चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-4
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.
1. ‘रौलट कायदा’ या काळया कायद्याविरुद्ध कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन गांधीजींनी केले होते ?
A. 1 एप्रिल 1919
B. 6 एप्रिल 1919
C. 13 एप्रिल 1919
D. 30 एप्रिल 1919
Click for answer
B. 6 एप्रिल 1919
2. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पोलिसांना बेछूट गोळीबाराचे आदेश देणारा अधिकारी कोण ?
A. मायकेल ओडवायर
B. जनरल डायर
C. साँडर्स
D. जॉन सायमन
Click for answer
B. जनरल डायर
3. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करत खालील पैकी कोणी ब्रिटिश सरकारने दिलेल्या ‘सर’ या किताबाचा त्याग तयार केला ?
A. महात्मा गांधी
B. रवींद्रनाथ टागोर
C. पंडित मोतीलाल नेहरू
D. फिरोजशहा मेहता
Click for answer
B. रवींद्रनाथ टागोर
4. असहकाराच्या आंदोलनाला प्रारंभ कधी झाला ?
A. ऑगस्ट 1920
B. ऑगस्ट 1922
C. ऑगस्ट 1923
D. ऑगस्ट 1925
Click for answer
A. ऑगस्ट 1920
5. राष्ट्रीय सभेने कोठे भरलेल्या अधिवेशनात असहकाराच्या चळवळीच्या ठरावाला मंजुरी दिली?
A. नागपूर (1920)
B. अहमदाबाद(1921)
C. गया(1922)
D. दिल्ली(1918)
Click for answer
A. नागपूर (1920)
6. खालीलपैकी कोठे झालेल्या घटनेने व्यथित होऊन गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केले ?
A. फैजपूर (महाराष्ट्र)
B. खेडा (गुजरात)
C. चंपारण्य(बिहार)
D. चौरीचौरा (उत्तरप्रदेश)
Click for answer
D. चौरीचौरा (उत्तरप्रदेश)
7. राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना कधी करण्यात आली
A. 1921
B. 1922
C. 1923
D. 1924
Click for answer
B. 1922
8. खालील पैकी कोणी राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली ?
A. चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
B. पंडित जवाहरलाल नेहरू व चित्तरंजन दास
C. सरदार वल्लभभाई पटेल व सी.राजगोपालाचारी
D. गोविंद वल्लभ पंत व पंडित राजेंद्र प्रसाद
Click for answer
A.चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू
9. ब्रिटिश सरकारने सायमन कमिशनची नियुक्ती कोणत्या वर्षी केली होती ?
A. इ.स.1925
B. इ.स.1927
C. इ.स.1929
D. इ.स.1931
Click for answer
B. इ.स.1927
10. भारतीयांनी कोणत्या प्रमुख कारणामुळे सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला ?
A. सायमन कमिशन वर भारतीय सदस्य होते तथापि त्यांचे मत विचारात घेणे बंधनकारक नव्हते.
B. सायमन कमिशनने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सहित प्रमुख पक्षांना विचारात घेतले नाही.
C. सायमन कमिशनवर एकही भारतीय सदस्य नव्हता.
D. सायमन कमिशनवर दबाव टाकण्यासाठी
Click for answer
C. सायमन कमिशनवर एकही भारतीय सदस्य नव्हता.
Newer Post
Older Post
Home