चालू घडामोडी प्रश्नोत्तरे भाग-2


2018 मधील परीक्षांकरिता तयार केलेले विशेष प्रश्नसंच.
BRICS संघटना

11. ब्रिक्स देशांची दहावी शिखर परिषद कोठे होणे नियोजित आहे ?
उत्तर: दक्षिण आफ्रिका -जुलै 2018

12. ब्रिक्स देशांची नववी शिखर परिषद कोठे पार पडली ?
उत्तर:जियामेन (चीन मधील शहर) -सप्टेंबर 2017

13. ब्रिक्स हे कसले संक्षिप्त रूप आहे ?
उत्तर: BRICs- Brazil, Russia, India, China, South Africa (ब्राझील, रशिया , भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच उगवत्या अर्थव्यवस्थांचा समावेश )

14. ब्रिक्स देश कोणत्या अन्य महत्त्वाच्या संघटनेचे (ग्रुपचे )सदस्य आहेत ?
उत्तर: G-20

15. 2010 पासून BRICs हे नाव वापरत आले. त्या पूर्वीचे नाव काय होते ?
उत्तर: ब्रिक (BRIC). 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा त्यात समावेश झाला.

16. हे देश कोणत्या वर्षापासून नियमितपणे दरवर्षी भेटत आहेत (शिखर संमेलन होत आहे) ?
उत्तर: 2009

17. ब्रिक्स देशांत जगातील किती लोकसंख्या राहते ?
उत्तर: 41% . यातील दक्षिण आफ्रिका वगळता अन्य देश हे लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या दहा देशांत आहेत.

18. ब्रिक्स देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास त्यांची एकत्र अर्थव्यवस्था किती रकमेची आहे ?
उत्तर: 18.6 ट्रिलीयन अमेरिकन डॉलर्स

19. ब्रिक्स देशांच्या एकत्रित क्षेत्रफळाचा विचार करता ते भूगोलावरील किती क्षेत्र व्यापतात ?
उत्तर: जगाच्या एकूण भूभागापैकी 27%

20. भारतात ब्रिक्स देशांच्या आजवर किती शिखर परिषदा पार पडल्या ?
उत्तर: दोन. 2012 आणि 2016 साली.

21. ब्रिक्स देशांनी स्थापन केलेली बँक कोणती ?
उत्तर: न्यू डेव्हलपमेंट बँक (पूर्वीचे नाव : ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक )

22. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
उत्तर: शांघाय (चीन)

23. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे विद्यमान आणि पहिले अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर: के.व्ही. कामत (हे पूर्वी इन्फोसिस ह्या आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीचे चेअरमन होते , तसेच आयसीआयसीआय बँकेचे अकार्यकारी चेअरमन होते)

24. न्यू डेव्हलपमेंट बँकेत पाचही सदस्य देशांचे किती समभाग (shares)आहेत ?
उत्तर: प्रत्येकी 20%

25. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे पहिले प्रादेशिक कार्यालय कोठे सुरू झाले आहे ?
उत्तर: जोहासनबर्ग (दक्षिण आफ्रिका)

26. न्यू डेव्हलपमेंट बँक सुरू करण्याबाबत प्रस्ताव कोणत्या देशाने मांडला होता ?
उत्तर: भारत (2012 च्या शिखर परिषदेत)