चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -4 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. संसद अधिवेशनात रोज 10 प्रश्न विचारण्याची मुभा आजवर खासदारांना होती. पण त्यात बदल करण्यात आलेला असून, नवीन बदलानुसार लोकसभा सदस्यांना रोज कमाल किती प्रश्नांची नोटीस देता येणार आहे ?
A. 5
B. 15
C. 20
D. कोणताही बदल नाही
Click for answer
A. 5
लोकसभा अध्यक्षांच्या आदेशानुसार कोणत्याही खासदाराला लोकसभेत यापुढे एका दिवशी केवळ पाचच प्रश्नांची नोटीस देता येईल. लोकसभा अध्यक्षांचा हा नवा आदेश 16 व्या लोकसभेच्या 15 व्या सत्रापासून लागू होणार आहे.लोकसभा सरचिटणीस स्नेहलता श्रीवास्तव
2. राज्य विधिमंडळाचे ___________ अधिवेशन 4 जुलै पासून नागपूर येथे सुरू होत आहे.
A. पावसाळी
B. हिवाळी
C. उन्हाळी
D. सहामाही
Click for answer
A. पावसाळी
साधारणतः नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जाते, परंतु यावेळी पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. नागपुरात यापूर्वी केवळ तीन वेळा पावसाळी अधिवेशन झाले आहे.
1971 नंतर प्रथमच म्हणजे तब्बल 47 वर्षांनंतर नागपूरला पावसाळी अधिवेशन होत आहे.
यापूर्वी 1961, 1966 व 1971 मध्ये पावसाळी अधिवेशन नागपुरात झाले होते. 1971 नंतर मात्र हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची प्रथा सुरू झाली होती ती यंदा खंडित झाली आहे.
3. 'असा बालगंधर्व' ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?
A. आसावरी काकडे
B. अरूण कुलकर्णी
C. अभिराम भडकमकर
D. सुजाता देव
Click for answer
C. अभिराम भडकमकर
संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते नाट्य-पटकथालेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांच्या 'असा बालगंधर्व' या कादंबरीचा गोरख थोरात यांनी केलेला 'बालगंधर्व' हा हिंदी अनुवाद येतोय.
नारायण श्रीपाद राजहंस, ऊर्फ बालगंधर्व या नावाने अधिक लोकप्रिय असलेले विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते.
रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात आपल्या हुबेहुब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून ‘बाळ गंगाधर टिळकांनी’ त्यांना ‘बालगंधर्व’ ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले.
4. मानसिक आरोग्य कायदा 2017 ची अंमलबजावणी कधी पासून करण्यात येणार आहे ?
A. 7 जुलै
B. 2 ऑगस्ट
C. 1 नोव्हेंबर
D. 12 डिसेंबर
Click for answer
A. 7 जुलै
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारतातील 135 कोटी लोकसंख्येपैकी 7.5 टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. त्यातील काहींच्या विकाराचे स्वरुप सामान्य तसेच अतिशय गंभीरही आहे.
देशात मानसोपचाराच्या व्यापक सुविधा सरकारी व खासगी क्षेत्रात उभ्या राहाव्यात व त्यावर योग्य नियंत्रण असावे यासाठी हा मानसिक आरोग्य कायदा 2017 बनविण्यात आला आहे.
5. जयंत गणपत नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. ते भारताचे माजी _______________ होते.
A. हवाईदल प्रमुख
B. नौदल प्रमुख
C. भूसेना प्रमुख
D. उपराष्ट्रपती
Click for answer
B. नौदल प्रमुख
माजी नौदल प्रमुख ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचे मुंबईत सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. नाडकर्णी हे देशाचे चौदावे नौदलप्रमुख होते. डिसेंबर 1987 ते नोव्हेंबर 1990 पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळली.
6. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकाविले ?
A. भारत
B. इराण
C. पाकिस्तान
D. ऑस्ट्रेलिया
Click for answer
D. ऑस्ट्रेलिया
स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताचा पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभव झाला. भारताचा 3-1 ने पराभव करत ऑस्ट्रेलियाने १५व्या वेळेस चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली. तर भारत सलग दुसऱ्यांदा उपविजेता ठरला.
7. यावर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा कोठे होणे नियोजित आहे ?
A. मनिला
B. बँकॉक
C. जकार्ता
D. दिल्ली
Click for answer
C. जकार्ता
ही स्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 524 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.
यंदाच्या आशियाई स्पर्धेत 36 खेळांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये आठ खेळ नव्याने दिसणार आहेत.
8. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान असलेल्या नजीब रझाक यांना राज्य विकास निधी भ्रष्टाचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे ?
A. इंडोनेशिया
B. मलेशिया
C. मालदीव
D. बांगलादेश
Click for answer
B. मलेशिया
वर्ष 2009 मध्ये नजीब यांनीच स्थापन केलेल्या निधीत 70 कोटी डॉलरचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.
9. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 चा भारतीय लष्करात समावेश करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. अग्नी-5 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती आहे ?
A. 1000 किलोमीटर
B. 3000 किलोमीटर
C. 5000 किलोमीटर
D. 10000 किलोमीटर
Click for answer
C. 5000 किलोमीटर
लवकरच 'अग्नी 5' स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्त करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात.
पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी-5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकते.
10. अर्जुन पुरस्काराने सन्मानित भारताच्या महिला क्रिकेट टी-20 टीमची कर्णधार असलेली कोणती खेळाडू तिने सादर केलेले पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचे आढळल्याने चर्चेत आली आहे ?
A. हरमनप्रीत कौर
B. झुलन गोस्वामी
C. मिताली राज
D. दीप्ती शर्मा
Click for answer
A. हरमनप्रीत कौर
1 मार्चला हरमनप्रीत कौरला पंजाब पोलिसांच्या सेवेत डीएसपी म्हणून घेण्यात आलं. पंजाब पोलिसांनी हरमनप्रीतची ग्रॅज्युएशन डिग्री मेरठ विद्यापीठात पाठवली. पण तिकडे हरमनप्रीतच्या डिग्रीचा रजिस्ट्रेशन नंबर मिळाला नाही.
Newer Post
Older Post
Home