विज्ञान प्रश्नसंच -13


विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित.

1. ऑक्सिश्वसनामध्ये -------- चे पूर्ण ऑक्सिडीकरण होते .

A. प्रथिने
B. ग्लुकोज
C. लॅक्टीक आम्ले
D. इथिल अल्कोहोल


Click for answer

B. ग्लुकोज

2. खालीलपैकी नर मानवाची लिंग गुणसूत्रे कोणती ?

A. XX
B. YO
C. XO
D. XY


Click for answer

D. XY

3. म्यूकर हे________________ कवक आहे .

A. मृतोपजीवी
B. स्वयंपोषित
C. परजीवी
D. सहजीवी


Click for answer

A . मृतोपजीवी

4. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन किती असते ?

A. 500 ते 600 ग्रॅम
B. 1300 ते 1400 ग्रॅम
C. 2000 ते 2100 ग्रॅम
D. 2500 ते 2600 ग्रॅम


Click for answer

B. 1300 ते 1400 ग्रॅम

5. इथिलीन वायू __________________ शी निगडीत आहे .

A. बीजांकुरण
B. पेशी विभाजन
C. वृद्धत्व
D. पेशी प्रवर्धन


Click for answer

C. वृद्धत्व

6. मानवी मेंदूचे तीन प्रमुख भाग आहेत . खालीलपैकी कोणता एक मानवी मेंदूचा प्रमुख भाग नाही ?

A. मेरूरज्जू
B. मस्तिष्कपुच्छ
C. अनुमस्तिष्क
D. प्रमस्तिष्क


Click for answer

A. मेरूरज्जू

7. 'इंडोल ब्युटीरीक आम्ल'(IBA) हे कोणत्या प्रकारचे संप्रेरक आहे ?

A. जिब्बरलिन्स
B. सायटोकायनिन्स
C. ऑक्झिन्स
D. अॅबसिसिक आम्ले


Click for answer

C. ऑक्झिन्स

8. उंटासारख्या प्राण्याची त्वचा जाड असते, कारण ______________________.

A. घामामुळे होणारा त्याच्या शरीरातील पाण्याचा ऱ्हास टळतो .
B. त्याच्या शरीराचे थंडीपासून संरक्षण होते .
C. त्यामुळे त्याच्या शरीराचे वालुका - धुळीपासून संरक्षण होते .
D. त्यामुळे त्याला उष्ण हवेपासून संरक्षण मिळते .


Click for answer

A. घामामुळे होणारा त्याच्या शरीरातील पाण्याचा ऱ्हास टळतो .

9. खालीलपैकी काय अविघटनशील आहे ?

A. वनस्पती
B. कीटकनाशके
C. प्राणी
D. सूक्ष्मजीव


Click for answer

B. कीटकनाशके

10. सरकार खालीलपैकी कोणत्या रोगाच्या निर्मूलनासाठी योजना राबवित आहे ?

A. पोलिओ
B. कर्करोग
C. विषाणूंमुळे येणारा ताप
D. डोळे येणे


Click for answer

A. पोलिओ