चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -22 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. _______________मध्ये पार पडलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाला रौप्यपदक तर भारताच्या मिश्र संघाला कांस्यपदक मिळाले.
A. बर्लिन (जर्मनी)
B. सेऊल (दक्षिण कोरिया)
C. पॅरीस(फ्रान्स)
D. म्युनिच (जर्मनी)
Click for answer
A. बर्लिन (जर्मनी)
2. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता चारचाकी किंवा दोन चाकी वाहन घेताना थर्ड पार्टी विमा घेणे कोणत्या तारखेपासून बंधनकारक असणार आहे ?
A. 1 सप्टेंबर 2018
B. 1 जानेवारी 2019
C. 1 एप्रिल 2019
D. 2 ऑक्टोबर 2018
Click for answer
A. 1 सप्टेंबर 2018
थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे कार किंवा दुचाकीचा दुसऱ्या कुणाशी अपघात झाला तर त्या तिसऱ्या व्यक्तीला असलेले विम्याचे संरक्षण. या प्रकारच्या विम्यामध्ये स्वत:च्या गाडीचे नुकसान झाले तर भरपाई मिळत नाही.
3. काळय़ा पैशाच्या मुद्दय़ावर स्थापन करण्यात आलेल्या कोणाच्या अध्यक्षतेखालील विशेष तपास पथकाने रक्कम जवळ बाळगण्यासाठी सध्या असलेली 20 लाखांची मर्यादा एक कोटी रूपये करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे ?
A. माजी न्यायमूर्ती आदर्श सेन आनंद
B. माजी न्यायमूर्ती विक्रमजीत सेन
C. माजी न्यायमूर्ती प्रफ्फुल चंद्र पंत
D. माजी न्यायमूर्ती एम. बी. शाह
Click for answer
D. माजी न्यायमूर्ती एम. बी. शाह
ही 20 लाखांची मर्यादा आणि त्या आधी 15 लाखांची मर्यादा त्यांनीच सुचवलेली होती हे विशेष. शाह यांच्या अधिपत्याखाली काळय़ा पैशाच्या तपासासाठी विशेष तपास पथक 2014 सालात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आले आहे.
4. सिंगापूरचे पंतप्रधान कोण आहेत ?
A. ट्रुओंग टॅन सांग
B. ली सेन लूंग
C. मैत्रीपाला सिरिसेना
D. पार्क ग्युन-हे
Click for answer
B. ली सेन लूंग
सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग यांच्या माहितीसह सुमारे 15 लाख रुग्णांची वैद्यकीय माहिती हॅक करण्यात आली आहे. सिंगापूरमधील ही आजवरची सर्वात मोठी डाटा चोरी आहे. ह्या कारणामुळे ते अलीकडे चर्चेत होते.
5. यंदाच्या 21 व्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत बक्षिसाच्या रूपात मिळालेली सर्व रक्कम दिव्यांग क्रीडापटूंच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या प्रेयर्स डी कोर्डीस या सेवाभावी संस्थेला दान करण्याचा निर्णय फ्रान्सचा युवा फुटबॉलस्टार ____________________ याने घेतल्याने तो चर्चेत होता.
A. लुईस गार्सिया
B. लुइस फिगो
C. किलियन एमबापे
D. निकोलास अनेल्का
Click for answer
C. किलियन एमबापे
6. बिग बँग थेअरीचे जनक असलेल्या कोणाची 124 वा जन्मदिवस 17 जुलै रोजी होता ?
A. टायको ब्राहे
B. जॉर्ज लेमैत्रे
C. विल्यम हर्शेल
D. कार्ल सॅगन
Click for answer
D. जॉर्ज लेमैत्रे
या निमित्ताने गुगलने डूडल व्दारे त्यांना आदरांजली वाहिली.
7. 'The Dhoni Touch' या अलीकडे प्रकाशित झालेल्या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. भारत सुंदरेसन
B. पिंकी विराणी
C. निशिकांत कोलगे
D. मीना मेनन
Click for answer
A. भारत सुंदरेसन
इंडियन एक्स्प्रेसचे क्रीडा प्रतिनिधी भारत सुंदरेसन यांनी आपल्या, ‘The Dhoni Touch’ या पुस्तकात धोनीच्या स्वभावातील विविध पैलूंचा आढावा घेतलेला आहे.
8. केशव महाराज हाकोणत्या संघाकडून खेळणारा क्रिकेटपटू आहे ?
A. दक्षिण आफ्रिका
B. श्रीलंका
C. न्यूझीलंड
D. भारत
Click for answer
A. दक्षिण आफ्रिका
श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्याच कसोटीत हार पत्करावी लागली. मात्र ह्या कसोटीत केशव महाराजने पहिल्या डावात श्रीलंकेचे तब्बल 9 बळी टिपले. या कामगिरीसह केशव महाराज आशिया खंडात सर्वाधिक बळी घेणारा बिगर आशियाई गोलंदाज ठरला आहे.
9. जीएसटी परिषदेच्या अलीकडे झालेल्या बैठकीनंतर सॅनिटरी नॅपकिन वर किती टक्के दराने जीएसटी कराची आकारणी होणार आहे ?
A. बारा
B. पाच
C. एक
D. कक्षेतून वगळण्यात आले
Click for answer
D. कक्षेतून वगळण्यात आले
महाराष्ट्र सरकारने सॅनिटरी नॅपकिनवर लावण्यात आलेला जीएसटी मागे घ्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर परिषदेने हा निर्णय घेतला आहे. सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता.
10. दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदासाठी न्यायाधीश _________________________ यांची नियुक्ती करावी, असा सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे.
A. अनिरुद्ध बोस
B. के. एम. जोसेफ
C. जे.सी.शाह
D. एन.एन.रे
Click for answer
A. अनिरुद्ध बोस न्यायाधीश
अनिरुद्ध बोस हे सध्या मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत.
Newer Post
Older Post
Home