चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -9 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. तुर्कीच्या मर्सिन शहरात झालेल्या एफआयजी आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेत जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक कोणी पटकाविले ?

A. दीपा कर्माकर
B. रुचा दिवेकर
C. अरुणा रेड्डी
D. पूजा धांडा


Click for answer

A. दीपा कर्माकर

दुखापतीमुळे तब्बल दोन वर्षांची विश्रांती घेतलेली भारताची जिमनॅस्टपटू दीपा कर्माकरने रविवारी जिमनॅस्टिक विश्वचषक स्पर्धेतील व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले.

गेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा वॉल्ट प्रकारात चौथ्या स्थानावर राहिली होती.

या स्पर्धेतील दीपाचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

2. खरीप ज्वारीचे देशातील पहिले जैवसमृद्ध वाण विकसित वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे. या वाणाचे नाव काय ठेवण्यात आले आहे ?

A. परभणी मोती
B. परभणी श्वेता
C. परभणी ज्योती
D. परभणी शक्ती


Click for answer

D. परभणी शक्ती

कुपोषण दूर करण्यासह बहुपयोगी असलेले खरीप ज्वारीचे जैवसमृद्ध वाण 'परभणी शक्ती' ( पीव्हीके 1009) या नावाने विकसित करण्यात आले आहे़

लोह आणि जस्ताचे प्रमाण अधिक असलेले हे देशातील पहिलेच वाण असून, 5 जुलै रोजी हैदराबाद येथे त्याचे प्रसारण करण्यात आले़ येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय अर्धकोरवाडवाहू उष्णकटीबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रीसॅट) यांच्या संशोधनातून हे वाण विकसित करण्यात आले आहे

.या संशोधित वाणामध्ये लोह प्रतिकिलो 44 ते 46 मिलीग्रॅम आणि जस्त प्रतिकिलो 32 ते 33 मिलीग्रॅम असून, भाकरीची प्रत चांगली आहे़ कडबाही उच्चप्रतीचा असून, उत्पादन क्षमता प्रती हेक्टरी 36 ते 38 क्विंटल व कडब्याचे उत्पादन 105 ते 110 क्विंटल आहे़ खोडमाशी, खोडकिड व काळ्या बुरशी या रोगास हा वाण प्रतिकारकक्षम आहे़.

3. जगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या गेलेल्या नोबेलपुरस्काराला लैंगिक छळाच्या आरोपांचा फटका बसल्यानंतर स्वीडनमधील विचारवंतांनी आता नोबेलला पर्याय म्हणून स्वतःचा पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय आहे ?

A. प्रति नोबेल
B. आबेल
C. दि न्यू अॅकॅडमी
D. दि न्यू थॉट


Click for answer

C. दि न्यू अॅकॅडमी

स्वीडीश अकादमी ही संस्था नोबेल पुरस्कार प्रदान करते. मात्र या पुरस्कार समितीत अनेक महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेली एक व्यक्ती असल्याचे आरोप झाल्यामुळे यंदा हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

त्यामुळे निषेध म्हणून हा नवा पुरस्कार सुरू करण्यात येणार आहे. दि न्यू अॅकॅडमी असे नव्या संस्थेचे नाव असणार असून त्यात अनेक लेखक, कलाकार आणि पत्रकारांचा समावेश आहे. 107 विद्वानांनी एकत्र येऊन या संदर्भात निवेदन जारी केले आहे.

नोबेल पुरस्काराच्याच दिवशी म्हणजे 10 डिसेंबर रोजी तो देण्यात येईल. हा नवीन पुरस्कार - एक दशलक्ष क्रोनोर (सुमारे 1,13,000 डॉलर) रकमेचा असून तो जनसहभागातून देण्यात येईल. नोबेल साहित्य पुरस्काराची घोषणा होते तेव्हाच म्हणजे 14 ऑक्टोबर रोजी या पर्यायी पुरस्काराचा विजेता जाहीर केला जाईल आणि नोबेल पुरस्काराच्याच दिवशीच म्हणजे 10 डिसेंबर रोजी तो देण्यात येईल.

नोबेल पुरस्कारांच्या साहित्यविषयक समितीच्या सदस्य असलेल्या कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती आणि प्रसिद्ध छायाचित्रकार जीन क्लॉड अर्नॉल्ट यांनी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप 18 महिलांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये जाहीरपणे केला होता. त्यामुळे सुमारे 70 वर्षांत प्रथमच नोबेल साहित्य पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.

4. टी-20 मध्ये तीन शतके ठोकणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?

A. विराट कोहली
B. रोहित शर्मा
C. पृथ्वी शॉ
D. हार्दिक पांड्या


Click for answer

B. रोहित शर्मा

ब्रिस्टल येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर भारताने 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर 7 चेंडू शिल्लक असतानाच भारताने हा सामना जिंकला.

5. इंग्लंडमधील ईस्ट अँग्लिया प्रांतातील हे नॉरफॉक येथील थेटफोर्ड हे गाव शिख साम्राज्याचे शेवटचे राजे असलेल्या महाराजा दुलीपसिंग यांची125वी पुण्यवर्ष साजरे करत असून यानिमित्त हे शहर भारतातल्या कोणत्या शहराचे भगिनी शहर होणार आहे ?

A. अमृतसर
B. जालंधर
C. मोगा
D. पतियाळा


Click for answer

A. अमृतसर

महाराजा दुलीपसिंग यांच्या स्मरणार्थ इंग्लंडमध्ये दोन आठवड्यांचा पंजाबी महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दुलीपसिंग हे महाराजा रणजित सिंग यांचे सर्वात धाकटे मुलगे होते. ब्रिटीशांनी त्यांना सक्तीने हद्दपार केले होते आणि 1849 मध्ये ते ब्रिटनमध्ये आले होते.

ब्रिटिशांनी त्यांच्याकडून कोहिनूर हिरा मिळविला होता.

6. सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादन कारखाना कोठे सुरू होत आहे ?

A. शांघाय, चीन
B. नोएडा
C. बेंगळूरू
D. पुणे


Click for answer

B. नोएडा

सॅमसंगने 1990 च्या दशकात भारतात पहिले इलेक्ट्रोनिक उत्पादन केंद्र सुरु केले होते.

नोयडा येथील सेक्टर 81मध्ये सॅमसंग इलेक्ट्रोनिक्सच्या भव्य कारखान्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी आणि द.कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन याच्या उपस्थितीत होत असून सॅमसंगचा हा जगातील सर्वात मोठा मोबाईल उत्पादन कारखाना आहे.

35 एकर जागेत तो उभारला गेला असून यात मोबाईल बरोबर फ्रीज, टीव्ही व अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणे बनविली जाणार आहेत.

मून जे इन यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

7. राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने नुकत्याच जारी केलेल्या आदेशानुसार शाळांमधून कोणती गोष्ट वगळण्याबाबत निर्णय घेतला आहे ?

A. छडी
B. फळा
C. डस्टर
D. हजेरी पुस्तक


Click for answer

A. छडी

शिक्षण बाल हक्क कायद्यानुसार कोणत्याही मुलाला शारीरिक किंवा मानसिक छळाला सोमोरे जाऊ नये अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार आता राष्ट्रीय बालहक्क आयोगाने शाळांमध्ये छडीची शिक्षा वगळण्याबाबत निर्णय घेतला. याबाबत प्राचार्य, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सूचना केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना सर्व माध्यमांना, शाळांना, व्यवस्थापन संस्थांना देण्यात आल्या आहेत.

8. कोणत्या देशाने सरकारी नोकरीमधील तब्बल 18 हजार 500 कर्मचाऱ्यांना कामावरून तडकाफडकी कमी करण्यात आले आहे ?

A. इराण
B. सुदान
C. तुर्की
D. पाकिस्तान


Click for answer

C. तुर्की

राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात काम करणे आणि दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याच्या संशयावरून ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

2016 पासून तुर्कीतील तब्बल 1 लाख 10 हजार सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. तुर्कीच्या धोरणांवर टीका करणाऱ्या आणखी हजारो नागरिकांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

आतापर्यंत अशा कर्मचाऱ्यांची संख्या 2 लाखाच्या आसपास आहे.

9. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी शेअरधारकांनी पुढील पाच वर्षांसाठी कोणाला मुदतवाढ दिली आहे ?

A. मुकेश अंबानी
B. अनिल अंबानी
C. कोकिळाबेन अंबानी
D. ईशा अंबानी


Click for answer

A. मुकेश अंबानी

मुंबई येथे 5 जुलैला झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

10. अपर्णा बालन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. बुध्दिबळ
B. लॉन टेनिस
C. महिला क्रिकेट
D. बॅडमिंटन


Click for answer

D. बॅडमिंटन

भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची मुलगी गायत्री हिची आशियाई खेळांसाठी भारतीय बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. या संघातून अनुभवी महिला बॅडमिंटनपटू अपर्णा बालन हिला वगळण्यात आले होते

. या संबंधी अपर्णा हिने बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बाई) आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, कन्या गायत्री गोपीचंद आणि आकर्षि कश्यप यांच्याविरोधात केरळच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आपली कन्या गायत्री हिला संघात स्थान मिळावे, या कारणास्तव मला या संघातून वगळण्याचा निर्णय पुलेला गोपीचंद यांनी घेतला असल्याचेही आरोप तिने या याचिकेत केले आहेत.