चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -9 ऑगस्ट 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेचे उद्‌घाटन केव्हा करण्यात येणार आहे ?

A. 21 ऑगस्ट
B. 17 ऑगस्ट
C. 15 ऑगस्ट
D. 11 ऑगस्ट


Click for answer

A. 21 ऑगस्ट

देशातील प्रत्येक जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेची किमान एक शाखा असणार आहे. इंडिया पोस्ट पेमेन्ट्‌स बॅंकेच्या पहिल्याच दिवशी 650 शाखा सुरू करण्यात येणार आहेत.

याव्यतिरिक्त पोस्ट ऑफिसमध्ये तिच्या 3,250 एक्‍सेस पॉईन्ट्‌स सुरू होतील.

2. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला गेला ?

A. 9 ऑगस्ट
B. 8 ऑगस्ट
C. 7 ऑगस्ट
D. 6 ऑगस्ट


Click for answer

A. 9 ऑगस्ट

3. राज्यसभेच्या उपसभापतीपदी कोणाची निवड करण्यात आली ?

A. हरिप्रसाद
B. वंदना चव्हाण
C. हरिवंश नारायण सिंह
D. एम.थंबीदुराई


Click for answer

C. हरिवंश नारायण सिंह

उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत एनडीएचे हरिवंश नारायण सिंह यांनी विरोधी पक्षांचे हरिप्रसाद यांच्यावर 125 मतांनी विजय मिळवला.

4. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा दफनविधी __________ शहरातील मरीना बीचवर करण्यात आला.

A. पद्दुचेरी
B. चेन्नई
C. तिरुनलवेली
D. कन्याकुमारी


Click for answer

B. चेन्नई

पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री राहिलेले एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्कारविधी वरून मोठा वाद होता. हा वाद उच्च न्यायालयात मिटला व करुणानिधी यांच्यावर मरीना बीचवर अंत्यसंस्कार झाले.

5. मीराबाई चानू ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. बॅडमिंटन
B. वेटलिफ्टिंग
C. बुध्दीबळ
D. कुस्ती


Click for answer

B. वेटलिफ्टिंग

पाठीच्या दुखण्यातून पूर्णपणे न सावरल्यामुळे वर्ल्ड चॅम्पियन वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतून माघार घेतल्याने ती चर्चेत आहे.

6. खालीलपैकीकोणाची नुकतीच रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळात र्धवेळ संचालक म्हणून समावेश करण्यात आला आहे ?

A. राकेश सिन्हा आणि सतीश मराठे
B. राकेश सिन्हा आणि स्वामिनाथन गुरुमूर्ती
C. स्वामिनाथन गुरुमूर्ती आणि प्रसून पुण्यवाजपेयी
D. स्वामिनाथन गुरुमूर्ती आणि सतीश मराठे


Click for answer

D. स्वामिनाथन गुरुमूर्ती आणि सतीश मराठे

7. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरील प्रत्येक क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मैदानाच्या पॅव्हेलियनमध्ये असलेली घंटा वाजवण्याची प्रथा आहे. अलीकडे हा मान कोणत्या भारतीय खेळाडूला देण्यात आला ?

A. सौरभ गांगुली
B. राहूल द्रविड
C. सचिन तेंडुलकर
D. विरेंदर सेहवाग


Click for answer

C. सचिन तेंडुलकर

ही घंटा वाजवण्याचा मान आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, प्रशासक किंवा खेळ क्षेत्रात प्रसिद्ध आणि प्रेरणादायी असणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. ही घंटा वाजवणारा सचिन तेंडुलकर भारताचा एकूण 7 वा खेळाडू ठरेल.

याआधी भारतीय खेळाडूंपैकी सुनील गावस्कर, नवाब पतौडी, दिलीप वेंगसरकर,राहुल द्रविड, कपिल देव आणि सौरव गांगुली यांना ही घंटा वाजवण्याचा मान मिळाला आहे.

8. भारतातील बँकांचे हजारो कोटी बुडवून लंडनमध्ये वास्तव्य करीत असलेल्या विजय मल्ल्या यांची फॉर्म्युला वनमधील कोणत्या संघाची मालकी आता संपलेली आहे ?

A. फोर्स वन
B. फोर्स इंडिया
C. फोर्स किंगफिशर
D. फोर्स फरारी


Click for answer

B. फोर्स इंडिया

विजय मल्ल्या यांची गेली दहा वर्षे फोर्स इंडियावर मालकी होती, पण गेल्या महिन्यात हंगेरी ग्रांप्रिच्या आधी संघाचा ड्रायव्हर सर्जियो पेरेज याने तक्रार केली होती. त्यानंतर प्रशासकांनी संघाला आपल्या ताब्यात घेतले.

9. इडुक्की धरण कोणत्या राज्यात आहे ?

A. तामिळनाडू
B. कर्नाटक
C. तेलंगणा
D. केरळ


Click for answer

D.केरळ

जलप्रलयात इडुक्की धरणाचे दरवाजे 26 वर्षांनी उघडले त्यामुळे ते चर्चेत होते.

10. रिझर्व्ह बँकेने अलीकडे जाहीर केलेल्या पतधोरणानुसार रेपो दर किती झाला आहे ?

A. 6 %
B. 6.25 %
C. 6.50 %
D. 6.75 %


Click for answer

C. 6.50 %

यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित 6.25 टक्के केला होता. तो आता 6.50 टक्के इतका झाला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही 6.25 टक्के इतका करण्यात आला आहे.

भारतीय बँका ज्या दरानं रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला रेपो रेट म्हणतात. तर भारतीय बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवी ठेवल्यास त्यांना रिझर्व्ह बँकेकडून जो व्याजदर मिळतो त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.