चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -2 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. एका खाजगी कंपनीच्या स्पेस रॉकेट मोमो 2 चे उड्डाण घेतानाच प्रचंड स्फोट झाला. मोमो 2 हा अग्निबाण कोणत्या देशातील कंपनीने तयार केलेला होता ?
A. जपान
B. अमेरिका
C. जर्मनी
D. उत्तर कोरिया
Click for answer
A. जपान
या रॉकेटची इंटरस्टेलर तंत्रज्ञानाने निर्मिती करण्यात आली होती. त्याचे नामकरण 'मेमो 2' असे करण्यात आले होते.
इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या "इंटरस्टेलर टेक्नोलॉजीस' या कंपनीने हे मानवविरहीत रॉकेट विकसित केले होते. जपानच्या दक्षिणी भागात होकाइदोस्थित ताइकी रेस्ट साईटवरून हे रॉकेट सोडण्यात आले होते.
2. भारतातील कोणत्या आघाडीच्या स्टील उत्पादक कंपनीचा ब्रिटन मधील उद्योग युरोपातली सगळ्यात मोठी स्टील उत्पादक कंपनी थिस्सेनक्रुप्प मध्ये विलीनीकरण करत असल्याची घोषणा केली आहे ?
A. टाटा स्टील
B. मित्तल स्टील
C. इस्पात लिमिटेड
D. जिंदाल स्टील वर्क्स
Click for answer
A. टाटा स्टील
एकत्रित कंपनी युरोपातली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी होणार आहे. या करारानंतरही UK मधले प्लान्ट बंद करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे टाटा स्टीलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
टाटा स्टील आणि थिस्सेनक्रुप्प या दोन्ही कंपन्यामध्ये मिळून सुमारे 48 हजार कामगार आहेत. अर्थात या विलीनीकरणला प्रत्यक्ष रूप हे कायदेशीर बाबी पूर्ण केल्यावर आणि युरोपियन युनियन कडून मान्यता मिळाल्यावरच आकारात येईल.
या विलीनीकरणामुळे आर्सेलर-मित्तलनंतर टाटा स्टील-थिस्सेनक्रुप्प ही युरोपातली सगळ्यात मोठी स्टील कंपनी ठरणार आहे. या नव्या कंपनीची वार्षिक विक्री 13 बिलियन पाऊंडच्या आसपास असणार आहे. तर, या कंपनीचं कार्यालय नेदरलँड्समध्ये असेल.
टाटा स्टीलचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन .
3. खालीलपैकी कोण भारतातील पहिल्या तृतीयपंथी वकील बनल्या आहेत ?
A. गंगा कुमारी
B. सत्यश्री शर्मिला
C. ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली
D. प्रीतिका यशिनी
Click for answer
B. सत्यश्री शर्मिला
तामिळनाडू आणि पुद्दूचेरीच्या बार कॉन्सिलमध्ये त्यांनी नोंदणी केली आहे.
गेल्या वर्षी राजस्थान पोलीस दलामध्ये पहिल्यांदाच तृतीयपंथी महिला कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिनेश मेहता यांच्या आदेशानंतर गंगा कुमारी यांची कॉन्स्टेबलपदी नियुक्ती करण्यात आली होती.
तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यापासून 12 किमी अंतरावर 3000 लोकसंख्येचे तरंगफळ गावाचे सरपंच पद ज्ञानेश्वर कांबळे उर्फ माऊली ह्या तृतीयपंथी व्यक्तीस अलीकडेच मिळाले.
तर प्रीतिका देशातल्या पहिल्या तृतीयपंथी सब-इन्स्पेक्टर ठरल्या आहेत. 2017 मध्ये तामिळनाडूमध्ये त्यांची या पदावर नियुक्ती झाली .
4. जागतिक सोशल मिडिया दिन कधी पाळला गेला ?
A. 29 जून
B. 30 जून
C. 1 जुलै
D. 2 जुलै
Click for answer
B. 30 जून
5. थाम लुआंग नँग नोन गुहा(Tham Luang Nang Non cave system)कोणत्या देशात आहेत ?
A. व्हिएतनाम
B. फिलिपाईन्स
C. उत्तर कोरिया
D. थायलंड
Click for answer
D. थायलंड
थायलंडची युवा फुटबॉल टीम आणि त्यांचा प्रशिक्षक ह्या गुहांमध्ये अडकून पडल्यानंतर त्यांच्या शोधार्थ 23 जून पासून प्रयत्न सुरू आहेत. आंतरराष्ट्रीय संघटनांनी त्यात सहभाग घेत एकत्र मोहीम हाती घेतली आहे
थायलंड च्या चियांग राय प्रांतामध्ये थाम लुआंग नँग नोन (Tham Luang Nang Non cave system)नावाच्या गुहेमध्ये खेळाडू व प्रशिक्षक गेले होते. जोरदार पावसामुळे गुहेच्या द्वाराजवळ पाण्याचा वेगवान प्रवाह वाहत आहे. त्यामुळे ते सर्व आत अडकून पडले.
ही गुहा पाहाण्यासाठी शेकडो लोक येत असतात. जमिनीखाली अनेक किलोमिटरचे जाळे असणारी गुहा पर्यटकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.
6. कोणत्या राज्यसरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली ते दहावीपर्यंत शिकणार्या 44.57 लाख विद्यार्थ्यांना एक जोड बूट व दोन बूट सॉक्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे ?
A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश
C. कर्नाटक
D. दिल्ली
Click for answer
C. कर्नाटक
7. दूरसंचार कंपन्या तसेच अन्य सेवांकरिता इलेक्ट्रॉनिक केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना आधार क्रमांक द्यायची इच्छा नसलेल्या ग्राहकाला युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून (यूआयडीएआय) मिळणारा व्हर्चुअल ओळख क्रमांक (व्हीआयडी) देता येणार आहे. हा व्हर्च्युअल क्रमांक किती अंकीआहे ?
A. दहा अंकी
B. बारा अंकी
C. तेरा अंकी
D. सोळा अंकी
Click for answer
D. सोळा अंकी
सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना ग्राहकाने आपली मर्यादित स्वरुपात माहिती पुरवावी असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.
बँका व प्राप्तीकर खात्याला एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती मिळविण्याची मुभा आहे. मात्र अन्य सेवा देणाऱ्या कंपन्यांना आधारमधील नाव, पत्ता व छायाचित्र इतकीच माहिती मिळेल.
8. फुटबॉल विश्वातील दोन सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणारे मेस्सी आणि रोनाल्डो हे खेळाडू फिफा विश्वचषक 2018 मध्ये अनुक्रमे कोणत्या संघांकडून खेळले ?
A. फ्रान्स आणि जर्मनी
B. अर्जेन्टिना आणि पोर्तुगाल
C. ब्राझील आणि पोर्तुगाल
D. अर्जेन्टिना आणि ब्राझील
Click for answer
B. अर्जेन्टिना आणि पोर्तुगाल
या स्टार खेळाडूंच्या संघांना स्पर्धेच्या दुसर्या टप्प्यातच गाशा गुंडाळावा लागला. मेस्सीचा अर्जेंटिना संघा फ्रान्सकडून तर पोर्तुगल संघ उरुग्वेकडून पराभूत झाला. या दोन्ही लढतीत आपल्या संघाचे नेतृत्त्व करणार्या मेस्सी आणि रोनाल्डोला एकही गोल करता आला नाही.
9. शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे . सध्या ह्या पदावर कोण आहे ?
A. आदेश बांदेकर
B. सुरेश हावरे
C. प्रदीप कुमार सिंह
D. अतुल भोसले
Click for answer
B. सुरेश हावरे
10. मोहम्मद हुसैन शेख या उमेदवाराने तब्बल 403 अरब रुपयांची संपत्ती घोषित केल्याने ते चर्चेत होते. ते कोणत्या देशातील आगामी निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत ?
A. बांगलादेश
B. इराण
C. अफगाणिस्तान
D. पाकिस्तान
Click for answer
D. पाकिस्तान
मोहम्मद हुसैन शेख NA-182 आणि PP-270 या जागांसाठी निवडणूक लढत आहेत. मुजफ्फरगड शहरातील जवळपास 40 टक्के जमिनीचा मालक असल्याचा दावा मोहम्मद हुसैन शेख यांनी केला आहे.
Newer Post
Older Post
Home