चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -7 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणत्या राज्यसरकारने राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची आता मादक द्रव्य चाचणी (डोप टेस्ट) घेण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. पंजाब
B. महाराष्ट्र
C. गोवा
D. तामिळनाडू
Click for answer
A. पंजाब
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीपासून पुढील प्रत्येक टप्प्यावर ही चाचणी होणार आहे. या चाचणीत पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश असणार आहे. मुख्य सचिवांना याचे तपशील ठरवून त्या संदर्भात अधिसूचना जाहीर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
पंजाबमध्ये मादक द्रव्यांचा व्यापार आणि त्यांचा प्रसार रोखण्यासाठी तेथील राज्य सरकारने कंबर कसली आहे.
2. संयुक्त जनता दलातून फुटून बाहेर पडलेल्या गटाचे नेते शरद यादव यांनी स्वतःचा नवीन राजकीय पक्ष स्थापन केला आहे. त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे ?
A. जनता दल युनायटेड
B. लोकतांत्रिक जनता दल
C. बिहार जनता दल
D. हमारा बिहार
Click for answer
B. लोकतांत्रिक जनता दल
3. देशाच्या जवळपास 50 कोटी जनतेला आरोग्य विम्याच्या छत्राखाली आणण्याचे लक्ष समोर ठेवत केंद्र सरकार कोणती आरोग्य विमा योजना प्रत्यक्षात आणण्याचा विचार करीत आहे ?
A. भारतीय विमा योजना
B. सुश्रुत आरोग्य विमा योजना
C. पंडित दीनदयाळ उपाध्याय आरोग्य विमा योजना
D. आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना
Click for answer
D. आयुष्मान भारत आरोग्य विमा योजना
येत्या 15 ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. भारतामध्ये आरोग्य सुविधा या राज्य सरकारे चालवितात.
पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसारख्या राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांकडून भाजपला यामुळे विरोध होण्याची शक्यता आहे.
4. वादग्रस्त मुस्लीम धर्मगुरू व इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा संस्थापक झाकीर नाईक प्रत्यार्पणास कोणत्या देशाने नकार दिला आहे ?
A. इंडोनेशिया
B. मलेशिया
C. सौदी अरेबिया
D. ब्रिटन
Click for answer
B. मलेशिया मलेशियाचे पंतप्रधान महातीर बिन मोहम्मद
5. माथेरान मिनी ट्रेनच्या 111 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणत्या महिलेने साहाय्यक चालक म्हणून काम केले ?
A. सुनिता यादव
B. शुभांगी खोब्रागडे
C. शामल पाटील
D. शंकुतला त्रिवेदी
Click for answer
B. शुभांगी खोब्रागडे
6. पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
A. अरविंद केजरीवाल
B. व्ही. नारायणसामी
C. अनिल बैजल
D. पेमा खंडू
Click for answer
B. व्ही. नारायणसामी
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच सत्ता चालेल, असा आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर दिल्लीसंदर्भातील हा निकाल पुदुच्चेरीतही लागू करण्याची आपली इच्छा असल्याचे नारायणसामी यांनी म्हटल्याने ते चर्चेत आहेत.
7. राजस्थान सरकारने गुर्जर समाजासह इतर पाच जातींना अतिमागास प्रवर्गांतर्गत किती टक्का आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे ?
A. एक
B. पाच
C. अडीच
D. चार
Click for answer
A. एक
ज्यामध्ये गुर्जर, गाडरिया, रेबारी, गाडिया लोहार आणि बंजारा यांचा समावेश आहे.
आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास 7 जुलैला जयपूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीमध्ये निदर्शने करण्याचा इशारा गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने राजस्थान सरकारला दिला होता.
8. 'हमीद दलवाई : द अनसंग ह्युमॅनिस्ट' ह्या माहितीपटाचे दिग्दर्शन कोणी केले आहे ?
A. नसिरुद्दीन शाह
B. जब्बार पटेल
C. ज्योती सुभाष
D. रवी जाधव
Click for answer
C. ज्योती सुभाष
माहितीपटात नसिरुद्दीन शाह सूत्रधाराच्या आणि डॉ. हमीद दाभोलकर व अमृता सुभाष हे दोघे सहसूत्रधाराच्या भूमिकेत आहेत.
9. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या निर्णयानुसार राज्यांचे पोलिस महासंचालक निवडताना तीन सर्वाधिक पात्र उमेदवारांची यादी कोण तयार करणार ?
A. केंद्रीय लोकसेवा आयोग
B. राज्य लोकसेवा आयोग
C. राज्य सरकार
D. केंद्र सरकार
Click for answer
A. केंद्रीय लोकसेवा आयोग
राज्यांचे पोलिस महासंचालक निवडण्याचे अधिकार यापुढे राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडे नसणार आहेत. देशातील पोलिस दलांतील सुधारणांबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली.
त्यात महासंचालक निवडीबाबतच्या सुधारणेचाही समावेश आहे. यापुढे राज्य सरकारे वा केंद्रशासित प्रदेशांनी पोलिस महासंचालक वा पोलिस आयुक्तपदासाठी संभाव्य अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (यूपीएससी) पाठवावीवत, असे निर्देश खंडपीठाने दिले आहे. त्यानंतर यूपीएससी तीन सर्वाधिक पात्र उमेदवारांची यादी तयार करेल. त्यातील कोणाचीही निवड करण्याचे स्वातंत्र्य राज्यांना असेल.
10. एअर इंडियाचे मुख्यालय कोठे आहे ?
A. दिल्ली
B. मुंबई
C. चेन्नई
D. बेंगळूरू
Click for answer
B. मुंबई
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील 23 मजली एअर इंडियाचे मुख्यालय केंद्र सरकारने विक्रीला काढले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला हे मुख्यालय विकण्यासाठी केंद्र सरकार विचार करीत आहे.
एअर इंडिया आर्थिक संकटात सापडल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Newer Post
Older Post
Home