चालू घडामोडी
इतिहास प्रश्नसंच-3
इतिहास- भारतीय स्वातंत्र्यलढा या विषय घटकावर आधारित.
1. कोणत्या करारानुसार राष्ट्रीय सभा आणि मुस्लीम लीग यांच्यात तडजोड झाली व मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कामी राष्ट्रीय सभेला सहकार्य करण्याचे मुस्लीम लीगने मान्य केले ?
A.लखनौ करार, 1916
B.पुणे करार, 1932
C.सिमला करार, 1941
D.मुंबई करार, 1911
Click for answer
A. लखनौ करार, 1916
2. 1916 च्या लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कोण होते ?
A.दादाभाई नवरोजी
B.लोकमान्य टिळक
C.अंबिका चरण मुजुमदार
D.मदन मोहन मालवीय
Click for answer
C. अंबिका चरण मुजुमदार
3. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्यपद्धती देईल, असे 1917 साली कोणी घोषित केले होते ?
A.भारतमंत्री मॉंटेग्यू
B.व्हॉईसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड
C.जॉन सायमन
D.ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड लॉईड जॉर्ज
Click for answer
A. भारतमंत्री मॉंटेग्यू
4. भारतामध्ये घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी ब्रिटीश पार्लमेंटने ‘मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा’ कोणत्या वर्षी संमत केला ?
A.सन 1917
B.सन 1918
C.सन 1919
D.सन 1920
Click for answer
A. सन 1917
5. “हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे”, अशा शब्दात माँटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा कायद्यावर कोणी टीका केली ?
A.लोकमान्य टिळक
B.गोपाळकृष्ण गोखले
C.लाला लजपत राय
D.महात्मा गांधी
Click for answer
A. लोकमान्य टिळक
6. लोकमान्य टिळकांचे निधन कधी झाले ?
A.इ.स.1918
B.इ.स.1920
C.इ.स.1922
D.इ.स.1925
Click for answer
B. इ.स.1920
7. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले ?
A.1915
B.1917
C.1920
D.1923
Click for answer
A.1915
8. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी कोणता अभिनव मार्ग वापरला ?
A.स्वदेशी
B.बहिष्कार
C.सत्याग्रह
D.राष्ट्रीय शिक्षण
Click for answer
C. सत्याग्रह
9. 1917 मध्ये बिहारमधील कोणत्या ठिकाणी गांधीजींनी ब्रिटिश मळे-मालकांनी शेतकऱ्यांना निळ पिकवण्याची सक्ती केल्याविरुद्ध सत्याग्रह करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला होता ?
A.गया
B.चंपारण्य
C.पाटणा
D.राजगीर
Click for answer
B. चंपारण्य
10. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडले ?
A.1 एप्रिल 1919
B.6 एप्रिल 1919
C.13 एप्रिल 1919
D.30 एप्रिल 1919
Click for answer
C. 13 एप्रिल 1919
Newer Post
Older Post
Home