इतिहास प्रश्नसंच-16


समाजसुधारक/ महनीय व्यक्ती या विषय घटकावर आधारित.

1. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातीवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व वनांचे संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना खालीलपैकी प्रथम कोणी मांडल्या ?


A. न्यायमूर्ती म. गो. रानडे
B. म. जोतीराव फुले
C. सयाजीराव गायकवाड
D. लोकमान्य टिळक


Click for answer

B. म. जोतीराव फुले

2. न्यायमूर्ती म. गो. रानडे व डॉ. भांडारकर सारखे समाजसुधारक सुद्धा त्यांचे क्रांतीकारी समाज सुधारणावादी विचार समजू शकले नाहीत. ते कोण होते ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. लोकहितवादी
D. विष्णुशास्त्री चिपळूणकर


Click for answer

A. गोपाळ गणेश आगरकर

3. 'सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ह्या वस्त्राच्या उभ्या आणि आडव्या धाग्यासारख्या राजकीय लोकशाहीत आवश्यक आहेत'' हे विधान कोणी केले आहे ?

A. पं. जवाहरलाल नेहरू
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C. डॉ. राजेंद्र प्रसाद
D. बाळ गंगाधर टिळक


Click for answer

B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

4. भारत सेवक समाजाचे संस्थापक कोण होते ?

A. महादेव गोविंद रानडे
B. गोपाळ कृष्ण गोखले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. लोकमान्य टिळक


Click for answer

B. गोपाळ कृष्ण गोखले

5. डेक्कन सभेची स्थापना कोणी केली ?

A. गोपाळ कृष्ण गोखले
B. गोपाळ गणेश आगरकर
C. बाळ गंगाधर टिळक
D. महादेव गोविंद रानडे


Click for answer

D. महादेव गोविंद रानडे

6. निराश्रित महिला व मुली यांच्या शिक्षणासाठी व त्यांना राहण्यासाठी महर्षी कर्वे यांनी सन 1899 मध्ये _________ या नावाची संस्था सुरू केली.

A. अनाथ बालिकाश्रम
B. वनिता महाविद्यालय
C. महिला आश्रम
D. महिला विद्यापीठ .


Click for answer

A. अनाथ बालिकाश्रम

7. खालीलपैकी कोणती एक जोडी चूकीची आहे?

A. म. जोतिबा फुले - सत्यशोधक समाज
B. दादोबा पांडुरंग - मानव धर्म
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर-शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन
D. महर्षि वि.रा.शिंदे - हरिजन सेवक


Click for answer

D. महर्षि वि.रा.शिंदे - हरिजन सेवक

8. 'गुलामगिरी' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. डॉ. आंबेडकर
B. महात्मा फुले
C. गोपाळ गणेश आगरकर
D. महादेव गोविंद रानडे


Click for answer

B. महात्मा फुले

9. महात्मा फुल्यांच्या कोणत्या ग्रंथाचा "विश्व कुटुंबाचा जाहीरनामा' म्हणून उल्लेख केला जातो ?

A. तृतीय रत्न
B. सार्वजनिक सत्यधर्म
C. ब्राह्मणांचे कसब
D. शेतक-यांचा आसूड


Click for answer

B. सार्वजनिक सत्यधर्म

10. महर्षि धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे?

A. आत्मकथा
B. आत्मवृत्त
C. एका पानाची कहाणी
D. जीवन चरित्र


Click for answer

B. आत्मवृत्त