चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -6 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) 5 जुलै 2018 रोजी कसली यशस्वी चाचणी घेतली ?

A. GSAT-6A चे प्रक्षेपण
B. चांद्रयान -2 साठीचे नियोजित प्रक्षेपकाची
C. PSLV-C40 व्दारा एकदाच 31 उपग्रहांचे प्रक्षेपण
D. क्रू एस्केप सिस्टीम


Click for answer

D. क्रू एस्केप सिस्टीम

मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीचाच एक भाग असलेल्या 'क्रू एस्केप सिस्टीम'ची म्हणजेच अवकाशवीरांना आणीबाणीच्या क्षणी सुखरूप जमिनीवर आणण्याची चाचणी 'इस्रो'ने यशस्वी केली. या यंत्रणेच्या चाचणीमालिकेतील ही पहिलीच परीक्षा होती.

मानवी अवकाश मोहिमेत प्रेक्षपणानंतर यानात काही बिघाड झाल्यास ही मुक्तता यंत्रणा कार्यान्वित होते व अवकाशयानाचा एक भाग अंतराळवीरांसह प्रक्षेपकापासून दूर जातो. हे क्रू मोड्युल म्हणजेच अवकाशयानाचा मुख्य भाग अंतराळवीरांसह नंतर जमिनीवर आणला जातो.

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन केंद्रावरून ही चाचणी घेण्यात आली. 259 सेकंद चाललेल्या या चाचणीमध्ये सर्व बाबी यशस्वी आणि ठरवल्याप्रमाणे झाल्या.

सध्या केवळ अमेरिका, रशिया व चीननेच मानवी अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत.

इस्रोचे चेअरमन के. सिवान

2. नुकताच दक्षिण मुंबईतील 19 व्या शतकातील "व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको इमारतींचा" जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. हे स्थळ जागतिक युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेले भारतातील कितवे स्थळ ठरले ?

A. 35 वे
B. 37 वे
C. 39 वे
D. 41 वे


Click for answer

B. 37 वे

बहरीन मधील मनामा येथे युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 42 व्या सत्रात हा निर्णय घेण्यात आला.

जागतिक वारसा समितीच्या शिफारशीनुसार भारताने "मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारतीं" असे नामकरण स्वीकारले आहे.

3. निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत नागरिकांना माहिती देता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे ?

A. किमिस
B. रियुनाइट
C. सीविजिल
D. निर्वाचन


Click for answer

C. सीविजिल

निवडणुकांदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्याची त्वरित माहिती नागरिकांना आयोगाला कळवता यावी यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत आणि निवडणूक आयुक्त सुनील मटोरा आणि अशोक लवासा यांनी 'civigil' हे मोबाईल ॲप सुरू केले. हे ॲप वापरण्यास सुलभ असून ॲन्ड्रॉईड ॲप्लिकेशनवर चालते.

4. कोणत्या न्यायालयाने नुकतेच पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक जनावराला व्यक्तीचा दर्जा देण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत ?

A. मुंबई
B. मध्यप्रदेश
C. उत्तराखंड
D. उत्तरप्रदेश


Click for answer

C. उत्तराखंड

हवा, पाणी आणि जमिनीवर राहणारे विविध पशू, पक्षी आणि जलचर प्रजातींना न्यायालयाने कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे.

न्यायालयाने त्यासोबत जनावरांच्या सुरक्षा आणि संरक्षणाला लक्षात घेता सगळ्या जनावरांना मनुष्यांप्रमाणेच अधिकार, कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देण्याचे म्हटले आहे. त्यासोबत नगर पंचायत बनबसाला नेपाळहून भारतात येणाऱ्या घोड्यांसाठी आरोग्य तपासणी करण्यासाठी सीमाभागात पशू रुग्णालय सुरू करण्यासाठी आदेश दिले आहेत.

त्याचबरोबर सरकार जनावरांच्या मदतीने वाहिले जाणारे सामान देखील ठरवणार आहे. जनावरांना उष्ण तापमान असताना कामाला लावू नये, असेही निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.

तसेच सर्व नगरपालिकांनी जनावरांसाठी शेल्टर बांधण्यास सांगितले आहे.

5. कोणत्या परदेशी बँकेला नुकतीच भारतात आपली शाखा सुरू भारतीय रिझर्व बॅंकेने परवानगी दिली आहे ?

A. स्टँडर्ड चार्टर्ड
B. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बॅंक ऑफ चायना
C. सॉफ्ट बँक
D. बॅंक ऑफ चायना


Click for answer

D. बॅंक ऑफ चायना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात झालेल्या वुहान आणि चिंगदाओ येथील भेटींदरम्यानही दोन देशांतील आर्थिक सहकार्य मजबूत करण्याबाबत सहमती झाली होती. या अनुषंगाने ही परवानगी दिली गेली.

या बँकेची पहिली शाखा मुंबई मध्ये सुरु होणार आहे.

बॅंक ऑफ चायनाने जुलै 2016 मध्ये भारतात शाखा खोलण्यासाठी अर्ज केला होता. मात्र डोकलाम तणावामुळे तो मागे पडला होता.

100 वर्षांपेक्षाही जुनी असलेल्या बॅंक ऑफ चायनाचे भांडवल सुमारे 158 अब्ज डॉलर्स आहे. या बँकेवर इस्त्रायलवर सतत दहशतवादी हल्ले करणाऱ्या हमास या संघटनेला फंडिंग केल्याचा आरोप होता मात्र चीन सरकारने तो फेटाळून लावला होता.

बँक ऑफ चायनाच्या आगमनानंतर भारतात व्यवसाय करणाऱ्या विदेशी बँकांची संख्या 46 वर गेली आहे.

युकेची स्टँडर्ड चार्टर्ड हि भारतातील सर्वाधिक 100 शाखा असणारी विदेशी बँक आहे.बॅंक ऑफ चायना ही भारतात प्रवेश करणारी चीनची दुसरी बॅंक आहे. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बॅंक ऑफ चायना (आयसीबीसी) ची एक शाखा मुंबईत 2011 पासून चालू आहे.

भारतातील स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या दोन शाखा शांघाय आणि तियानजिन येथे आहेत. बॅंक ऑफ बडोदा, कॅनरा बॅंक, आयसीआयसीआय आणि ऍक्‍सिस बॅंक यांच्याही एक एक शाखा चीनमध्ये चालू आहेत.

6. त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे काय नामकरण करायला नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे ?

A. बिरसा मुंडा विमानतळ
B. बिजू पटनायक विमानतळ
C. महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ
D. लाल बहादूर शास्त्री विमानतळ


Click for answer

C. महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने त्रिपुरातील आगरतळा विमानतळाचे महाराजा वीर विक्रम माणिक्य किशोर विमानतळ, आगरतळा असे नामकरण करायला मंजुरी दिली आहे.

7. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने अलीकडेच कोणत्या ई-मार्केटींग प्रणालीचा शुभारंभ केला ?

A. किमिस
B. फॅब इंडिया
C. ई-खादी
D. स्वदेशी


Click for answer

A. किमिस

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने नवी दिल्लीत ‘खादी इन्स्टिट्यूशन मॅनेजमेंट ॲण्ड इन्फरमेशन सिस्टीम (किमिस)’ या ई-मार्केटींग प्रणालीचा शुभारंभ केला. खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांच्या खरेदी आणि विक्रीसाठी देशभरातून कुठूनही ही प्रणाली वापरता येईल. खादी आणि ग्रामोद्योगच्या 480 संस्था आणि दालने या प्रणालीशी जोडण्यात आली आहे.

8. केंद्र सरकारने नुकतेच केंद्र सरकारने खरीप हंगामातील किती पिकांच्या हमीभावात दीडपटीनं वाढ केली ?

A. 10
B. 14
C. 24
D. 33


Click for answer

B. 14

9. कर्नाटक राज्य सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

A. बुक्कनाकेरे सिद्धलिंगप्पा येडियुरप्पा
B. जी. परमेश्वरा
C. एचडी कुमारस्वामी
D. एचडी देवेगौडा


Click for answer

C. एचडी कुमारस्वामी

पहिल्या टप्प्यात 31 डिसेंबर 2017 पर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी हे कर्ज फेडले असेल त्यांना सरकार प्रोत्साहन भत्ता किंवा 25 हजार रुपये आर्थिक मदत देणार आहे.

तसेच राज्यातील इंदिरा कँटीनला मिळणारा प्रतिसाद पाहून राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यात 247 कँटीन उघडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

10. जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळाविरोधी लढा दिन (World Day to Combat Desertification and Drought) कधी साजरा केला जातो ?

A. 17 जून
B. 22 जून
C. 30 जून
D. 5 जुलै


Click for answer

A. 17 जून

यावर्षीची मुख्य संकल्पना (Theme)" Land has true value. Invest in it" ही होती.

वर्ल्ड अॅटलस ऑफ डेजर्टीफिकेशनने दिलेल्या अहवालानुसार प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने, भारत हा कृषीप्रधान देश असला तरी भारतात 2050 पर्यंत धान्याचा तुटवडा जाणवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.