दररोज तुम्ही वाचत असलेले वृत्तपत्र स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी कशा प्रकारे वाचा हे सांगणारा हा लेख.
A. Avoidअनावश्यक बाबी टाळा. गाव, भोवतालचा प्रदेश, बहुचर्चित (ख्यातनाम ) नसलेल्या व्यक्तींचे विचार, राजकीय खमंग बातम्या, सत्कार, छोटे-मोठे सत्कार, कार्यक्रम, संमेलने आदि बाबी टाळा.
बहुतांश वृत्तपत्रे आंतरराष्ट्रीय/ राष्ट्रीय/ प्रादेशिक/ जिल्हा/ परिसर किंवा यासमान आशयाची उपशीर्षके प्रत्येक पानावर देतात त्यांचा वापर करून काय वाचायचे आणि काय टाळायचे हे ठरवा.
B. Brief महत्त्वाच्या बातम्या संक्षिप्त किंवा वरवर वाचा. त्यातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित (Highlight) करा. सोबत ज्या बातम्या सविस्तरपणे वाचणे गरजेचे वाटत आहे त्यांवर खुणा (Marking) करून ठेवा.
C. Classic Approach
गल्ली ते दिल्ली दृष्टिकोन ठेवा. मात्र ह्या सर्व बातम्या insplst वर आधारित असावा ह्या नमूद केलेल्या वर्गवारीत त्या बातम्या कोठे मोडतात ते लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती गोळा करा.
i= International आंतरराष्ट्रीय
n= national राष्ट्रीय
s= sports क्रिडा
p= person चर्चित व्यक्ती
l=location चर्चित स्थळे
st= science & technology विज्ञान-तंत्रज्ञान
उदा: चर्चित व्यक्ती ह्या उपशीर्षकाखाली माहिती गोळा करताना व्यक्ती आणि त्याचे कार्य कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, संबंधित संस्था, पुस्तके, ठळक प्रसंग आदीची नोंद करावी.
D. Details विस्तृतअतिमहत्त्व पूर्ण बातम्या ज्या तुम्ही आधीच खुणा केल्या आहेत, त्या सविस्तरपणे वाचा.
E. Editorial संपादकीयसंपादकीय पाने हि अतिशय काळजीपूर्वक वाचली पाहिजेत. त्यांच्यावर सारासार विचार, चर्चा केल्या पाहिजे. तुमचे मत तयार करायला, परीक्षांमधील निबंधां(Esssay)सारख्या बाबींवर पकड घेण्यासाठी या पानांचे वाचन अत्यावश्यक आहे.
F-Finance वित्तवित्त आणि अर्थव्यवस्था ह्या घटकासाठी वेगळ्या प्रकाराची तयारी आवश्यक आहे. महत्त्वाचे मुद्दे 'नोटडाऊन' कराच पण हे करतानाच सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यातील परिभाषा आणि अनुषंगिक पध्दती यांचा अर्थ योग्य ती संदर्भपुस्तके वापरून समजावून घेतला पाहिजे.
G-Geography & H-History (इतिहास व भूगोल)वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये असलेले चर्चित स्थळे नकाशात कोठे आहेत, त्या भूभागाची वैशिष्ट्य व बातमीवरील त्याचा परिणाम हे नकाशाच्या सहाय्याने समजावून घेतले पाहिजे.
उदा. जम्मू आणि काश्मीर मध्ये प्रलयंकारी पूर आला तर त्या राज्याचा नकाशा पहा, पूरग्रस्त भूभाग शोधा. त्यातील नद्या कोणत्या, त्या कोणत्या महासागराला मिळतात, धरणे कोणती, प्रकल्प कोणते, त्यातील सीमाभागात कोणते आहेत हे समजावून घेतलेच पाहिजे. यासारखेच, इतिहासाच्या अनुषंगाने चर्चित स्थळांचा पूर्वइतिहास काय आहे ह्याचा अभ्यास करा. उदा. पॅलेस्टाईन संघर्ष. पॅलेस्टाईनचे स्थान, त्या संघर्षाची पार्श्वभूमी, इतिहास जाणून घ्या.
I-Internet