चालू घडामोडी
चालू घडामोडी सराव प्रश्नसंच -6
जून 2017 ते सप्टेंबर 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018आणि मार्च 2019 पर्यंत होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडी घटकाचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त मालिका
51. भारताने सर्वप्रथम कोणत्या वर्षी कोरियातील मोहिमेद्वारे संयुक्त राष्ट्रासंघाच्या शांतिसेनेतील आपल्या प्रवासाला सुरूवात केली होती ?
A. 1950
B. 1960
C. 1970
D. 1980
Click for answer
A. 1950
52. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक कोटी कुटुंबाना ‘भामाशाह’ योजनेतंर्गत दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) महिलांना मोबाइल फोन देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे ?
A. तामिळनाडू
B. राजस्थान
C. गुजरात
D. ओडिशा
Click for answer
B. राजस्थान
53. अलीकडे कोणत्या शहरातील माजेरहाट भागातील पूल कोसळल्याने ते चर्चेत होते ?
A. आगरताळा
B. चेन्नई
C. गंगटोक
D. कोलकाता
Click for answer
D. कोलकाता
54. भारताच्या हवाई दलाचे विद्यमान प्रमुख (ऑगस्ट 2018 अखेर) कोण आहेत ?
A. एयर चीफ मार्शल बी. एस. धनोआ
B. एयर चीफ मार्शल अरूप राहा
C. एयर चीफ मार्शल प्रदीप नाईक
D. एयर चीफ मार्शल अनिलकुमार ब्राउन
Click for answer
A. एयर चीफ मार्शल बी. एस. धनोआ
55. मुंबईतील वीजनिर्मिती, पारेषण व वितरण करण्यासंबंधीचा व्यवसाय रिलायन्स एनर्जीने कोणाला विकला आहे ?
A. टाटा पॉवर
B. अदानी ट्रान्समिशन
C. महाजेनको
D. रिलायन्स पॉवर
Click for answer
B. अदानी ट्रान्समिशन
56. 3 ऑक्टोबर 2018 रोजी भारताच्या सरन्यायाधीशपदी कोण विराजमान होणार आहेत ?
A. न्यायमूर्ती रंजन गोगोई
B. न्यायमूर्ती दीपक मिश्रा
C. न्यायमूर्ती जे. चेलमेश्वर
D. न्यायमूर्ती कुरियन जोसेफ
Click for answer
A. न्यायमूर्ती रंजन गोगोई
न्या. गोगोई हे आसाममधील असून सध्या त्यांच्यावर एनसीआर (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन) अपडेट करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याचे मॉनिटरिंग करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
57. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री दिवंगत करुणानिधी यांच्या निधनानंतर कोणाची द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे ?
A. एम. के. अलागिरी
B. एम. के. स्टॅलिन
C. कानिमोझी
D. दुर्गा स्टॅलिन
Click for answer
A. एम. के. स्टॅलिन
58. जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये तिसऱ्या स्थानी असलेले बर्कशायर हॅथवेचे अध्यक्ष वॉरेन बफे हे पहिल्यांदाच भारतात गुंतवणूक करणार आहेत. ही गुंतवणूक कोणत्या कंपनीत ते करणार आहेत ?
A. अदानी ग्रुप
B. टाटा टेक्नोलॉजी
C. इन्फोसिस
D. पेटीएम
Click for answer
D. पेटीएम
59. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणाऱ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टूरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंटची (आयआयटीटीएम) शाखा उघडण्यात येणार आहे ?
A. ताडोबा
B. सिंधुदुर्ग-मालवण
C. चंद्रपूर
D. सिंधुदुर्ग
Click for answer
B. सिंधुदुर्ग-मालवण
60. 'सबरीमाला' मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
A. केरळ
B. मध्यप्रदेश
C. उत्तराखंड
D. आसाम
Click for answer
A. केरळ
Newer Post
Older Post
Home