चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -11 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. श्रीलंकेत जन्मलेले कॅनेडियन कवी आणि कादंबरीकार मायकल ओंडाटेस यांच्या _________या कादंबरीला गोल्डन बुकरने सन्मानित करण्यात आले.

A. द इंग्लिश पेशंट
B. लिंकन इन द बार्डो
C. वुल्फ हॉल
D. इन ए फ्री स्टेट


Click for answer

A. द इंग्लिश पेशंट

जागतिक प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांमध्ये सामील मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनी 'द इंग्लिश पेशंट'ला गोल्डन बुकरने सन्मानित करण्यात आले. या कादंबरीला 1992 मध्ये बैर अन्सवर्थच्या 'सेपेड हंगर'सोबत बुकर पुरस्कार मिळाला होता. दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यावर एका विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या युवकावर कादंबरीची कथा आधारित आहे.

परीक्षकांनी प्रत्येक दशकातील सर्वश्रेष्ठ बुकर विजेता निवडला आहे. यात 'इन ए फ्री स्टेट', 'मून टायगर', 'द इंग्लिश पेशंट', 'वुल्फ हॉल' आणि 'लिंकन इन द बार्डो' यांचा समावेश होता.

यानंतर वाचकांनी मत मांडून 'द इंग्लिश पेशंट'ची गोल्डन बुकर विजेता म्हणून निवड केली आहे.

1996 मध्ये या कादंबरीवर बेतलेल्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासमवेत 9 ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.


आपण अॅप च्या आता पर्यंतच्या प्रवासाविषयी समाधानी असल्यास प्ले स्टोअर ला आम्हाला 5 रेटिंग द्या. काही सूचना/नवीन काही गोष्टी अॅप मध्ये हव्या असल्यास आम्हाला mpsc.mitra@gmail.com या मेल आय डी वर मेल करा.

2. भारताने इंग्लंडविरूद्धच्या टी-20 मालिकेत तिस-या आणि निर्णायक सामन्यात भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला. या शेवटच्या सामन्याचा शतकवीर रोहित शर्मा या विजयाचा शिल्पकार ठरला.रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित केले. ह्या गेंड्याचे नाव काय होते ?

A. जिमी
B. दुरीआ
C. सुदान
D. पंपान


Click for answer

C. सुदान

क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रत्येकी तीन शतक करणारा रोहित हा पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने हे शतक जगातील अखेरच्या पांढ-या गेंड्याला समर्पित करून जगाला मोलाचा सल्ला दिला. सुदान असे या गेंड्याचे नाव असून मार्च 2018 मध्ये त्याचा मृत्यु झाला होता.

3. ब्रिटनने नवे परराष्ट्रमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे ?

A. डॉमिनिक राब
B. जेरेमी हंट
C. बोरिस जॉन्सन
D. डेव्हिड डेव्हिस


Click for answer

B. जेरेमी हंट

पंतप्रधान मे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री जेरेमी हंट यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

ब्रिटनचे मावळते परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ब्रिटनचे ब्रेक्‍झिट विभागाचे मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी पद सोडल्यानंतर जॉन्सन यांनीही राजीनामा सादर करत खळबळ उडवून दिली होती.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे

4. थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्यासाठी एक छोटी पाणबुडी बनविल्याने स्पेसएक्‍स ही कंपनी चर्चेत आली होती. ह्या कंपनी कोणाच्या मालकीची आहे ?

A. लॅरी एलिसन
B. एलॉन मस्क
C. डेव्हिड कोच
D. जेफ बेसोज


Click for answer

B. एलॉन मस्क

दरम्यान गेले 2 आठवडे थायलंडच्या गुहेत अडकून पडलेल्या 12 मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षकाला बाहेर काढण्यात अखेर यश आलं आहे. थायलंडमधील बचाव अभियानात जगभरातील तज्ञांनी सक्रीय सहभाग घेतला.

याच अभियानात महाराष्ट्रातील किर्लोस्कर कंपनीचे पंप आणि पथक यांनी सक्रीय सहभाग घेतला.

5. जागतिक बॅंक आणि औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने जारी केलेल्या अभ्यास अहवालानुसार इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये (उद्योगस्नेही वातावरण) महाराष्ट्राचे देशातील स्थान कितवे आहे ?

A. पहिले
B. पाचवे
C. तेरावे
D. विसावे


Click for answer

C. तेरावे

आंध्र प्रदेश दुसऱ्यांदा प्रथम स्थानी आले आहे. आंध्र प्रदेश शेजारील तेलंगणा दुसऱ्या स्थानी आहे. तर हरयाणा, झारखंड, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान यांचा क्रम लागतो.

जागतिक बँकेने काढलेल्या इज ऑफ डुइंग बिझनेसच्या यादीतही भारताची स्थिती सुधारली आहे. 190 देशांमध्ये भारत 100 व्या स्थानी आहे.

6. ऑपरेशन 'मुस्कान' आणि 'स्माईल' कशाशी संबंधित आहेत ?

A. वृद्धाश्रमातील आणि अनाथाश्रमातील व्यक्तींच्या कल्याणासाठी
B. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील महिलांना मदत करण्यासाठी
C. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी
D. हरवलेल्या मंगळसूत्र आणि सोनसाखळीचा शोध घेण्यासाठी


Click for answer

C. हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी

7. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोन्लाडोने कोणत्या फुटबॉल क्लब कडून यापुढे खेळणार आहे ?

A. मॅनचेस्टर युनाइटेड
B. रियाल माद्रिद
C. युव्हेंट्स
D. चेल्सा


Click for answer

C. युव्हेंट्स

रोनाल्डोने रियाल माद्रिद क्लबला सोडचिठ्ठी असून इटालियन क्लब युव्हेंट्सची 88 मिलियन पौंडची म्हणजेच भारतीय रकमेत 800 कोटी रूपयांची ऑफर स्वीकारली.

2009 साली रियाल मॅद्रिदने रोनाल्डोला विश्वविक्रमी 728 कोटी रुपयात मॅनचेस्टर युनाइटेडकडून आपल्याकडे खेचले होते.

त्याला आता चार वर्षांसाठी युव्हेंट्सकडून 4.55 लाख रूपये प्रती आठवड्याला मिळणार आहेत.

रोनाल्डोने नऊ वर्षांत माद्रिदसोबत चॅम्पियन्स लीगची चार जेतेपद नावावर केली आहेत. यापलिकडे त्याने या नऊ वर्षांत अनेक विक्रम नोंदवले आहेत.

8. नोएडा येथे कोणत्या कंपनीच्या मालकीच्या जगातल्या सर्वात मोठ्या मोबाईल फोन निर्मिती कारख्यानाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले ?

A. अॅपल
B. सॅमसंग
C. ओप्पो
D. झिओमी


Click for answer

B. सॅमसंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे -इन यांनी नोएडामध्ये सोमवारी सॅमसंग कंपनीच्या नव्या मोबाईल निर्मितीच्या कारखान्याचे उद्‍घाटन केले. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. नोएडामधील सेक्टर ८१ मध्ये हा कारखाना असून मोबाईल निर्मितीचा जगातला सर्वात मोठा कारखाना आहे.

9. 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. ह्या वर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची मध्यवर्ती संकल्पना (Theme) काय आहे ?

A. कुटुंब नियोजन हा एक मानवी हक्क आहे.
B. छोटे कुटुंब सुखी कुटुंब
C. हम दो हमारे दो
D. कुटुंब नियोजन - विकासाची गुरुकिल्ली


Click for answer

A. कुटुंब नियोजन हा एक मानवी हक्क आहे. (Family Planning is a Human Right)

10. समलैंगिकता हा गुन्हा मानणाऱ्या ___________________च्या 377 कलमास घटनाबाह्य ठरविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेद्वारे करण्यात आली आहे. ह्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.

A. भारतीय राज्यघटना
B. इंडियन पीनल कोड
C. सिविल प्रोसिजर कोड
D. क्रिमिनल प्रोसिजर कोड


Click for answer

B. इंडियन पीनल कोड (IPC)