विज्ञान प्रश्नसंच -17


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित

1. मूलद्रव्याने अल्फा कण बाहेर टाकल्यास नवीन मूलद्रव्याचा अणुक्रमांक हा पूर्वीच्या मूलद्रव्याच्या अणुक्रमांका ____________________________ .

A. पेक्षा जास्त असतो
B. पेक्षा कमी असतो
C. इतकाच असतो
D. पेक्षा दोनपटीने वाढतो


Click for answer

B. पेक्षा कमी असतो

2. कांदा ही ______________वनस्पती आहे.

A. एकबीजपत्री
B. द्विबीजपत्री
C. नेचोद्भिदी
D. अनावृत्तबीजी


Click for answer

A. एकबीजपत्री

3. खालीलपैकी कोणामध्ये श्वसन त्वचेद्वारे किंवा बाह्यआवरणाद्वारे (त्वकश्वसन) केले जात नाही ?

A. अळ्या
B. बेडूक
C. पक्षी
D. गांडूळ


Click for answer

C. पक्षी

4. सरीसृप, सस्तनी प्राणी, उभयचर प्राणी व पक्ष्यांमध्ये सामान्यतः खालीलपैकी कोणत्या प्रकारचे श्वसन आढळते ?

A. त्वकश्वसन
B. श्वासनली श्वसन
C. क्लोम श्वसन
D. फुप्फुसी श्वसन


Click for answer

D. फुप्फुसी श्वसन

5. प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन होण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

A. विनॉक्सीश्वसन
B. प्रकाश संश्लेषण
C. प्रकाशीय विघटन
D. ग्लुकोज विघटन


Click for answer

B. प्रकाश संश्लेषण

6. श्वसनासाठी मासे कशाचा उपयोग करतात ?

A. त्वचा
B. फुप्फुस
C. कल्ला
D. श्वासनली


Click for answer

C. कल्ला

7. खालीलपैकी कशाला पेशींची ऊर्जा केंद्रे म्हणतात ?

A. तंतूकणिका
B. हरीतलवक
C. गॉल्गी संकुल
D. केंद्रक


Click for answer

A. तंतूकणिका

8. सामान्यपणे मानवी शरीराचे तापमान किती असते ?

A. 370C
B. 250C
C. 920C
D. 160C


Click for answer

A. 370C

9. मानवी ह्रदय किती कप्प्यांमध्ये विभागलेले असते ?

A. तीन
B. एक
C. चार
D. दोन


Click for answer

C. चार

10. खालीलपैकी काय ह्रदयाकडून शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त वाहून नेतात ?

A. शिरा
B. केशिका
C. धमन्या
D. वरील सर्व


Click for answer

C . धमन्या