चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -3 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाच्या (आयसीसी) प्रतिष्ठित 'हॉल ऑफ फेम'मध्ये अलिकडेच समाविष्ट करण्यात आलेला पाचवा भारतीय क्रिकेटपटू कोण ?

A. महेंद्रसिंग धोणी
B. विराट कोहली
C. सचिन तेंडुलकर
D. राहुल द्रविड


Click for answer

D. राहुल द्रविड

यापूर्वी हा सन्मान सुनिल गावस्कर, बिशन सिंह बेदी, कपिल देव आणि अनिल कुंबळे या दिग्गज खेळाडूंनाही देण्यात आला आहे.

सन्मान जाहीर झाल्यानंतर त्याला हॉल ऑफ फेमची ओळख असलेली प्रसिद्ध टोपी प्रदान करण्यात आली. राहुल द्रविडसोबतच इंग्लंडची माजी क्रिकेटपटू क्लायर टेलर आणि आस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचाही समावेश आहे.

क्रिकेट विश्वात द्रविडला 'द वॉल' म्हणूनही ओळखले जाते. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून 'द वॉल इन हॉल' या शब्दात आयसीसीने त्याचा गौरव केला आहे.

आयसीसी 'हॉल ऑफ फेम'मध्ये सुनिल गावस्कर, बिशन सिंह बेदी, कपिल देव यांचा समावेश 2009 साली तर अनिल कुंबळेचा समावेश 2015 साली करण्यात आला.

2. अमली पदार्थांच्या तस्करांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याचा प्रस्ताव कोणत्या राज्यसरकारने केंद्र सरकारला सादर केला आहे ?

A. महाराष्ट्र
B. पंजाब
C. केरळ
D. उत्तरप्रदेश


Click for answer

B. पंजाब

याआधी पंजाब सरकारने शस्त्रांच्या परवान्यासाठी अर्जदाराला डोप टेस्ट देणे अनिवार्य केले होते. सद्यस्थितीत पंजाबमध्ये अमली पदार्थांचे सेवन ही गंभीर समस्या बनली आहे. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतही अमली पदार्थांचा मुद्दा ऐरणीवर होता.

मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह

3. दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर महासभा 2 आणि 3 जुलै ला कोठे होत आहे ?

A. नवी दिल्ली (भारत)
B. पॅरीस (फ्रान्स)
C. अस्तना(कझाकस्तान)
D. सिडनी(ऑस्ट्रेलिया )


Click for answer

C. अस्तना(कझाकस्तान)

कझाकस्तानची राजधानी अस्तना येथे होत असलेल्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय महापौर महासभेला जगभरातील महापौर उपस्थित राहणार आहेत.

या सभेमध्ये भारताचे नेतृत्व पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक या करणार आहेत.

4. अॅन्ड्रेस मॅन्यूल लोपेझ ओब्राडोर यांची नुकतीच कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ?

A. कोलंबिया
B. व्हेनेझुएला
C. पेरू
D. मेक्सिको


Click for answer

D. मेक्सिको

मेक्सिको शहराचे माजी महापौर राहिलेले लोपेझ ओब्राडोर 2006 सालापासून तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. ह्या वेळी ते यशस्वी झाले आहेत .त्यांना तिथं अमलो या नावानं ओळखलं जातं. ते डाव्या विचारसरणीचे नेते आहेत.

5. राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय कोठे उभारण्यात येणार आहे ?

A. ऐरोली
B. गुहागर
C. गणपती पुळे
D. तारकर्ली


Click for answer

A. ऐरोली

गेल्या वर्षी वन विभागाकडून ऐरोलीमध्ये उभारण्यात आलेल्या 'किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रा'च्या आवारात आता राज्यातील पहिले सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रात आढळणाऱ्या समुद्री जीवांच्या अवशेषांचे प्रदर्शन या संग्रहालयामध्ये करण्यात येणार आहे. संशोधन आणि प्रदर्शन अशा उद्देशाने या संग्रहालयाची निर्मिती करण्याचे वन विभागाच्या कांदळवन संरक्षण कक्षाने ठरविले आहे.

ऐरोली केंद्राच्या आवारामध्ये 'जायन्ट ऑफ दी सी ' या संकल्पनेवर आधारित सागरी जीवांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

अशा प्रकारचे महाराष्ट्रातील हे पहिलेच संग्रहालय असणार आहे.

6. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी (DDCA) कोणाची निवड झाली आहे ?

A. रजत शर्मा
B. मदनलाल
C. राकेशकुमार बन्सल
D. अरुण जेटली


Click for answer

A. रजत शर्मा

दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, अध्यक्षपदी इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा हे बहुमताने निवडून आले आहेत. रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदनलाल यांना पराभूत करुन आपल्या नव्या इनिंगची सुरुवात केली.

7. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 100 सामने खेळणारा पहिला खेळाडू कोण ठरला ?

A. शोएब मलिक
B. विराट कोहली
C. रॉस टेलर
D. महेंद्रसिंग धोणी


Click for answer

A. शोएब मलिक

8. गाम्बिया देशाचे पूर्व राष्टपती याह्या जम्मेह ह्यांना पदच्युत केले गेल्यानंतर त्यांच्या दिमतीला असलेल्या आलिशान गाड्या आणि विमानांच्या ताफ्याचा लिलाव आता सरकारतर्फे करण्यात येणार आहे. गाम्बिया हा देश कोठे आहे ?

A. आशिया
B. दक्षिण अमेरिका
C. आफ्रिका
D. युरोप


Click for answer

C. आफ्रिका

गाम्बिया हा देश पश्चिम आफ्रिकेमध्ये असून भावी राष्ट्रपतींच्या ह्या आलिशान ताफ्याचा लिलाव करून उभारल्या जाणाऱ्या रकमेतून सामान्य जनतेच्या विकासाकरिता अनेक कल्याणकारी योजना राबविण्याचा, नव्याने सत्तेवर आलेल्या बहुपक्षीय सरकारचा मानस आहे.

पूर्व राष्ट्रपतींच्या सेवेमध्ये असलेल्या वाहनांच्या ह्या ताफ्यामध्ये पाच विमाने आणि तीस लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. ह्यामध्ये अनेक रोल्स रॉइस आणि बेंटली सारख्या महागड्या गाड्याही आहेत.

9. जागतिक UFO दिन कधी असतो ?

A. 30 जून
B. 1 जुलै
C. 2 जुलै
D. 3 जुलै


Click for answer

C. 2 जुलै

10. कोणत्या देशाने साल्वा कालवा खोदण्याकरिता निविदा मागविल्या असून ह्या कालव्याच्या माध्यमातून आपल्या देशाचे बेटामध्ये रुपांतर करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा कतार ह्या देशाने केला आहे ?

A. इराण
B. सौदी अरेबिया
C. इराक
D. तुर्कस्तान


Click for answer

B. सौदी अरेबिया

कतारच्या तिन्ही बाजूंनी समुद्र आहे तर एका बाजूला सौदी अरेबियाशी ते भूसिमेने जोडले गेले आहे. कतार आणि सौदी यांच्यामध्ये केवळ 38 मैलांची भूसीमा आहे. सौदी अरेबिया या 38 मैलांचा एक कालवा खोदण्याच्या प्रयत्नात आहे असा दावा या वर्तमानपत्रातील वृत्तामध्ये केला आहे. सौदी अरेबियाने जर असा कालवा खोदला तर कतार देश पूर्णपणे एक बेट होऊन जाईल अशी भिती या देशाने व्यक्त केली आहे.