Showing posts with label new2018current. Show all posts
Showing posts with label new2018current. Show all posts

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -8


जून 2017 ते सप्टेंबर 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

71. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 सप्टेंबर 2018 रोजी देशभर राबवली जाणाऱ्या कोणत्या नवीन योजनेची सुरुवात केली ?

A. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना
B. स्वच्छता ही सेवा अभियान
C. स्वच्छ भारत सुंदर भारत अभियान
D. प्लास्टिकमुक्त भारत अभियान


Click for answer

B. स्वच्छता ही सेवा अभियान

72. स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत अनुक्रमे कोणते दिवस हे ‘सेवा दिवस’ आणि ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरे केले जाणार आहेत ?

A. 15 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर
B. 17 सप्टेंबर आणि 20 सप्टेंबर
C. 17 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर
D. 20 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर


Click for answer

C. 17 सप्टेंबर आणि 25 सप्टेंबर

73. मानवाधिकारांच्या वैश्विक जाहीरनाम्याचा 70 वा वार्षिक दिन (70th anniversary of the Universal Declaration of Human Rights) कधी साजरा केला गेला ?

A. 1 सप्टेंबर
B. 11 सप्टेंबर
C. 13 सप्टेंबर
D. 15 सप्टेंबर


Click for answer

D. 15 सप्टेंबर

74. जागतिक हवामान कृती शिखर परिषद 2018 (Global Climate Action Summit 2018) 12 ते 14 सप्टेंबर या कालावधीत कोठे पार पडली ?

A. लंडन , युके
B. सनफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका
C. नवी दिल्ली , भारत
D. टोकियो, जपान


Click for answer

B. सनफ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका

75. 12 सप्टेंबर 2018 रोजी झारखंड या राज्याने इलेक्ट्रिक कार चा वापर शासकीय कामासाठी सुरू केला, असे करणारे ते भारतातील पाचवे राज्य ठरले. खालीलपैकी कोणता समूह याआधी अशा प्रकारचा कार चा वापर शासकीय कामासाठी सुरू करणाऱ्या राज्यांचा समूह आहे ?

A. दिल्ली, महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा
B. गुजरात, हरियाणा, तामिळनाडू आणि सिक्कीम
C. राजस्थान , मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब
D. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि कर्नाटक


Click for answer

A. दिल्ली, महाराष्ट्र ,आंध्रप्रदेश आणि तेलंगणा

76. 10 सप्टेंबर 2018 असून देशातील सर्वात जुनी संशोधन अणुभट्टी ‘अप्सरा’ अधिक क्षमतेने सर्व पुन्हा कार्यान्वित करण्यात आली. ही अणुभट्टी खालील पैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ?

A. तुर्भे
B. नरोरा
C. काक्रापार
D. कैगा


Click for answer

A. तुर्भे

77. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या सुधारित परिपत्रकानुसार कर्ज वसुली न्यायाधिकरणाकडे (DRT) प्रकरण दाखल करण्यासाठी किमान आर्थिक मर्यादा दहा लाख रुपयांवरून वाढवून किती करण्यात आली आहे ?

A. 15 लाख रूपये
B. 20 लाख रूपये
C. 25 लाख रूपये
D. 30 लाख रूपये


Click for answer

B. 20 लाख रूपये

78. 16 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2018 या कालावधीत भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान ‘युध्द अभ्यास 2018 ’ हा संयुक्त लढाऊ युद्ध सराव कोणत्या राज्यामध्ये केला जाणार आहे ?

A. अरुणाचल प्रदेश
B. जम्मू आणि काश्मीर
C. राजस्थान
D. उत्तराखंड


Click for answer

D. उत्तराखंड

79. भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान ‘युध्द अभ्यास 2018 ’ भारताकडून कोणती बटालियन सरावात सहभागी होणार आहे ?

A. पंजाब रेजिमेट
B. 15 गढवाल रायफल्स बटालियन
C. मराठा लाईट इंफ्रन्ट्री
D. राजपूत रेजिमेट


Click for answer

B. 15 गढवाल रायफल्स बटालियन

80. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये केलेल्या घोषणेनुसार कोणत्या निवडणुकांमध्ये मतदान पत्रिकेतील ‘ वरीलपैकी कोणीही नाही’ म्हणजेच ‘नोटा’(NOTA) हा पर्याय काढून टाकला आहे ?

A. विधानसभा आणि विधान परिषद
B. राज्यसभा आणि विधान परिषद
C. राज्यसभा आणि लोकसभा
D. लोकसभा आणि विधानसभा


Click for answer

B. राज्यसभा आणि विधान परिषद
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -7


जून 2017 ते सप्टेंबर 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

61. भारताचे पहिले केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या जयंतीदिनी 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे ?

A. तामिळनाडू
B. गुजरात
C. महाराष्ट्र
D. उत्तराखंड


Click for answer

B. गुजरात

या पुतळ्याची उंची तब्बल 182 मीटर असून जगामधील हा सर्वात उंच पुतळा असल्याचा गुजरात सरकारचा दावा आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना हा पुतळा उभारण्याची घोषणा 2013 मध्ये केली होती.

62. 2018 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीचे एकेरीचे विजेतेपद कोणी पटकाविले ?

A. सेरेना विल्यम्स
B. व्हिनस विल्यम्स
C. नाओमी ओसाका
D. सिमोना हालेप


Click for answer

C. नाओमी ओसाका

ग्रॅण्डस्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकाकणारी नाओमी ओसाका ही पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे.

63. समलैंगिकता हा गुन्हा ठरवणारं भारतीय दंडविधानातील 377 हे कलम देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या दिवशी रद्दबातल ठरवले ?

A. 1 सप्टेंबर 2018
B. 6 सप्टेंबर 2018
C. 10 सप्टेंबर 2018
D. 14 सप्टेंबर 2018


Click for answer

B. 6 सप्टेंबर 2018

64. के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून ते पुढील निवडणुकांचा निकाल येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करणार आहेत. ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. कर्नाटक
D. तेलंगणा


Click for answer

D. तेलंगणा

65. न्यायमूर्ती रंजन गोगोई हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत ?

A. 43 वे
B. 44 वे
C. 45 वे
D. 46 वे


Click for answer

D. 46 वे

66. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारताचे राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नियुक्ती करतात ?

A. कलम 124
B. कलम 112
C. कलम 24
D. कलम 224


Click for answer

A. कलम 124

67. एच आय व्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017 याचे मुख्य उद्दिष्ट आहे एड्स ग्रस्त व्यक्तींविरुद्ध भेदभाव प्रतिबंधक कायदा असे आहे, याची अंमलबजावणी कोणत्या दिवसापासून सुरू करण्यात आली ?

A. 8 ऑगस्ट 2018
B. 1 सप्टेंबर 2018
C. 10 सप्टेंबर 2018
D. 15 सप्टेंबर 2018


Click for answer

C. 10 सप्टेंबर 2018

68. एच आय व्ही आणि एड्स (प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा 2017 अनुसार ह्या कायद्याने संरक्षित केलेल्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये द्वेष निर्माण होईल असे कृत्य केल्यास किती शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ?

A. एक वर्षांपर्यंत कैद आणि एक लक्ष रुपये दंड
B. दोन वर्षांपर्यंत कैद आणि एक लक्ष रुपये दंड
C. दोन वर्षांपर्यंत कैद आणि दोन लक्ष रुपये दंड
D. पाच वर्षांपर्यंत कैद आणि पाच लक्ष रुपये दंड


Click for answer

B. दोन वर्षांपर्यंत कैद आणि एक लक्ष रुपये दंड

69. पॉल कॉलिंगवूड क्रिकेटपटूने 13 सप्टेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे ?

A. वेस्ट इंडीज
B. ऑस्ट्रेलिया
C. दक्षिण आफ्रिका
D. इंग्लंड


Click for answer

D. इंग्लंड

70. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन (International Day of Democracy) कधी साजरा केला गेला ?

A. 1 सप्टेंबर
B. 5 सप्टेंबर
C. 10 सप्टेंबर
D. 15 सप्टेंबर


Click for answer

D. 15 सप्टेंबर
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -6


जून 2017 ते सप्टेंबर  2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

51. भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी कोरियातील मोहिमेद्वारे संयुक्त राष्ट्रासंघाच्या शांतिसेनेतील आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती ?

A. 1950
B. 1960
C. 1970
D. 1980


Click for answer

A. 1950

52. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक कोटी कुटुंबाना ‘भामाशाह’ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) महिलांना मोबाइल फोन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे ?

A. तामिळनाडू
B. राजस्थान
C. गुजरात
D. ओडिशा


Click for answer

B. राजस्थान

53. अलीकडे कोणत्या शहरातील माजेरहाट भागातील पूल कोसळल्याने ते चर्चेत होते ?

A. आगरताळा
B. चेन्नई
C. गंगटोक
D. कोलकाता


Click for answer

D. कोलकाता

54. भारताच्या हवाई दलाचे विद्यमान प्रमुख (ऑगस्ट 2018 अखेर) कोण आहेत ?

A. एयर चीफ मार्शल बी. एस. धनोआ
B. एयर चीफ मार्शल अरूप राहा
C. एयर चीफ मार्शल प्रदीप नाईक
D. एयर चीफ मार्शल अनिलकुमार ब्राउन


Click for answer

A. एयर चीफ मार्शल बी. एस. धनोआ

55. मुंबईतील वीजनिर्मिती, पारेषण व वितरण करण्यासंबंधीचा व्यवसाय रिलायन्स एनर्जीने कोणाला विकला आहे ?

A. टाटा पॉवर
B. अदानी ट्रान्समिशन
C. महाजेनको
D. रिलायन्स पॉवर


Click for answer

B. अदानी ट्रान्समिशन

56. 3 ऑक्टोबर 2018 रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहेत ?

A. न्यायमूर्ती रंजन गोगोई
B. न्यायमूर्ती दीपक मिश्रा
C. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर
D. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ


Click for answer

A. न्यायमूर्ती रंजन गोगोई

न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याचे मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

57. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांच्या निधनानंतर कोणाची द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे ?

A. एम. के. अलागिरी
B. एम. के. स्टॅलिन
C. कानिमोझी
D. दुर्गा स्टॅलिन


Click for answer

A. एम. के. स्टॅलिन

58. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसऱ्या स्थानी असलेले बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफे हे पहिल्यांदाच भारतात गुंतवणूक करणार आहेत. ही गुंतवणूक कोणत्या कंपनीत ते करणार आहेत ?

A. अदानी ग्रुप
B. टाटा टेक्नोलॉजी
C. इन्फोसिस
D. पेटीएम


Click for answer

D. पेटीएम

59. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटची (आयआयटीटीएम) शाखा उघडण्यात येणार आहे ?

A. ताडोबा
B. सिंधुदुर्ग-मालवण
C. चंद्रपूर
D. सिंधुदुर्ग


Click for answer

B. सिंधुदुर्ग-मालवण

60. 'सबरीमाला' मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

A. केरळ
B. मध्यप्रदेश
C. उत्तराखंड
D. आसाम


Click for answer

A. केरळ
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -5


जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

41. सॅनिटरी नॅपकीन वरील जीएसटी कर पूर्णपणे मागे घेण्यापूर्वी त्यावर किती टक्के कर आकारला जात होता ?

A. 5 टक्के
B. 12 टक्के
C. 18 टक्के
D. 28 टक्के


Click for answer

B. 12 टक्के

42. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे 2018 चे पावसाळी अधिवेशन कोठे पार पडले ?

A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. औरंगाबाद


Click for answer

C. नागपूर

43. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सामान्यतः मुंबईला होते, परंतु यावर्षी  ते नागपूरला झाले.नागपूरला झालेले हे कितवे पावसाळी अधिवेशन होते ?

A. पहिले
B. चौथे
C. आठवे
D. सतरावे


Click for answer

B. चौथे

44. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्याचा प्रस्ताव कोणत्या  राज्य सरकारने केंद्र सरकार कडे मंजुरीसाठी पाठवला आहे ?

A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. दिल्ली
D. तामिळनाडू


Click for answer

A. पंजाब

45. महाराष्ट्रात किती जिल्हा परिषदा आहेत ?(ऑगस्ट 2018 अखेर)

A. 32
B. 34
C. 36
D. 37


Click for answer

B. 34

46. महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत ?(ऑगस्ट 2018 अखेर)

A. 17
B. 22
C. 27
D. 34


Click for answer

C. 27

47. भारताचे परराष्ट्र व्यवहार मी मंत्री कोण आहेत

A. निर्मला सीतारामन
B. सुषमा स्वराज
C. राजनाथ सिंह
D. सदानंद गौडा


Click for answer

B. सुषमा स्वराज

48. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांचे निधन झाले आहे. त्यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता ?

A. अमेरिका
B. घाना
C. केनिया
D. दक्षिण आफ्रिका


Click for answer

B. घाना

49. संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण महासभेचे माजी महासचिव कोफी अन्नान यांना कोणत्या वर्षाच्या शांततेचा नोबेल पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते ?

A. सन 2001
B. सन 2005
C. सन 2009
D. सन 2014


Click for answer

A. सन 2001

50. पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान ह्यांनी कोणत्या दिवशी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?

A. 14 ऑगस्ट 2018
B. 18 ऑगस्ट 2018
C. 24 ऑगस्ट 2018
D. 28 ऑगस्ट 2018


Click for answer

B. 18 ऑगस्ट 2018
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -4


जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

31. भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) स्थापनेच्या फेरबदल प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता देत या बँकेला किती रूपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे ?

A. 800 कोटी रुपये
B. 1435 कोटी रुपये
C. 4035 कोटी रुपये
D. 14305 कोटी रुपये


Click for answer

B. 1435 कोटी रुपये

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून भारतीय पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) स्थापनेच्या फेरबदल प्रस्तावाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. बँकेला या फेरबदलामुळे 800 कोटी रु. ऐवजी 1 हजार 435 कोटी रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

32. कोणत्या दिवसापासून भारतीय पोस्ट पेमेंट्स बँकेची सेवा 650 पोस्ट ऑफिसमध्ये सुरू करण्यात आली आहे ?

A. 1 जुलै 2018
B. 1 ऑगस्ट 2018
C. 15ऑगस्ट 2018
D. 1 सप्टेंबर 2018


Click for answer

D. 1 सप्टेंबर 2018

उर्वरित 55 लाख पोस्ट ऑफिसमध्ये डिसेंबर 2018 पर्यंत सेवा देण्यात येणार आहे.

33. सन 2017-18 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला ?

A. डॉ.दादा महाराज मनमाडकर
B. जगन्नाथ महाराज नाशिककर
C. रामकृष्ण महाराज लहवितकर
D. डॉ.किसन महाराज साखरे


Click for answer

D. डॉ. किसन महाराज साखरे

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्या वतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

34. सिंधू नदी पाणीवाटप करार कोणत्या देशांदरम्यान झाला आहे ?

A. भारत-बांगलादेश
B. भारत- नेपाळ
C. भारत - पाकिस्तान
D. भारत-श्रीलंका


Click for answer

C. भारत - पाकिस्तान

35. 11 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या काळात 3 लाख सैनिक आणि 1 हजार विमानांसह 'वोस्तोक-2018' या नावाने मोठा युद्धसराव कोणता देश करणार आहे ?

A. अमेरिका
B. रशिया
C. चीन
D. भारत


Click for answer

B. रशिया

1980 च्या दशकानंतरचा रशियाचा हा सर्वात मोठा युद्ध सराव असणार आहे. सन 1981 मध्ये पूर्व युरोपात केलेल्या जापाद-81 या युद्ध सरावासारखाच हा युद्ध सराव असला, तरी त्यापेक्षा मोठया प्रमाणावर असेल. या युद्ध सरावात चीन आणि मंगोलिया हे देशही भाग घेणार आहेत

36. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या अध्यक्षपदी जुलै 2018 मध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

A. न्या. आदर्श कुमार गोयल
B. न्या. लोकेश्वरसिंग पंत
C. न्या. स्वतंत्र कुमार
D. न्या. दीपक मिश्रा


Click for answer

A. न्या. आदर्श कुमार गोयल

37. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?

A. डेहराडून
B. आगरताळा
C. नवी दिल्ली
D. पुणे


Click for answer

C. नवी दिल्ली

38. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची (National Green Tribunal -NGT) स्थापना कधी करण्यात आली ?

A. 18 ऑक्टोबर 2010
B. 10 ऑक्टोबर 2012
C. 1 ऑक्टोबर 2013
D. 2 ऑक्टोबर 2016


Click for answer

A. 18 ऑक्टोबर 2010

39. सर्वात अलीकडे म्हणजे डिसेंबर 2016 मध्येझालेली हार्ट ऑफ एशिया परिषद कोठे संपन्न झाली ?

A. इस्लामाबाद
B. दुबई
C. कॅन्डी (श्रीलंका)
D. अमृतसर


Click for answer

D. अमृतसर

40. देशात 500 आणि 1 हजार रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा म्हणजे नोटाबंदीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केली होती ?

A. 8 मार्च 2016
B. 8 नोव्हेंबर 2016
C. 8 मार्च 2017
D. 8 नोव्हेंबर 2017


Click for answer

B. 8 नोव्हेंबर 2016
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -3


जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

21. दिवंगत प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना कोणत्या वर्षी ‘पद्मश्री ’पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?

A. 2003
B. 2008
C. 2013
D. 2016


Click for answer

C. 2013

22. 2017–18 ची रणजी चषक स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

A. मुंबई
B. बडोदा
C. दिल्ली
D. विदर्भ


Click for answer

D. विदर्भ

23. आजवरच्या रणजी चषक स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदांचा मान कोणत्या संघाने पटकाविला आहे ?

A. मुंबई
B. उर्वरित महाराष्ट्र
C. दिल्ली
D. विदर्भ


Click for answer

A. मुंबई

24. 2017–18ची रणजी चषक स्पर्धा विदर्भाच्या संघाने जिंकली. विदर्भाच्या संघाचे रणजी चषक स्पर्धेतील हे किती विजेतेपद होते ?

A. पहिले
B. पाचवे
C. सतरावे
D. पन्नासावे


Click for answer

A. पहिले

25. महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत फळबागांची लागवड वाढविण्यासाठी कोणाच्या नावाने फळबाग लागवड म्हणता सुरू केली आहे ?

A. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
B. माजी कृषिमंत्री भाऊसाहेब ( पांडुरंग) फुंडकर
C. कर्मवीर दादासाहेब गायकवाड
D. कृषी तज्ञ एम.एस. स्वामीनाथन


Click for answer

B. माजी कृषिमंत्री भाऊसाहेब ( पांडुरंग) फुंडकर

26. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने किती सरकारी आणि किती खासगी संस्थांना प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचा म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स चा दर्जा दिला ?

A. 6 सरकारी आणि 3 खासगी
B. 5 सरकारी आणि 10 खासगी
C. 3 सरकारी आणि 6 खासगी
D. 3 सरकारी आणि 3 खासगी


Click for answer

D. 3 सरकारी आणि 3 खासगी

27. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने खालीलपैकी कोणत्या अध्यक्षतेखाली प्रतिष्ठित शिक्षण संस्थांचा म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स चा दर्जा देण्यासाठी संस्थांची निवड करण्याकरता करण्यात केली होती ?

A. विख्यात संशोधक रघुनाथ माशेलकर
B. अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष अनिल काकोडकर
C. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी
D. प्रख्यात संगणक तज्ज्ञ विजय भटकर


Click for answer

C. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी

28. सन 2018 च्या पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये ____ पद्मविभूषण , _______ पद्मभूषण आणि ______ पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे.

A. 9,29,77
B. 3,9,73
C. 73,9,3
D. 1,1,9


Click for answer

B. 3,9,73

29. 2018-19 चा केंद्रीय अर्थसंकल्प अरुण जेटली कोणत्या दिवशी संसदेत सादर केला ?

A. 1 जानेवारी 2018
B. 1 फेब्रुवारी 2018
C. 28 फेब्रुवारी 2018
D. 31 डिसेंबर 2017


Click for answer

B. 1 फेब्रुवारी 2018

30. महाराष्ट्रात ऑगस्ट 2018 अखेरीस किती जिल्हा परिषदा आहेत ?

A. 36
B. 34
C. 30
D. 124


Click for answer

B. 34
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -2


जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

11. मॅगसेसे पुरस्कार दरवर्षी कोणत्या दिवशी दिले जातात ?

A. 1 जानेवारी
B. 1 एप्रिल
C. 31 ऑगस्ट
D. 10 डिसेंबर


Click for answer

C. 31 ऑगस्ट

12. सप्टेंबर 2018 मध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन कोणाच्या अध्यक्षतेखाली संयुक्त अरब अमीरात येथे होणार आहे ?

A. डॉ. अभय बंग
B. लक्ष्मीकांत देशमुख
C. भूषण गोखले
D. किर्ती शिलेदार


Click for answer

C. भूषण गोखले

13. फिफा विश्वचषक स्पर्धा 2018 कोणत्या संघाने जिंकली ?

A. क्रोएशिया
B. फ्रान्स
C. इंग्लंड
D. ब्राझिल


Click for answer

B. फ्रान्स

14. फुटबॉलचा फिफा विश्वचषक फ्रान्सच्या संघाने आजवर किती वेळेस जिंकला आहे?

A. एक
B. दोन
C. चार
D. सहा


Click for answer

B. दोन

15. 2018 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक वैयक्तिक गोल नोंदवत गोल्डन बुट पुरस्कार कोणी जिंकला ?

A. हॅरी केन
B. अँटोइन ग्रीझमन
C. लुका मॉडरिच
D. कालियान एमबाप्पे


Click for answer

A. हॅरी केन

16. 2018 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत गोल्डन बॉल पुरस्काराचा मानकरी कोण ठरले ?

A. हॅरी केन
B. अँटोइन ग्रीझमन
C. लुका मॉडरिच
D. कालियान एमबाप्पे


Click for answer

C. लुका मॉडरिच

17. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. एन. के. सिंग
B. एन. के.राजन
C. एन. के.मिश्रा
D. एन. के.त्यागी


Click for answer

A. एन. के. सिंग

18. देशातील पहिले ‘हनी पार्क’ कोठे उभारण्यात येणार आहे ?

A. पाचगणी
B. महाबळेश्वर
C. भंडारा
D. तोरणमाळ


Click for answer

B. महाबळेश्वर

19. संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणता दिन हा ‘मधमाशा दिन’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे ?

A. 20 जानेवारी
B. 20 मार्च
C. 20 मे
D. 20 सप्टेंबर


Click for answer

C. 20 मे

20. प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबई येथे कधी निधन झाले ?

A. 24 जानेवारी 2018
B. 24 फेब्रुवारी 2018
C. 24 मार्च 2018
D. 24 मे 2018


Click for answer

B. 24 फेब्रुवारी 2018
Read More »

चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -1


जून 2017 ते ऑगस्ट 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. नोबेल पुरस्कारविजेते लेखक व्ही.एस. नायपॉल यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. कोणत्या वर्षाच्या साहित्याच्या नोबेल पारितोषिकाने त्यांना सन्मानित करण्यात आले होते ?

A. सन 2017
B. सन 2011
C. सन 2006
D. सन 2001


Click for answer

D. सन 2001

2. देश आणि राज्यातील पहिला इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल अर्थात किटक आणि जैव विविधता महोत्सव कोठे पार पडला ?

A. भोर जि. पुणे
B. अक्राणी महल जि. नंदुरबार
C. त्र्यंबकेश्वर रोड, अंजनेरी, नाशिक
D. उमठा ता.नरखेड जि.नागपूर


Click for answer

C. त्र्यंबकेश्वर रोड, अंजनेरी, नाशिक

3. 2018 यावर्षी पाणी फौंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोणत्या गावाने विजेतपद पटकावून 75 लाखाचे बक्षीस मिळवले ?

A. टाकेवाडी ता.माण जि.सातारा
B. भांडवली ता.माण जि.सातारा
C. सिंदखेड ता.मोताळा जि.बुलढाणा
D. आनंदवाडी ता.आष्टी जि.बीड


Click for answer

A. टाकेवाडी ता.माण जि.सातारा

4. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्‍ती करण्यात आली आहे ?

A. विजया रहाटकर
B. रेखा शर्मा
C. ललिता कुमारमंगलम
D. स्मृती नारायण कक्कड


Click for answer

B. रेखा शर्मा

5. आत्रेय आणि चौरंग, मुंबई यांच्यावतीने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा 'साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह' पुरस्कार यंदा(2018) कोणाला प्रदान करण्यात आला ?

A. प्रशांत दामले
B. विजय कदम
C. द.मा.मिरासदार
D. असाराम लोमटे


Click for answer

C. द.मा.मिरासदार

6. 2018 यावर्षी कोणत्या विषयातील नोबेल पारितोषिक दिले जाणार नाही ?

A. साहित्य
B. पदार्थविज्ञान
C. रसायनशास्त्र
D. वैद्यकशास्त्र


Click for answer

A. साहित्य

7. 2018 या वर्षीचा मॅगसेसे पुरस्कार किती जणांना जाहीर झाला आहे ?

A. दोन
B. चार
C. सहा
D. दहा


Click for answer

C. सहा

8. 2018 या वर्षीच्या मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये सोनम वांगचुक आणि ________________ या दोन भारतीयांचा समावेश आहे.

A. अरविंद केजरीवाल
B. भरत वाटवाणी
C. अरविंद गुप्ता
D. टी. एम. कृष्णा


Click for answer

B. भरत वाटवाणी

9. 2018 या वर्षीचे मॅगसेसे पुरस्कार विजेते भरत वाटवाणी हे मुंबईतील मानसोपचार तज्ञ असून त्यांनी मुलांवर उपचार करण्यासाठी त्यांनी 1988 साली कोणते केंद्र स्थापन केले ?

A. कामयाब पुनर्वसन केंद्र
B. श्रध्दा पुनर्वसन केंद्र
C. प्रयास पुनर्वसन केंद्र
D. हमारा निवारा


Click for answer

B. श्रध्दा पुनर्वसन केंद्र

10. कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या नावे सन 1957 पासून मॅगसेसे पुरस्कार दिले जातात ?

A. फिलिपाईन्स
B. कंबोडिया
C. कॅनडा
D. व्हिएतनाम


Click for answer

A. फिलिपाईन्स
Read More »