चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -23 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. भारतातील पहिली टेस्टट्यूब बेबी कोण होती ?
A. इंदिरा हिंदुजा
B. हर्षा चावडा
C. शर्मन शाह
D. सत्यजित पाटील
Click for answer
B. हर्षा चावडा
आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा उपयोग करून भारतात पहिल्यांदाच सफल झालेल्या या प्रक्रियेच्या शिल्पकार होत्या, डॉ. इंदिरा हिंदुजा.
6 ऑगस्ट1986 रोजी हर्षाचा मुंबईच्या केईएम रुग्णालयात जन्म झाला.आता 32 वर्षीय हर्षा चावडा या आई झाल्याने चर्चेत आहेत .
2. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा या वर्षाचा 'सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार' कोणास देण्यात आला ?
A. सुनील छेत्री
B. सी.के.विनीथ
C. रॉबिन सिंग
D. सुब्रता पॉल
Click for answer
A. सुनील छेत्री
भारताचा कर्णधार सुनील छेत्री याला आज 2017 चा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचा या वर्षाचा 'सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार' म्हणून निवडण्यात आले.
छेत्रीने नुकताच आपला 100 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. बायचुंग भूतियानंतर ही कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा खेळाडू ठरला.
तो भारत आणि बंगळुरू एफसीचा स्ट्रायकर आहे.
पुरुष गटात छेत्रीला सर्वोत्कृष्ट खेळाडू, तर महिला गटात कमलादेवीला 2017 ची सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवडण्यात आले.
3. काही उजव्या विचारसरणीच्या लोकांनी सोशल मीडियावर धमकी दिल्यामुळे कोणत्या मल्याळम लेखकाने आपली आगामी कादंबरी 'मीशा' रद्द केली आहे?
A. के.आर.मीरा
B. एस. हरीश
C. एम.टी. वासुदेवन
D. सारा जोसेफ
Click for answer
B. एस. हरीश
हरीश यांच्या कादंबरीचे आत्तापर्यंत तीन भाग प्रकाशित झाले होते. काही लोकांनी लेखक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
हरीश यांनी आपल्याला पत्र लिहून यापुढे या कादंबरीचे भाग प्रसिद्ध न करण्याची विनंती केली आहे, असे मातृभूमी वृत्तपत्राच्या संपादकाने ट्वीटमध्ये म्हटले आहे.
4. 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिजनचा पहिला विजेता कोण ठरले ?
A. मेघा धाडे
B. पुष्कर जोग
C. आस्ताद काळे
D. सई लोकूर
Click for answer
A. मेघा धाडे
विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. मेघाला 18 लाख 60 हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर देण्यात आले.
5. काही वर्षांपूर्वी बलात्कारासंबंधी अर्वाच्य भाषेत केलेल्या संदेशांचे 'स्क्रीनशॉट्स' सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी हॉलीवूडपटाच्या कोणत्या दिग्दर्शकास वॉल्ट डिझनी कंपनीने घरचा रस्ता दाखवला आहे ?
A. ख्रिस्तोफर नोलन
B. जेम्स गन
C. डेव्हिड फिन्शचर
D. टीम बर्टन
Click for answer
B. जेम्स गन
6. पाच ऑगस्टला नासाचे कोणते सौरयान सूर्याच्या दिशेने सूर्याच्या करोनाचा अभ्यास करण्यासाठी झेपावणार आहे ?
A. द सोलर प्रोब
B. पार्कर सोलर प्रोब
C. आदित्य
D. सनसोलारीस
Click for answer
B पार्कर सोलर प्रोब
हे यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे. इजीन पार्कर या 90 वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला पार्कर सोलर प्रोब असे नाव देण्यात आलं आहे. नासा आणि जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तरित्या 1976 साली हेलिअस-2 नावाचं यान पाठवलं होतं.
7. जाकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी कोणी सुवर्णपदक पटकावलं आहे ?
A. लक्ष्य सेन
B. यु. विमल कुमार
C. चेतन आनंद
D. ध्रुव रावत
Click for answer
A. लक्ष्य सेन
आशियाई बॅडमिंटन ज्युनियर स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा लक्ष्य केवळ तिसरा भारतीय बॅडमिंटनपटू आहे. याआधी गौतम ठक्कर (1965), पी.व्ही. सिंधू (2012) यांनी या स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
लक्ष्यनं दोन वर्षांपूर्वी याच स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं होतं.
हा देखील बेंगळुरूस्थित प्रकाश पदुकोण अकादमीचा विद्यार्थी आहे.
8. सुधारित आदेशांमुळे वस्तू आणि सेवा कर अर्थात "जीएसटी' च्या सर्वोच्च कर असलेल्या 28 टक्के वर्गातील वस्तूंची संख्या किती झाली आहे ?
A. 226
B. 191
C. 35
D. 8
Click for answer
C. 35
या कर वर्गात आता एसी, डिजीटल कॅमेरा, व्हिडिओ रेकॉर्डर, डिश वॉशिंग मशीन आणि वाहन आदीसारख्या 35 उत्पादनांचा समावेश आहे.
गेल्या एका वर्षात जीएसटी कौन्सिलने सर्वोच्च कर यादीतील 191 वस्तु 28 टक्क्यांच्या स्लॅबमधून काढून कमी करांच्या स्लॅबमध्ये त्यांचा समावेश केला.
केंद्र सरकारने देशभरात 1 जुलै, 2017 रोजीपासून जीएसटी लागू केला होता. त्यावेळी 28 टक्के कर असलेल्या वर्गात 226 वस्तूंचा समावेश केला होता.
9. कोणती तंत्रज्ञान विषयक कंपनी ऑफलाईन ग्राहकांना कनेक्ट करण्यासाठी त्यांचा स्वतःचा इंटरनेट उपग्रह 'अथेना' 2019 च्या सुरवातीला प्रक्षेपित करणार आहे ?
A. गुगल
B. फेसबुक
C. अॅपल
D. याहू
Click for answer
B. फेसबुक
पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेट विस्तार करू पाहणाऱ्या कंपन्यात फेसबुक बरोबरच अॅलन मस्क यांची स्पेस एक्स आणि सॉफ्ट बँक पुरस्कृत वन वेब या कंपन्याही प्रयत्नशील आहेत.
या उपग्रहामुळे जगाच्या दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा पुरविणे शक्य होणार आहे असे फेसबुक कडून सांगण्यात आले आहे.
10. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू कोण ठरला आहे ?
A. जो रूट
B. केन विल्यम्ससन
C. फखर जमान
D. डेव्हिड वार्नर
Click for answer
C. फखर जमान
पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज फखर जमानने खास विश्वविक्रम रचला आहे. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीत 1000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला असुन तो वनडेत सर्वात जलद 1000 धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
त्याने हा टप्पा त्याच्या 18 व्या डावात पूर्ण केला.
या आधी हा विक्रम विभागून सर व्हिव रिचर्ड्स, केविन पिटरसन,जोनाथन ट्रॉट, क्विंटन डी कॉक आणि बाबर आझम या 5 खेळाडूंच्या नावावर होता. त्यांनी वनडेमध्ये 21 डावात 1000 धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
याबरोबरच वनडेत द्विशतक करणारा तो जगातील एकूण सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडूलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, मार्टीन गप्टील आणि ख्रिस गेल यांनी हा कारनामा केला आहे.
जमानने आत्तापर्यंत त्याच्या कारकिर्दीत तीन शतके आणि सहा अर्धशतके केली आहेत.
Newer Post
Older Post
Home