चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -23 ते 26 मे 2018


मे 2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. किशनगंगा जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

A. जम्मू आणि काश्मीर
B. सिक्कीम
C. हिमाचल प्रदेश
D. अरुणाचल प्रदेश


Click for answer

A. जम्मू आणि काश्मीर

श्रीनगरपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या गुरेझमध्ये किशनगंगा नदीवर उभारण्यात आलेल्या धरणाच्या माध्यमातून बंडीपुरा जिल्ह्यतील मंत्रीगाम गावात हा वैशिष्टय़पूर्ण जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कार्पोरेशनच्या (एनएचपीसी) या महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक प्रकल्पाचे काम हिंदूस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने (एचसीसी) इतर भागीदारांच्या माध्यमातून पूर्ण केले आहे.

श्रीनगरपासून 80 किलोमीटर अंतरावर मंत्रीगाममध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, तर तेथून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर किशनगंगा धरण उभारण्यात आले आहे.

धरणातून जलविद्युत प्रकल्पापर्यंत तयार करण्यात आलेला बोगदा हे या प्रकल्पाचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. किशनगंगा धरणापासून डोंगरामधून जाणारा 9.5मीटर व्यासाचा तब्बल 23.24 किलोमीटर अंतराचा हा बोगदा आहे.

2. फ्रँकलिन मिथिका लिनतुरी या कोणत्या देशाच्या खासदाराचे सदस्यत्व औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची (बामू) बोगस पदवी सादर केल्यामुळे रद्द केल्याने ते अलीकडे चर्चेत होते ?

A. स्पेन
B. दक्षिण आफ्रिका
C. केनिया
D. सुदान


Click for answer

C. केनिया

वर्ष 2016 मध्ये नॅशनल अलाइन्स पक्षाच्या उमेदवारीवर मेरू इयंबे शहरातील दक्षिण मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली होती. निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या पदवीवर त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतला होता. त्याआधारे या प्रकरणाच्या तपासाचे काम इंटरपोलकडे सोपवण्यात आले.

3. एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय नुकताच जाहीर केला . एबी डिव्हीलियर्स कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

A. ऑस्ट्रेलिया
B. दक्षिण आफ्रिका
C. न्युझीलंड
D. इंग्लंड


Click for answer

B. दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार एबी डिव्हीलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. आयपीएलमध्ये काहीच दिवसांपूर्वी अद्‌भुत झेल पडकल्यामुळे स्पायडरमॅनची उपमा त्याला मिळाली होती.114 कसोटी, 228 वन-डे आणि 78 ट्‌वेंटी-20 सामने ही त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटची कारकीर्द आहे.

4. कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली ?

A. एच. डी. कुमारस्वामी
B. रमेश कुमार
C. वजुभाई वाला
D. एस. सुरेश कुमार


Click for answer

B. रमेश कुमार

विधानसभेचे अध्यक्षपद मागणाऱ्या भाजपने अखेरच्या क्षणी त्यांचा उमेदवार एस. सुरेश कुमार यांची उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे रमेश कुमार यांची अखेर विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

5. जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर खालीलपैकी कोणी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली ?

A. केशव प्रसाद
B. जी. परमेश्वर
C. डीके शिवकुमार
D. कविंदर गुप्ता


Click for answer

B. जी. परमेश्वर (कॉंग्रेस)

जेडीएसने निवडणुकीपूर्वी बसपाशी तर निवडणुकीनंतर काँग्रेससोबत युती केली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 78 तर जेडीएसला 38 जागांवर विजय मिळाला. तर भाजपा 104 जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला. तसेच 2 जागा अपक्षांना मिळाल्या.

मात्र, कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली. दरम्यान, काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत सरकार स्थापनेसाठी पाठींबा दिल्याने जनता दल (सेक्युलर)चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

6. भारताचे उत्तर कोरियातील नवीन राजदूत कोण आहेत ?

A. मनप्रीत वोहरा
B. मुक्ता तोमर
C. पंकज सरन
D. अतुल गोतसुर्वे


Click for answer

D. अतुल गोतसुर्वे

उत्तर कोरिया या आवाहनात्मक देशातील भारताच्या राजदूतपदाची धूरा आता एका मराठी माणसाकडे सोपवण्यात आली आहे. अतुल गोतसुर्वे हे भारताचे उत्तर कोरियातील राजदूत असतील.

7. केंद्रीय क्रिडा मंत्री कोण आहेत ?

A. धर्मेंद्र प्रधान
B. पियुष गोयल
C. राज्यवर्धन सिंह राठोड
D. चौधरी बिरेंद्र सिंग


Click for answer

C. राज्यवर्धन सिंह राठोड

राज्यवर्धन सिंह राठोड यांनी व्यायाम करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘हम फिट तो इंडिया फिट’ हा फिटनेस मंत्र देत राज्यवर्धन सिंह राठोड यांनी विराट कोहली, सायना नेहवाल आणि ह्रतिक रोशनलाही या मोहिमेत सामील होण्याचं आवाहन केले होते.

8. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कोणत्या विद्यापीठातून बीए उत्तीर्ण झाल्याचा दावा आहे. अलीकडील काळात माहिती अधिकार कायद्याव्दारे विद्यापीठाकडे याचिकाकर्त्यांनी माहिती मागितल्याने ही बातमी चर्चेत होती.

A. राजकोट विद्यापीठ
B. दिल्ली विद्यापीठ
C. गुजरात विद्यापीठ
D. मुंबई विद्यापीठ


Click for answer

B. दिल्ली विद्यापीठ

9. लॅन्सेटच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'दी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस' या अभ्यास अहवालानुसार 2016 मध्ये भारताचे आरोग्य सेवा उपलब्धता व दर्जा गुणांकानुसार 195 देशांत कितवे स्थान आहे ?

A. 48 वे
B. 71 वे
C. 133 वे
D. 145 वे


Click for answer

D. 145 वे

भारत शेजाऱ्यांचा विचार करता यात चीन (48 वा), श्रीलंका (71वा), बांगलादेश (133 वा), भूताना (134 वा) यांच्यापेक्षा मागे आहे तर नेपाळ (149 वा), पाकिस्तान (154 वा) , अफगाणिस्तान (191 वा) यांच्यापेक्षा पुढे आहे.

10. जीना हास्पेल या महिलेची अमेरिकेत अलीकडेच कोणत्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. जागतिक बँक
B. पेन्टागॉन
C. सीआयए
D. युनेस्को


Click for answer

C. सीआयए

अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही हास्पेल यांची निवड करण्यात आली आहे.हास्पेल सध्या सीआयएच्या उपप्रमुख होत्या . त्यांच्यावर चौकशीदरम्यान कैद्यांच्या अमानवी छळ केल्याचा आरोप आहे.

मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता.

सीआयएच्या 70 वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत.