विज्ञान प्रश्नसंच -8


सामान्य विज्ञान-रसायनशास्त्रा वर आधारित.

1. आधुनिक आवर्तसारणी कशावर आधारलेली आहे ?

A. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक
B. मूलद्रव्यांचा अणुभारांक
C. मूलद्रव्यांचे आकारमान
D. मूलद्रव्यांचे वस्तुमान


Click for answer

A. मूलद्रव्यांचा अणुक्रमांक

2. निळ्या रंगाच्या काचेच्या निर्मितीसाठी कोणत्या घटकांचा उपयोग करावा लागतो?

A. कॅल्शियम सल्फेट
B. कॉपर सल्फेट
C. कोबाल्ट ऑक्साईड
D. मँगेनीज ऑक्साईड


Click for answer

C. कोबाल्ट ऑक्साईड

3. जर्मन सिल्व्हर या संमिश्रात पुढीलपैकी कोणत्या धातूचा समावेश नसतो ?

A. चांदी
B. तांबे
C. जस्त
D. निकेल


Click for answer

A. चांदी

4. संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये कार्बन अणू कोणत्या बंधाने जोडलेले असतात ?

A. एकेरी बंध
B. दुहेरी बंध
C. तिहेरी बंध
D. आयनिक बंध


Click for answer

एकेरी बंध

5. ‘द्रव्य हे असंख्य सूक्ष्म कणांनी बनलेली असते’, ही संकल्पना खालीलपैकी कोणी मांडली होती ?

A. डॉ. होमी भाभा
B. जयंत नारळीकर
C. महर्षी कणाद
D. सर सी.व्ही.रमण


Click for answer

C. महर्षी कणाद

6. खालीलपैकी शुध्द लोखंडाचा प्रकार कोणता ?

A. ओतीव लोखंड
B. वितळलेले लोखंड
C. बीड लोखंड
D. घडीव लोखंड


Click for answer

D. घडीव लोखंड

7. आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात ?

A. सामान्य स्तंभ
B. नोबल स्तंभ
C. गण
D. आवर्तन


Click for answer

C. गण

8. मोस्लेच्या मते __________हा मूलद्रव्याचा मूलभूत गुण विशेष आहे.

A. रेणूभारांक
B. अणुभारांक
C. अणुक्रमांक
D. सममूल्य भार


Click for answer

C. अणुक्रमांक

9. रासायनिक अभिक्रियेचा वेग हा वस्तूच्या कोणत्या बाबींवर अवलंबून नसतो ?

A. दाब
B. आकारमान
C. तापमान
D. अणुभारांक


Click for answer

D. अणुभारांक

10. वस्तूच्या विलयबिंदू वर कशाचा परिणाम होतो ?

A. दाब
B. आकारमान
C. तापमान
D. वरील सर्व


Click for answer

A. दाब