चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -25 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा 'ग्रँडमास्टर' कोण ठरला ?
A. प्रग्नानंधा(प्रज्ञानंदा)
B. विदीत गुजराथी
C. अक्षयराज कोरे
D. सूर्यशेखर गांगुली
Click for answer
A. प्रग्नानंधा (प्रज्ञानंदा)
चेन्नईच्या 12 वर्षे, 10 महिने आणि 13 दिवसांच्या प्रग्नानंधाने इटली येथे झालेल्या ग्रेन्डिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीपूर्वीच ग्रँडमास्टरचा तिसरा नॉर्म पूर्ण केल्यामुळे आर. प्रग्नानंधा(प्रज्ञानंदा) हा बुद्धिबळपटू आता भारतातील सर्वात युवा आणि जगातील दुसरा युवा 'ग्रँडमास्टर' ठरला आहे.
2. स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील किती शहरांनी पहिल्या 100 क्रमांकामध्ये स्थान मिळविले आहे ?
A. 6
B. 15
C. 28
D. 39
Click for answer
C. 28
याशिवाय, एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील 58 शहरांनी स्थान मिळविले आहे.
राज्याला यापूर्वीच स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशातील सर्वोकृष्ट दुसऱ्या क्रमांकाच्या राज्यासह विविध विभागातील एकूण 52 पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण दहा पारितोषिके जाहीर झाली आहेत.
देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान मुंबई शहरास, तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहराने बाजी मारली आहे.
स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील नऊ शहरे स्वच्छ ठरली असून यातील सहा शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
3. राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. दत्ता पडसलगीकर
B. संजय बर्वे
C. परमवीर सिंग
D. सुबोध जयस्वाल
Click for answer
A. दत्ता पडसलगीकर
राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर हे जूनअखेरीस सेवेनंतर निवृत्त होत असून त्यांच्या जागी सध्या पोलीस सेवेत सर्वात ज्येष्ठ असलेले मुंबईचे दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे, तर पडसलगीकर यांच्या जागी स्वातंत्र्यानंतरचे मुंबईचे 41 वे पोलीस आयुक्त म्हणून संजय बर्वे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे .
4. आर्ट डेको हेरिटेज हे ऐतिहासिक वास्तुकलेतील आदर्श कोणत्या ठिकाणी आहेत ?
A. पुरी
B. कोलकाता
C. मुंबई
D. विजयवाडा
Click for answer
C. मुंबई
भारतातील मुंबईमधील कलेक्शन ऑफ व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको लँडमार्क हे वास्तुकलेतील आदर्श आहेत. पहिल्या विश्व युद्धातील स्मशानभूमी, मुंबईतील आर्ट डेको हेरिटेज आणि इटलीतील वाइन निर्मिती करणारा भाग, केन्यातील लेक तुर्काना आणि नेपाळमधील काठमांडू व्हॅली आदी 30 ठिकाणांना यूनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्याची आशा आहे.
वर्ल्ड हेरिटेज समिती बहरीनमध्ये यावर चर्चा करणार आहे.
5. विश्व हिंदू परिषदेमधून बाहेर पडलेले प्रवीण तोगडिया यांनी कोणत्या नव्या संघटनेची स्थापना केली ?
A. आंतरराष्ट्रीय हिंदू महासभा
B. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद
C. वैश्विक हिंदू महासभा
D. वैश्विक हिंदू परिषद
Click for answer
B. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहेत.
6. आयडिया सेल्युलर आणि _____________ या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
A. एअरसेल इंडिया
B. व्होडाफोन इंडिया
C. रिलायन्स कम्युनिकेशन
D. टाटा डोकोमो
Click for answer
B. व्होडाफोन इंडिया
आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडियाचे बहुचर्चित विलीनीकरण ३० जूनअखेर होण्याची शक्यता मंदावली आहे. दूरसंचार विभाग सुमारे 4700 कोटी रुपयांची नव्याने मागणी करण्याच्या विचारात असल्यामुळे हे विलीनीकरण लांबेल असा कयास आहे.
आयडिया सेल्युलरशी विलीन होण्यापूर्वी ही रक्कम व्होडाफोन इंडियाकडून मागितली जाईल.
7. स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी दिला जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्कारांमध्ये ह्या वर्षी कोणत्या शहराला ऑर्डर-ऑफ-मेरीट पुरस्कार मिळाला आहे ?
A. नागपूर
B. पुणे
C. डोंबिवली
D. नवी मुंबई
Click for answer
B. पुणे
नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया येथे 'स्टेट ऑफ गव्हर्नन्स' या विषयावर नुकतीच 52 वी स्कॉच परिषद पार पडली. त्यामध्ये स्कॉच ग्रूपच्या वतीने या निवडीची घोषणा करून पीएससीडीएसलला हा सन्मान देण्यात आला.
पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. राजेंद्र जगताप
8. कोणत्या देशाची VietJet एअरलाईन कंपनी जुलै महिन्यापासून भारतात त्यांची सेवा सुरु करणार आहे ?
A. व्हेनेझुएला
B. व्हिएतनाम
C. इस्टोनिया
D. डेन्मार्क
Click for answer
B. व्हिएतनाम
व्हिएतनामची VietJet एअरलाईन कंपनी त्यांच्या नावापेक्षा बिकनी एअरलाईन नावानंच प्रसिद्ध आहे. महिला व्यावसायिक एनग्यूएन थी फुओंग थाओ या ही विमानसेवा चालवतात.VietJet ही व्हिएतनाममधली पहिली खासगी एअरलाईन आहे
9. कोणत्या देशाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ट्रान्जिट पॅसेंजर्सला 48 तासासाठी मोफत व्हिसा देण्याची नुकतीच घोषणा केली आहे ?
A. थायलंड
B. मलेशिया
C. UAE
D. कॅनडा
Click for answer
C. UAE
यूएईच्या शहरांमध्ये भारतीय पर्यटक आणि प्रवाशांची संख्या सर्वात जास्त आहे. यासाठी याचा सर्वात जास्त फायदा भारतीय प्रवाशांना होणार आहे.
10. राज्यात 2015 साली महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आल्यानंतर 320 निसर्ग पर्यटनाची निवड करण्यात आली असून त्यापैकी किती स्थळांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे ?
A. 42
B. 116
C. 204
D. 320
Click for answer
B. 116
या विकास आराखड्यास महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यकारी समितीची मान्यता देखील प्राप्त झाली आहे. याठिकाणच्या विकास कामांसाठी वन खात्याच्या राज्य पर्यटन विकास निधीमधून निधी उपलब्ध करून दिला जात आहे.
Newer Post
Older Post
Home