विज्ञान प्रश्नसंच -9


सामान्य विज्ञान-भौतिकशास्त्रा वर आधारित.

1. खालील पैकी कोणती राशी सदिश राशी आहे ?

A. दाब
B. बल
C. वस्तुमान
D. घनता


Click for answer

B. बल

2. खालील पैकी कोणते तरंग भूकंपाची निगडित नाहीत ?

A. P-तरंग
B. S-तरंग
C. पृष्ठीय तरंग
D. विद्युत-चुंबकीय तरंग


Click for answer

D. विद्युत-चुंबकीय तरंग

3. संगणकाची स्मृती(Computer Memory) कोणत्या एककामध्ये मोजली जाते ?

A. डाईन
B. बाईट
C. डॉल्टन
D. अर्ग


Click for answer

B. बाईट

4. गतीमान वस्तूची गती चारपट केली तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा किती होईल ?

A. 2 पट
B. 4 पट
C. 8 पट
D. 16 पट


Click for answer

D. 16 पट

5. क्ष किरण म्हणजे काय होतं ?

A. ऋण प्रभारित कण
B. धन प्रभारित कण
C. प्रभार विरहित कण
D. विद्युत चुंबकीय लहरी


Click for answer

D. विद्युत चुंबकीय लहरी

6. सिमेंट उद्योगात खालीलपैकी या कच्च्या मालाची गरज असते ?

A. नैसर्गिक वायू
B. चुनखडी
C. चांदी
D. लोह खनिज


Click for answer

B. चुनखडी

7. अंधारात चमकण्याचे गुणधर्मास ________ म्हणून ओळखतात

A. फॉस्फरसन्स
B. फ्लूअरसन्स
C. फॉस्फोराईट
D. कोल्ड फ्लेम


Click for answer

A,फॉस्फरसन्स

8. खाली दिलेल्या भौतिक राशींपैकी कोणती एक सदिश आहे ?

A. त्वरण
B. तापमान
C. आकारमान
D. काल


Click for answer

A. त्वरण

9. सूर्या मध्ये सुरू असलेल्या केंद्रकीय प्रक्रियेस काय म्हणतात ?

A. शृंखला अभिक्रिया
B. केंद्रकीय विखंडन
C. केंद्रकीय संमीलन
D. किरणोत्सार


Click for answer

C. केंद्रकीय संमीलन

10. जास्त उंचीवर कमी तापमानास पाणी उकळते कारण ______________

A. जास्त उंचीवर गुरुत्वाकर्षणाचे बल जास्त असते
B. जास्त उंचीवर हवेचे प्रदूषण नसते
C. जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो
D. जास्त उंचीवर हवेत प्राणवायू कमी असतो


Click for answer

C. जास्त उंचीवर हवेचा दाब कमी असतो