इतिहास प्रश्नसंच-6


समाजसुधारक/ महनीय व्यक्ती या विषय घटकावर आधारित.

1. संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी सुरू केली ?

A. धोंडो केशव कर्वे
B. रघुनाथ धोंडो कर्वे
C. दुर्गा भागवत
D. शकुंतलाबाई परांजपे


Click for answer

B.रघुनाथ धोंडो कर्वे

2. महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ यातील कोणते सुधारक लोकहितवादी या नावाने ओळखले जात होते ?

A. महादेव गोविंद रानडे
B. गोपाळ गणेश आगरकर
C. ज्योतिबा फुले
D. गोपाळ हरी देशमुख


Click for answer

D. गोपाळ हरी देशमुख

3. 'दर्पण' हे साप्ताहिक व 'दिग्दर्शन' हे मराठी मासिक कोणत्या समाजसुधारकाने सुरू केले होते ?

A. बाळशास्त्री जांभेकर
B. बाळ गंगाधर टिळक
C. गोपाळ गणेश आगरकर
D. भाऊ महाजन


Click for answer

A. बाळशास्त्री जांभेकर

4. देव आणि धर्म या विषयीचे विचार कोणाच्या “धर्मविवेचन” या पुस्तकात मांडले आहेत ?

A. दादोबा पांडुरंग
B. भाऊ महाजन
C. गोपाळ हरी देशमुख
D. रामकृष्ण विश्वनाथ


Click for answer

A. दादोबा पांडुरंग

5. खालीलपैकी कोणते समाजसुधारक थॉमस पेन च्या लिखाणाने प्रभावित झाले होते ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. राजर्षी शाहू महाराज
C. महात्मा फुले
D. न्यायमूर्ती रानडे


Click for answer

C. महात्मा फुले

6. खालील पैकी कोण डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये सहभागी होते ?

A. लोकमान्य टिळक आणि सुधारक आगरकर
B. गोपाळकृष्ण गोखले आणि सुधारक आगरकर
C. लोकमान्य टिळक आणि गोपाळ कृष्ण गोखले
D. न्यायमूर्ती रानडे आणि लोकमान्य टिळक


Click for answer

A. लोकमान्य टिळक आणि सुधारक आगरकर

7. पुढीलपैकी कोणत्या वर्षी महात्मा जोतिबा फुले यांचे निधन झाले?

A. 1890
B. 1891
C. 1892
D. 1893


Click for answer

A. 1890

8. महर्षी धोंडो केशव कर्वे हे फर्गसन कॉलेजमध्ये कोणत्या विषयाचे अध्यापन करीत ?

A. गणित
B. रसायनशास्त्र
C. भौतिकशास्त्र
D. तत्वज्ञान


Click for answer

A. गणित

9. खालीलपैकी कोणी कोल्हापुरात सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक वसतिगृहांची स्थापना केली ?

A. कर्मवीर भाऊराव पाटील
B. महात्मा जोतीबा फुले
C. छत्रपती शाहू महाराज
D. डॉ बाबासाहेब आंबेडकर


Click for answer

C.छत्रपती शाहू महाराज

10. गोपाळ गणेश आगरकर हे कोणत्या प्रकारचे विचारवंत होते ?

A. आदर्शवादी
B. आध्यात्मिक
C. बुद्धिप्रामाण्यवादी
D. जहाल मत वादी


Click for answer

C. बुद्धिप्रामाण्यवादी