काही बदल
आम्ही गेले काही दिवस हे अॅप अपडेट करणे बंद केले होते. त्याला मुख्य कारण होते - आम्ही जे करीत होतो ते पूर्णपणे आम्हालाच पटत नव्हते. आमच्या पोस्ट्स चा दर्जा आम्ही नेहमी सांभाळला, परंतु दररोज अपडेट देण्याच्या नादात काही वेळेस फारच कमी महत्वाच्या बाबी देखील समाविष्ट कराव्या लागत होत्या. परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रांचा वेळ अनावश्यक अपडेट वर वाया जाणे मनाला पटत नव्हते.
स्पर्धा परीक्षांशी संदर्भातील सर्व पॉप्युलर अॅप्स चा अभ्यास केल्यानंतर आणि स्पर्धा परीक्षांचे सद्यस्थितीची गरज लक्षात घेऊन आम्ही आमच्या अॅप मध्ये काही बदल करत आहोत.
स्पर्धा परीक्षांच्या यशात चालू घडामोडी घटकाचा नक्कीच महत्त्वाचा वाटा असतो. पण याचा अर्थ हा घटक अगदी दररोज आणि अनावश्यक बाबी लक्षात ठेवत तयार करण्याचा नसावा. ह्या घटकाला इतर अन्य घटकाइतकेच महत्त्व दिले जावे आणि इतर घटक तयार करताना चालू घडामोडी मधील चर्चित घटकांच्या अनुषंगाने केलेली तयारी उपयुक्त असेल.
परंतु दुर्दैवाने बहुतांश जण केवळ वृत्तपत्रातील बातम्यांचे संकलन ह्या स्वरूपात ह्या घटकाचे साहित्य उपलब्ध करून देतात. हा 'अनावश्यक भडीमार' चांगल्या बाबी देखील दृष्टीआड करतो.
स्पर्धा परीक्षांसाठी त्या परीक्षेपासून साधारणत: मागील वर्ष दीड वर्ष या कालावधी पर्यंतच्या घटना चालू घडामोडी मध्ये मोडतात.
म्हणून आम्ही यापुढे परीक्षे साठी प्रश्नसंच उपलब्ध करीत आहोत.आता पासून आमचे प्रश्नसंच हे तारखेनुसार नसतील. तर ह्या वर्षात होणाऱ्या सर्व परीक्षामध्ये उपयुक्त ठरतील असे असतील. हे प्रश्नसंच मे 2017 पासून पुढील सर्व कालावधी एकत्रितपणे विचारात घेऊन अभ्यासांती तयार केले जातील. आशा आहे, हे आपणास आवडतील.
सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमच्या किमान वेळेत जास्तीत जास्त परीक्षाभिमुख तयारीसाठी ते उपयुक्त ठरतील अशी आशा आहे.