चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -10 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. केंद्र सरकारने किती उच्च शैक्षणिक संस्थांना 'इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स' ( 'प्रतिष्ठित संस्थां') चा दर्जा दिला आहे ?

A. सहा
B. आठ
C. दहा
D. पंधरा


Click for answer

A. सहा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तीन सार्वजनिक आणि तीन खासगी उच्चशिक्षण संस्थांची ‘श्रेष्ठत्व’ दर्जासाठी निवड केली आहे. या 'श्रेष्ठत्व' दर्जा मिळालेल्या संस्थांना पुढील पाच वर्षांत 1 हजार कोटींचा विशेष निधी केंद्र सरकारकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.

केंद्र सरकारने ‘इन्स्टिटय़ूट ऑफ एमिनन्स’साठी शिक्षण संस्थांची निवड करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. आयआयटी मुंबई, आयआयटी दिल्ली आणि बंगळूरुतील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स’ या सरकारी संस्था असून ‘जिओ’सह मणिपाल अ‍ॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन आणि पिलानी येथील बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स या खासगी संस्था आहेत.

या सहाही शिक्षण संस्था देशातील अन्य शिक्षण संस्थांपेक्षा शैक्षणिक दर्जाच्या दृष्टीने श्रेष्ठ मानल्या गेल्या.

यात रिलायन्स फाऊंडेशनच्या अजून अस्तित्वात न आलेल्या ‘जिओ इन्स्टिटय़ूट’चाही समावेश आहे.

2. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने (NCLT)टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत खालीलपैकी कोणाची याचिका फेटाळून लावली आहे ?

A. पलोनजी मिस्त्री
B. सायरस मिस्त्री
C. नोएल मिस्त्री
D. जिग्नेश मिस्त्री


Click for answer

A. सायरस मिस्त्री

टाटा समूहाच्या चेअरमन पदावरुन मिस्त्री यांना हटविण्यात आले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना, एनसीएलटीने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत मिस्त्री यांना धक्का दिला. तसेच पदावरुन हटविण्याचे अधिकार बोर्डाला असल्याचे आपल्या आदेशात म्हटले.

3. युएस न्यूज अँड वर्ल्डने नुकतीच जगातील सर्वात शक्तिशाली 25 देशांची यादी जाहीर केली आहे . या यादीत भारताचे स्थान कितवे आहे ?

A. चौथे
B. आठवे
C. पंधरावे
D. बाविसावे


Click for answer

C. पंधरावे

संबंधित देशाची अर्थव्यवस्था, दुसऱ्या देशावर या देशाचा पडणारा प्रभाव, लष्कर आणि नेतृत्वाच्या आधारावर हे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकासह सर्वात शक्तिशाली देश ठरला आहे. दुसऱ्या स्थानावर रशिया तर तिसऱ्यावर चीन आहे.

भारत पंधराव्या स्थानी आहे. इराण तेराव्या तर पाकिस्तान बाविसाव्या आणि सिंगापूर चोविसाव्या स्थानी आहे.

4. कोणत्या देशाचे अध्यक्ष असलेले मून जेई-इन सध्या भारत दौऱ्यावर आहेत ?

A. दक्षिण कोरिया
B. जपान
C. व्हिएतनाम
D. सिंगापूर


Click for answer

A. दक्षिण कोरिया

अध्यक्ष म्हणून मून यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे.

5. भारतात आल्यानंतर मून-जे-इन यांची पत्नी किम जोंग सुक यांनी अभिनेता आमिर खानचा 'दंगल' चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी हा चित्रपट ज्याच्या आयुष्यावर बेतलेला आहे त्या ___________ कुटुंबीयांना त्यांनी चहाचे आमंत्रण दिले आहे.

A. कोम
B. यादव
C. तोमर
D. फोगट


Click for answer

D. फोगट

हा चित्रपट गीता आणि बबीता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे.

6. कोणत्या देशात सातत्याने कोसळणारा मुसळधार पाऊस आणि पुरामुळे आतापर्यंत 100 जणांचा मृत्यू झाला आहे ?

A. जपान
B. कॅनडा
C. इंडोनेशिया
D. सिरीया


Click for answer

A. जपान

दरम्यान याच कालावधीत कॅनडाला उष्ण लहरींपासून त्रास होत आहे .

7. सांसद, मंत्री आणि राज्यपाल म्हणून उल्लेखनीय योगदान दिलेले एम.एम. जाकोब यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी राज्यपाल होते ?

A. मेघालय
B. ओडिशा
C. पंजाब
D. गुजरात


Click for answer

A. मेघालय

8. _________________ येथे 9 ते 13 जुलै दरम्यान होणाऱ्या 17 व्या जागतिक संस्कृत परिषदेचे उद्घाटन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते झाले.

A. कंबोडियातील नामपेन्ह
B. कॅनडातील व्हॅनकुवर
C. अमेरिकेतील लास वेगास
D. नवी दिल्ली


Click for answer

B. कॅनडातील व्हॅनकुवर

9. कोणत्या हिंदी पार्श्वगायिकेला नुकतेच ब्रिटनच्या संसद सभागृहात इंडो ब्रिटिश ऑल पार्टी पार्लिमेंटच्यावतीने त्यांच्या संगीत आणि सामाजिक क्षेत्रातील अभूतपूर्व योगदानाबद्दल गौरविण्यात आले ?

A. अनुराधा पौडवाल
B. लता मंगेशकर
C. सुनिधी चौहान
D. श्रेया घोषाल


Click for answer

A. अनुराधा पौडवाल

त्यांच्यासोबत कुमार सानू यांचाही गौरव करण्यात आला.

10. सब टीव्ही वरील कोणत्या लोकप्रिय मालिकेतील डॉ. हंसराज हाथीची भूमिका साकारणारे अभिनेते कवी कुमार आझाद यांचे निधन झाले ?

A. यस बॉस
B. जिजाजी छत पर है
C. लापतागंज
D. तारक मेहता का उलटा चष्मा


Click for answer

A. तारक मेहता का उलटा चष्मा

या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत.