चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-5
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.
1. सायमन कमिशन विरोधात झालेल्या निदर्शकांवर झालेल्या लाठीमारात लाहोर येथे जखमी झालेल्या कोणाचे पुढील काही दिवसात निधन झाले ?
A. लाला हंसराज
B. पंडीत मदन मोहन मालवीय
C. लाला लजपतराय
D. चंद्रशेखर आझाद
Click for answer
C. लाला लजपतराय
2. भारतमंत्री बर्कनहेड यांचे आव्हान स्वीकारून राज्यघटना तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या सर्वपक्षीय समितीचे अध्यक्ष कोण होते ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. पंडित मोतीलाल नेहरू
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. डॉ. राजेंद्र प्रसाद
Click for answer
B. पंडित मोतीलाल नेहरू
3. पंडित मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखालील सर्वपक्षीय समितीने तयार केलेल्या राज्यघटना विषयक अहवालाला काय म्हणतात ?
A. इंडिया रिपोर्ट
B. यंग इंडिया
C. नेहरू रिपोर्ट
D. कॉमन रिप्लाय
Click for answer
C. नेहरू रिपोर्ट
4. डिसेंबर 1929 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथे राष्ट्रीय सभेचे ऐतिहासिक अधिवेशन भरले होते ?
A. पंडित जवाहरलाल नेहरू
B. पंडित मोतीलाल नेहरू
C. सुभाषचंद्र बोस
D. महात्मा गांधी
Click for answer
A.पंडित जवाहरलाल नेहरू
5. राष्ट्रीय सभेच्या कोणते अधिवेशनात संमत झालेल्या संपूर्ण स्वराज्याच्या ठरावाद्वारे राष्ट्रीय सभेने वसाहतीचे स्वराज्य या उद्दिष्टांचा त्याग करून भारताचे संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय बनविले ?
A. कराची, 1931
B. लाहोर, 1929
C. कोलकाता, 1928
D. मुंबई, 1934
Click for answer
A. कराची, 1931
6. 1929 च्या लाहोर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात खालीलपैकी कोणता दिवस हा स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्यात यावा, असे ठरवण्यात आले ?
A. 26 जानेवारी
B. 1 मे
C. 15 ऑगस्ट
D. 26 नोव्हेंबर
Click for answer
A. 26 जानेवारी
7. लाहोर अधिवेशनात खालीलपैकी कोणाकडे सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले ?
A. पं. जवाहरलाल नेहरू
B. महात्मा गांधी
C. सरदार विठ्ठलभाई पटेल
D. सरोजिनी नायडू
Click for answer
B. महात्मा गांधी
8. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात साराबंदी चळवळ सुरू केली होती ?
A. गोरखपुर
B. खेडा
C. सोलापूर
D. सालेम
Click for answer
B. खेडा
9. गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली ?
A. भारत
B. दक्षिण आफ्रिका
C. ब्रिटन
D. आयर्लंड
Click for answer
B. दक्षिण आफ्रिका
10. 1857 च्या उठावाची चार प्रमुख केंद्रे कोणती होती ?
A. झाशी, मेरठ, लखनौ, कानपूर
B. पाटणा, मेरठ, दिल्ली, अमृतसर
C. पुणे, अलाहाबाद, ग्वाल्हेर, लाहोर
D. अवध, बनारस, कालिकत, बाणपूर
Click for answer
A
Newer Post
Older Post
Home