चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -2 ऑगस्ट 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. कोणता फुटबॉल संघ जगातील पहिला प्रदूषणमुक्त फुटबॉल संघ ठरला आहे ?

A. फॉरेस्ट ग्रीन रोवर
B. मिलान
C. मँचेस्टर युनायटेड
D. बार्सिलोना


Click for answer

A. फॉरेस्ट ग्रीन रोवर

इंग्लिश प्रीमियर लीगमधील प्रसिद्ध संघ ‘फॉरेस्ट ग्रीन रोवर’ हा जगातील पहिला प्रदूषणमुक्त संघ ठरला आहे. युनायटेड स्टेट्सने या संघाला प्रदूषणमुक्त संघ म्हणून घोषित केले आहे.

हा संघ ज्या खेळपट्टीवर खेळतो ती सेंद्रिय असून त्याच्या निगराणीसाठी सौर शक्तीवर चालणारे रोबोट काम करते.

या संघातील खेळाडू, खेळपट्टीवर काम करणारे इतर कर्मचारी आणि खेळ पाहायला येणारे प्रेक्षक यांना केवळ शाकाहारी जेवण दिलं जातं.

या संघाच्या स्टेडीयममध्ये प्रकश केवळ सौर उर्जेद्वारे वापरला जातो. तसेच येथे इलेक्ट्रिक कारसाठी चार्जिंग सुविधाही उपलब्ध आहे.

2. नुकत्याच रशियात झालेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत खालीलपैकी कोणाची यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोल करणारा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे ?

A. लुकास हर्नांडिज
B. जुआन क्विटोरे
C. लुका मॉड्रिज
D. बेंजामिन पवार्ड


Click for answer

ड. बेंजामिन पवार्ड

फ्रान्सचा आघाडी फळीतील खेळाडू बेंजामिन पवार्डची यंदाच्या स्पर्धेतील सर्वोत्तम गोल करणारा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.

फिफाने त्याला ‘वर्ल्डकप गोल ऑफ द टूर्नामेंट’ हा पुरस्कार देऊन गौरवले.

अर्जेंटिनाविरुद्धच्या लढतीत त्याने केलेला गोल स्पर्धेतील सर्वोत्तम गोल ठरला

. या स्पर्धेत एकूण 169 गोल झाले.

3. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्तापालट होत इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील __________________ या पक्षाला 272 पैकी 113 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधानपदाची सूत्रे पक्षाध्यक्ष इम्रान खान यांच्याकडे गेली आहेत.

A. पाकिस्तान पीपल्स पार्टी
B. तहरीक-ए-इन्साफ
C. मिली मुस्लिम लीग
D. ऑल पाकिस्तान लीग


Click for answer

B. तहरीक-ए-इन्साफ

पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत 342 पैकी 272 जागांवर मतदान झाले. पाकिस्तानी संसदेत एकूण 342 सदस्य आहेत.

त्यापैकी 272 सदस्य थेट लोकांमधून निवडले जातात, तर उर्वरित 60 जागा महिलांसाठी आणि 10 जागा धार्मिक अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत.

4. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. नृपेन्द्र मिश्रा
B. आर. एस. शर्मा
C. डॉ. पी. के. मिश्र
D. अरविन्द कुमार शर्मा


Click for answer

C. आर. एस. शर्मा

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष शर्मा यांनी दिलेले आव्हान त्यांनाच महागात पडले आहे. आधार क्रमांक जाहीर करून व्यक्तिगत माहिती काढून दाखवा असे ते आव्हान होते. हॅकर्सने काही तासांतच त्यांची व्यक्तिगत माहिती पसरवली. इतकेच नाही तर जीमेल पासवर्ड समजला असून तो लवकरात लवकर बदलायचा सल्ला त्यांना दिल्याने ते चर्चेत आले होते.

5. खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेने पाणीपुरीच्या विक्रीवर सध्या बंदी घातल्याने ती चर्चेत आली होती ?

A. बडोदा
B. पुणे
C. दिल्ली
D. कोलकाता


Click for answer

A. बडोदा

6. जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल रॅकिंगमध्ये पहिल्या 5 खेळांडूमध्ये सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम कोणत्या खेळाडूने केला आहे ?

A. अलेक्झांडर पेया
B. ज्युआन मार्टिन डेल पोर्टो
C. रॉजर फेडरर
D. राफेल नादाल


Click for answer

C. रॉजर फेडरर

रॉजर फेडररने जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल रॅकिंगमध्ये पहिल्या 5 खेळाडू तब्बल 750 आठवडे आपले स्थान कायम राखले आहे . जिमी कॉर्नरस हे या अगोदर 706 आठवडे जागतिक क्रमवारीत पहिल्या 5 खेळांडूमध्ये आपले स्थान टिकून होते.

राफेल नादाल देखील फेडरर कॉर्नरस यांच्या मागोमाग असून, तो गेली 639 आठवडे अव्वल 5 खेळाडू आपला क्रमांक टिकवून आहे. तो तिसर्‍या क्रमांकावर आहे. या अगोदर फेडरर जागतिक क्रमवारीत तब्बल 300 आठवडे अव्वल क्रमांकावर होता. तो देखील एक विक्रमच आहे. तर त्याशिवाय 450 आठवडे तो क्रमवारीत दुसर्‍या क्रमांकावर होता. तो देखील रॉजरचा विक्रम होता.

सध्या जागतिक क्रमवारीत नादाल पहिल्या तर फेडरर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

7. अलिकडेच कोणत्या खेळाडूने अ‍ॅटलांटा आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा पाचव्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला ?

A. जॉन इस्नेर
B. रेयान हॅरिसन
C. रॉजर फेडरर
D. राफेल नादाल


Click for answer

A. जॉन इस्नेर

ही स्पर्धा पाचव्यांदा जिंकणारा तो केवळ अमेरिकेचा पाचवा टेनिसपटू ठरला आहे.

या अगोदर जॉन मॅकेन्रो, जिमी कॉर्नरस, पीट सॅम्प्रास, आंद्रे आगासी यांनी देखील प्रत्येकी 5 वेळा ही स्पर्धा जिंकली होती.

8. तब्बल पंधरा वर्षानंतर कोणत्या दिवशी ‘मंगळ’ग्रह पृथ्वीच्या जवळ 5 कोटी 75 लक्ष किलोमीटर अंतरावर होता ?

A. 29 जुलै
B. 30 जुलै
C. 31 जुलै
D. 1 ऑगस्ट


Click for answer

C. 31 जुलै

9. जागतिक स्तनपान कधी साजरा केला जातो ?

A. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट
B. 8 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट
C. 15 ऑगस्ट ते 21ऑगस्ट
D. 22 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट


Click for answer

A. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट

10. आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने अर्थात ILO ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2018 या वर्षात भारतात बेरोजगारीचा दर किती असेल ?

A. 3.5%
B. 4.5%
C. 5.5%
D. 6.5%


Click for answer

A. 3.5%

भारतात 2018 या वर्षात बेरोजगारीचा दर 3.5 टक्के इतका असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने अर्थात ILOनं व्यक्त केला आहे. दुसरीकडे चीनमध्ये सध्याच्या 4.7 टक्के बेरोजगारीच्या दरात वाढ होऊन तो 4.8 टक्क्यांवर जाईल असे आयएलओच्या अहवालात म्हटले आहे.