चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -1 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. कोणत्या बँकेतील 51 टक्के भांडवली हिस्सा विकत घेण्यास आयआरडीएआयने (इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडिया) भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ला परवानगी दिली आहे ?

A. स्टेट बँक ऑफ इंडिया
B. आयडीबीआय बँक
C. आयसीआयसीआय बँक
D. देना बँक


Click for answer

B. आयडीबीआय बँक

आयडीबीआय बँकेत सध्या एलआयसीचे 11 टक्के भांडवल आहे.

एखाद्या विमा कंपनीचे बँकेत अथवा कंपनीत जास्तीत जास्त 15 टक्के भांडवल असावे असा आयआरडीएआयचा नियम असून एलआयसीसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे.

2. करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कधी पर्यंत वाढविली आहे ?

A. 31 जुलै 2018
B. 31 ऑगस्ट 2018
C. 31 डिसेंबर 2018
D. 31 मार्च 2019


Click for answer

D. 31 मार्च 2019

लिंक करण्यासाठी दिलेली मुदत आतापर्यंत 31 जुलै 2017, 31 ऑगस्ट 2017, 31 डिसेंबर 2017, 31 मार्च 2018 आणि 30 जून 2018 याप्रमाणे वाढवून देण्यात आली होती. ही मुदत आता पुन्हा 31 मार्च 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

3. ___________ मधील 19 व्या शतकातील व्हिक्‍टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

A. नवी मुंबई
B. मुंबई उपनगर
C. दक्षिण मुंबई
D. आग्रा


Click for answer

D. दक्षिण मुंबई

यात मुंबई विद्यापीठ इमारत, जुने सचिवालय, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, डेव्हिड ससून ग्रंथालय. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि आर्ट डेकोच्या सार्वजनिक इमारतींचा समावेश आहे. बॅकबे आगारातील स्कीमची पहिली ओळ, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया राम महाल यांनी दिनशॉ वाचा रोड, इरॉस व रीगलचे सिनेमागृह आणि मरीन ड्राईव्हवरील इमारतींच्या पहिल्या ओळी यासारख्या इमारती या इमारती आहेत.

बहरीन येथे सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. त्यामुळे राज्यात पाचव्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश होणार असून भारतातील सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान असलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरले आहे.

19 व्या शतकातील व्हिक्टोरियन संरचना आणि 20 व्या शतकातील आर्ट डेको इमारतींचा यात समावेश आहे. व्हिक्टोरियन स्थापत्य शैलीच्या इमारती मुख्यत्त्वे करून मुंबईतील फोर्ट भागात आहेत, तर मरिन ड्राइव्ह परिसरातल्या इमारतींचा समावेश हा आर्ट डेको इमारतींमध्ये होतो.

4. खालीलपैकी कोण पाकिस्तानमधील पहिले शीख वृत्तनिवेदक ठरले आहेत ?

A. परमित सिंग
B. हरमित सिंग
C. जगजीत सिंग
D. मिल्खा सिंह


Click for answer

B.हरमित सिंग

हरमित सिंग हे खैबर पख्तुख्वा प्रांताच्या चेक्सार शहराचे रहिवासी असुन आता एका पब्लिक न्यूज वाहिनीचे सदस्य आहेत. सिंग यांनी फेडरल उर्दू विद्यापीठातून पत्रकारितेची पदवीव्युत्तर पदवी घेतली आहे.

नुकतीच, मनमीत कौर पाकिस्तानमधील पहिली महिला शीख पत्रकार बनली आहे.

5. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. सुबोधकुमार जयस्वाल
B. सतीश माथूर
C. दत्ता पडसलगीकर
D. रश्मी शुक्ला


Click for answer

A. सुबोधकुमार जयस्वाल

महाराष्ट्र केडरचे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले जयस्वाल प्रतिनियुक्तीवर केंद्रात 'रॉ' या गुप्तचर यंत्रणेत कार्यरत होते.

अलीकडेच राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले. दत्ता पडसलगीकर या मुंबईच्या पूर्वीच्या आयुक्तांची नियुक्ती महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून झाली आहे. दत्ता पडसलगीकर हे आयुक्त होण्यापूर्वी 'आयबी'मध्ये होते.

6. निवडणूक काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी होणाऱ्या गैरप्रकारांना लगाम घालण्याकरिता निवडणूक आयोग कोणते मोबाइल अॅप विकसित करीत आहे ?

A. ई-चुनाव
B. ई-नेत्र
C. पथदर्शी
D. पारदर्शी


Click for answer

B. ई-नेत्र

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये या अॅपचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार आहे. या अॅपद्वारे कोणीही संबंधित घटनेचा व्हिडिओ अपलोड करू शकतो.

व्हिडिओ नसला तरीही तक्रार करता येणार आहे. मात्र, त्यासाठी इतर ठोस पुरावे असणे गरजेचे आहे.

7. स्वेपटेल ही जगातील सर्वात महागडी कार कोणत्या कार उत्पादकाने तयार केली आहे ?

A. बीएमडब्लू
B. डेमलर
C. रोल्स रॉयस
D. फेरारी


Click for answer

C. रोल्स रॉयस

शानदार आणि लग्झरी कार निर्मितीसाठी जगभरात नाणावलेली कंपनी रोल्स रॉयसने 84 कोटी रुपये किमतीची ही कार एका खास ग्राहकाच्या मागणीनुसार बनविली आहे. या कार मुळात कस्टमाइज असतात. त्या यंत्रांच्या साहाय्याने नाही तर माणसे हाताने तयार करतात. त्यामुळे एक कार दुसरीसारखी नसते हे यांचे वैशिष्ठ. प्रत्येक कारचे इंटिरियर, रंग वेगळा असतो.

8. या महिन्यात लंडनमध्ये सुरू होणार्‍या विश्वचषक महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व कोणाकडे देण्यात आलेले आहे ?

A. राणी रामपाल
B. सुनिता
C. दीप ग्रेस एैका
D. गुरुजीत कौर


Click for answer

A. राणी रामपाल

9. नाणार रिफायनरी उभारणीसाठी केंद्र सरकार आणि कोणत्या देशाची आरामको कंपनी यांच्यात पहिला करार झाला ?

A. जपान
B. अमेरिका
C. इराण
D. सौदी अरेबिया


Click for answer

D. सौदी अरेबिया

रत्नागिरी जिल्हयातील ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती व विकास करण्यासाठी सौदी अरामको आणि एडनॉक कंपन्यांमध्ये 3 लाख कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. रत्नागिरी जिल्हयात "रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमीकल प्रकल्प उभारण्यात येत आहे.

शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड (आयाओसीएल), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) आणि पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी 50:25:25 प्रमाणे भागिदारीतून "आरआपीसीएल' या संयुक्त प्रकल्पाची 22 सप्टेंबर 2017 रोजी स्थापना केली.

सामंजस्य करारामुळे रत्नागिरीतील आरआरपीसीएल प्रकल्पाच्या निर्मिती व विकासासाठी भारतीय तेल कंपन्या व सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये 50:50 प्रमाणे भागीदारी निश्‍चित झाली आहे.

या प्रकल्पातून दिवसाला 1.2 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलावर (क्रूड ऑईल) प्रक्रिया करण्यात येईल.

10. पुरीचे जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिर कोणत्या राज्यात आहे ?

A. तेलंगणा
B. ओडिशा
C. पश्चिम बंगाल
D. आंध्रप्रदेश


Click for answer

B. ओडिशा

पुरीच्या जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि देशाच्या प्रथम महिला सविता कोविंद यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुरी जिल्हा प्रशासनाने मंदिरातील सेवकांविरोधात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.