचा किल्ला
कोट कामते
खारेपाटण
गोवळकोट
गोवा
जयगड
दुर्ग रत्नागिरी
देवगड
नांदोशी
निवती
पालगड
पूर्णगड
प्रचितगड
फत्तेगड
बाणकोट
बांदे
भगवंतगड
भरतगड
भवनगड
भैरवगड
मंडणगड
मनसंतोषगड
मनोहरगड
महादेवगड
महिपतगड
यशवंतगड
रसाळगड
राजापूरचा किल्ला
रायगड
विजयगड
विजयदुर्ग-घेरिया
वेताळगड
सर्जेकोट
साठवली
सावंतवाडीचा किल्ला
सिंधुदुर्ग
सुमारगड
सुवर्णदुर्ग





नाशिक
अचलगड
अंजनेरी
अलंग
अहिवंत
इंद्राई
कंक्राळा
कंचना
कण्हेरगड
कऱ्हेगड
कावनई
कुलंग
कोळधेर
गाळणा
घनगड
घारगड
चांदोर
जवळ्या
अंकाई-टंकाई
त्रिंगलवाडी
त्रिंबक
धैर
धोडप
पट्टा
बहुळा
ब्रह्मगिरी
भास्करगड
मार्किंडा
साल्हेर-मुल्हेर
रवळ्या
राजधेर
रामसेज
वाघेरा
वितानगड
हर्षगड
हरगड
हातगड
जळगाव
अमळनेरचा किल्ला
कन्हेरगड
पारोळयाचा किल्ला
बहादरपूर किल्ला
सोलापूर
अक्कलकोटचा भुईकोट
सोलापूरचा भुईकोट







सातारा
अजिंक्यतारा
कमालगड
कल्याणगड
केंजळगड
चंदन
जंगली जयगड
गुणवंतगड
नांदगिरी
प्रचितगड
प्रतापगड
पांडवगड
बहिरवगड
भूषणगड
भोपाळगड
मकरंदगड
मच्छिंद्रगड
महिमंडणगड
महिमानगड
सज्जनगड
संतोषगड
सदाशिवगड
सुंदरगड
वर्धनगड
वंदन
वसंतगड
वारुगड
वैराटगड



पुणे
कुवारी
चाकण
चावंड
जीवधन
तिकोना
तोरणा
तुंग
नारायणगड
पुरंदर
प्रचंडगड (तोरणा)
मल्हारगड
राजगड
राजमाची
विचित्रगड
विसापूर
लोहगड
शिवनेरी
सिंहगड
हडसर

सांगली
तेरदाळ
दोदवाड
मंगळवेढे
शिरहट्टी
श्रीमंतगड
सांगली
येलवट्टी
pratapgarh






ठाणे
अर्नाळा
अलिबाग
अशीरगड
असावगड
इंद्रगड
उंबरगांव
कल्याणचा किल्ला
कामनदुर्ग
काळदुर्ग
केळवे-माहीम
कोंजकिल्ला
गंभीरगड
गुमतारा
गोरखगड
जीवधन
टकमक
ठाणे किल्ला
डहाणू
तांदुळवाडी किल्ला
तारापूर
धारावी
दातिवरे
दिंडू
नळदुर्ग
पारसिक
बल्लाळगड
बळवंतगड
बेलापूर
भवनगड
भैरवगड
भोपटगड
मानोर
माहुली
वररसोवा
वसईचा किल्ला
शिरगांवचा किल्ला
संजान
सिद्धगड
सेगवाह

Read More »

नीती आणि नियोजन आयोगातील 5 महत्त्वाचे फरक

निकष नीती आयोग नियोजन आयोग
राज्यांचा सहभाग राज्यांची नियोजन आयोगात असलेल्या सहभागापेक्षा जास्त व्यापक भूमिका ह्या आयोगात अपेक्षित आहे. पूर्वीच्या नियोजन आयोगात राज्यांना स्थान नव्हते, मात्र नीती आयोगाचे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल सदस्य आहेत. राज्यांचा सहभाग राष्ट्रीय विकास परिषदे पुरता व नियोजन आयोगा सोबत होणाऱ्या वार्षिक बैठकी पुरता मर्यादीत होता.
वित्तीय अधिकार याचे स्वरूप हे सल्लागार यंत्रणेचे आहे. निधी वाटपाचे अधिकार संभवता वित्त मंत्रालयाकडे असतील. नियोजन आयोगाला केंद्राच्या विविध मंत्रालयाना व राज्यांना निधी वाटपाचे अधिकार होते.
पूर्ण वेळ सदस्य या आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य नियोजन आयोगापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. नियोजन आयोगात आठ पूर्ण वेळ सदस्य असत.
अर्धवेळ सदस्य गरजेनुसार मोठ्या प्रमाणावर अर्ध वेळ सदस्यांची नेमणूक केली जाईल. अशा प्रकारच्या अर्ध वेळ सदस्यांची तरतूद नियोजन आयोगात नव्हती.
सदस्य सचिव नीती आयोगाच्या सदस्य सचिवांना CEO अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संबोधले जाईल आणि त्यांची नेमणूक पंतप्रधानांकडून केली जाईल. सदस्य अथवा सदस्य सचिवांची नेमणूक नेहमीच्या पध्दतीने केली जात होती.
niti-vs-plannig
Read More »