भारतीय राज्यपध्दती/ ग्रामप्रशासन प्रश्नसंच-11


भारतीय राज्यघटना व राज्यपध्दती / स्थानिक स्वराज्य संस्था या अभ्यास घटकावर आधारित.

1. भारतीय राज्यघटनेतील तरतूदीनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे ?

A. संघसूची
B. राज्यसूची
C. सामायिक सूची
D. स्थानिक स्वराज्य संस्था सूची


Click for answer

C. सामायिक सूची

2. दिल्लीचे प्रमुख प्रशासक कोण असतात ?

A. राज्यपाल
B. नायब राज्यपाल
C. प्रशासकीय अधिकारी
D. विशेष सचिव


Click for answer

B. नायब राज्यपाल

3. संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते ?

A. राज्यसभा
B. विधानसभा
C. विधान परिषद
D. लोकसभा


Click for answer

D. लोकसभा

4. लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यासाठी आवश्यक असलेली सदस्य संख्या (गणसंख्या) किती असते ?

A. एक दशांश
B. एक तृतीयांश
C. निम्मी
D. एक पंचमांश


Click for answer

A. एक दशांश

5. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने , 42 व्या घटनादुरुस्तीने केलेला लोकसभेचा कार्यकाल पूर्ववत म्हणजे 6 वर्षावरून 5 वर्षे इतका केला ?

A. 45 वी घटनादुरुस्ती
B. 44 वी घटनादुरुस्ती
C. 48 वी घटनादुरुस्ती
D. 51 वी घटनादुरुस्ती


Click for answer

B. 44 वी घटनादुरुस्ती

6. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केंद्रीय मंत्रीमंडळाने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला सल्ला त्यांच्यावर बंधनकारक ठरला आहे ?

A. कलम 71
B. कलम 84
C. कलम 81
D. कलम 74


Click for answer

D. कलम 74

7. 'राज्यपाल' पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती आहे ?

A. 18 वर्षे
B. 25 वर्षे
C. 35 वर्षे
D. 30 वर्षे


Click for answer

C. 35 वर्षे

8. राष्ट्रपतींना राज्यसभेवर किती सदस्य नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे ?

A. 12
B. 6
C. 2
D. 18


Click for answer

A. 12

9. भारताच्या राष्ट्रीय चिन्हाखाली कोणते बोधवाक्य मुद्रित करण्यात आलेले आहे ?

A. जयहिंद
B. सत्यमेव जयते
C. सत्यम् शिवम् सुंदरम्
D. वंदे मातरम्


Click for answer

B. सत्यमेव जयते

10. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणास आहेत ?

A. राष्ट्रपती
B. मुख्यमंत्री
C. राज्यपाल
D. पंतप्रधान


Click for answer

C. राज्यपाल