चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -3 ते 5 ऑगस्ट 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. खवय्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या आणि आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या कडकनाथ कोंबडीचा जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग कोणत्या राज्याला मिळाला ?

A. महाराष्ट्र
B. मध्य प्रदेश
C. उत्तराखंड
D. आंध्रप्रदेश


Click for answer

B. मध्य प्रदेश

चेन्नई येथील जीआय रजिस्ट्री संस्थेने सोमवारी हे प्रमाणपत्र मध्य प्रदेशला दिले आहे. हे प्रमाणपत्र सहा वर्षांसाठी वैध असेल.

या प्रमाणपत्रानुसार या कोंबडीचा उगम मध्य प्रदेशातील अलीराजपूर या आदिवासींची बहुसंख्या असलेल्या भागात झाला आहे. यासाठी राज्याला सहा वर्षे कायदेशीर लढाई द्यावी लागली आहे.

कडकनाथ कोंबडीची पिसे, चोच, जीभ, बोटे आणि एवढेच नव्हे तर रक्त आणि मांसही काळ्या रंगाचे असते. त्याची लोकप्रियता आणि औषधी गुणांमुळे कुक्कुट पालनाचा व्यवसायात त्याला मागणी आहे.

2. आंतरराष्ट्रीय पातळीवर____________क्षेत्रात मानाचा समजला जाणाऱ्या फिल्ड मेडल पुरस्कार नुकताच भारतीय वंशाचे अक्षय व्यंकटेश यांना जाहीर झाला आहे.

A. गणित
B. साहित्य
C. पदार्थविज्ञान
D. रसायनशास्त्र


Click for answer

A.गणित

अक्षय व्यंकटेश हे मंजूळ भार्गव यांच्यानंतर हा पुरस्कार पटकविणारे दुसरे भारतीय ठरले आहेत. ग्रीन फिल्ड मेडलने गणित विषयात मुलभूत संशोधन करणाऱ्या संशोधकास गौरविले जाते. त्यांना या पुरस्काराने रिओ-डी-जेनेरो येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय गणित संमेलनात गौरविण्यात आले.

या पुरस्काराने त्यांच्यासोबत अन्य तीन जणांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये केम्ब्रिज विद्यापीठातील प्राध्यापक कौचर बिरकर , स्विस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे एलिसो फिगाली आणि बॉन विद्यापीठाचे पीटर स्कूल्ज यांना हे मेडल मिळाले आहे.

हा पुरस्कार दरवर्षी 40 वर्षाच्या आतील गणित तज्ञाला दिला जातो.

दिल्ली येथे अक्षय व्यंकटेश यांचा जन्म झाला असून ते सध्या ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास आहेत. स्टॅडफोर्ड विद्यापीठात अध्यापनाचे काम करतात.

दर चार वर्षांनी गणितात उत्तम कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार जाहीर होतो. या पुरस्काराला गणितातील नोबेल म्हणून ओळखले जाते. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय गणित संघाकडून जाहीर केला जातो. या पुरस्काराचे 15 हजार कॅनडीयन डॉलर, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.

3. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश____________यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या सर्वोच्च न्यायालयातील 8 व्या महिला न्यायमूर्ती आहेत.

A. ज्ञान सुधा मिश्रा
B. रंजना प्रकाश देसाई
C. आर भानुमती
D. इंदिरा बॅनर्जी


Click for answer

A. इंदिरा बॅनर्जी

सर्वोच्च न्यायालयात इंदिरा बॅनर्जी यांच्याआधी जस्टिस फातिमा बीवी, सुजाता वी. मनोहर, रूमा पॉल, ज्ञान सुधा मिश्रा, रंजना प्रकाश देसाई, आर भानुमती आणि इंदू मल्होत्रा यांची न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कांता कुमारी भटनागर या मद्रास उच्च न्यायालयात पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. त्यानंतर जस्टिस बॅनर्जी मुख्य न्यायाधीश होणाऱ्या दुसऱ्या महिला ठरल्या.

4. 'द अक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत ?

A. विजय गुट्टे
B. अनुराग कश्यप
C. राजकुमार हिरानी
D. फरहान अख्तर


Click for answer

A. विजय गुट्टे

जीएसटी इंटेलिजन्सने आगामी प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या 'द अक्सीडेंटल प्राईम मिनिस्टर' चित्रपटाचे दिग्दर्शक विजय गुट्टेला अटक केली आहे.

होरायजन कंपनीच्या विरोधात याआधीच 170 कोटी रुपयांच्या बनावट जीएसटी बिलाचे प्रकरण असून जीएसटी अधिकाऱ्यांनी होरायजन ही कंपनी त्याच्या क्लायंटला बनावट जीएसटी बिल देऊन कोटी रुपयांचा घोटाळा करीत असल्याचे म्हणणे आहे.

द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माजी मध्यम सल्लागार संजय बारु यांच्या एका पुस्तकावर असून विजय गुट्टे यांनी दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट आहे.

5. पुणे पोलीस आयुक्तपदाचा पदभार कोणाकडे देण्यात आला आहे ?

A. रश्मी शुक्ला
B. डॉ. के व्यंकटेशम
C. संदीप पाटील
D. आर. के. पद्मनाभन


Click for answer

B. डॉ. के व्यंकटेशम

पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची बदली अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) म्हणून नियुक्ती करण्यात आली.

6. पिंपरी चिंचवड शहराचे पहिले पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. रश्मी शुक्ला
B. डॉ. के व्यंकटेशम
C. संदीप पाटील
D. आर. के. पद्मनाभन


Click for answer

D. आर. के. पद्मनाभन

7. केंद्र सरकारने अखेर न्या. के एम जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या बढतीला मान्यता दिली आहे. ते कोणत्या राज्याच्या न्यायालयात न्यायमूर्ती होते ?

A. केरळ
B. तामिळनाडू
C. उत्तराखंड
D. दिल्ली


Click for answer

C. उत्तराखंड

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने 10 जानेवारीला केंद्र सरकारकडे बढतीसाठी ज्या न्यायाधिशांच्या नियुक्तीची शिफारस केली होती, त्यात न्या जोसेफ यांचे नाव होते पण केंद्र सरकारने त्यावेळी त्यांच्या बढतीला अनुमती नाकारली होती. पण त्यांच्या नावाची कॉलेजियमकडून पुन्हा शिफारस आल्यानंतर मात्र केंद्राने त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदिल दाखवला आहे.

8. सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची सध्याची संख्या किती झाली आहे ?

A. 26
B. 25
C. 24
D. 23


Click for answer

B. 25

न्या. के एम जोसेफ यांच्यासह मद्रास उच्च न्यायालयाच्या इंदिरा बॅनर्जी आणि ओडिशा उच्च न्यायालयाचे न्या विनीत सरन यांचीही सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नियुक्‍त्यांमुळे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांची एकूण संख्या आता 25 झाली असून अद्याप तेथील सहा जागा रिक्त आहेत.

9. डब्ल्यूडब्ल्यूई ह्या खेळातील केन म्हणजेच ग्लेन जेकब्स हा पहेलवान अमेरिकेतील कोणत्या शहराच्या महापौरपदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे ?

A. क्नॉक्स कंट्री
B. बोस्टन
C. ह्युस्टन
D. अटलांटा


Click for answer

A. क्नॉक्स कंट्री

अमेरिकेच्या टेनेन्से प्रांतातील क्नॉक्स कंट्री या शहरातील महापौरपदाची त्याने निवडणूक जिंकली आहे. ग्लेन जेकब्स अशाप्रकारची कामगिरी करणारे हे डब्ल्यूडब्ल्यूईमधील दुसरे खेळाडू ठरले आहेत.

10. तब्बल 37 वर्षांनंतर रॉबर्ट मुगाबे यांनी राष्ट्राध्यक्षपद सोडल्यानंतर कोणत्या देशात झालेल्या निवडणुकांमध्ये इमरसन मंगाग्वा विजयी झाले आहेत ?

A. दक्षिण आफ्रिका
B. सुदान
C. झिंबाब्वे
D. केनिया


Click for answer

C. झिंबाब्वे