चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -30 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. केंद्रीय अप्रत्यक्ष कर व सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. हसमुख अढीया
B. एस. रमेश
C. वनजा एस. सरना
D. गिरीशचंद्र चतुर्वेदी


Click for answer

B. एस. रमेश

अप्रत्यक्ष करांबाबत धोरण ठरविणारी "सीबीआयसी' ही सर्वोच्च संस्था आहे. विद्यमान अध्यक्षा वनजा एस. सरना यांची जागा आता रमेश घेतील.

सरना यांची वस्तू व सेवाकर नेटवर्कच्या (जीएसटीएन) अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्‍यता आहे.

रमेश हे भारतीय महसूल सेवेच्या 1981 च्या तुकडीचे अधिकारी आहेत."सीबीआयसी'च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने त्यांना विशेष सचिवांचा दर्जा मिळणार आहे.

2. मुंबईतील घाटकोपरच्या परिसरात अपघातग्रस्त होवून कोसळलेले चार्टर्ड विमान कोणत्या कंपनीच्या मालकीचे होते ?

A. 'यूवाय'' अॅव्हिएशन
B. पवनहंस अॅव्हिएशन
C. उत्तरप्रदेश सरकार
D. एअर वन अॅव्हिएशन


Click for answer

A. 'यूवाय'' अॅव्हिएशन

3. बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार तात्पुरता खालीलपैकी कोणाकडे सोपवण्यात आला आहे ?

A. ए. सी. राऊत
B. राजेंद्रकुमार गुप्ता
C. रवींद्र मराठे
D. सुशील मुहनोत


Click for answer

A. ए. सी. राऊत

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक राजेंद्रकुमार गुप्ता यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काही दिवसांपुर्वी अटक केली होती.

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता रवींद्र मराठे आणि आर. के. गुप्ता यांच्याकडील पदभार काढून घेण्यात आला आहे.

4. अलीकडेच कोणत्या देशात शेतकरी समुदायावर भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी केलेल्या हल्ल्यात 86 जण मृत्युमुखी पडले ?

A. दक्षिण सुदान
B. नायजेरिया
C. केनिया
D. झिम्बाबे


Click for answer

B. नायजेरिया

मध्य नायजेरियात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, त्या पार्श्वभूमीवर नायजेरियाचे अध्यक्ष मुहम्मदू बुहारी यांनी शांतता राखण्याचे आव्हान केले आहे.

बेरॉम या शेतकरी समुदायातील नागरिकांनी गुरुवारी फुलानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भटक्‍या जमातीमधील नागरिकांवर हल्ला केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी भटक्‍या जमातीच्या नागरिकांनी शेतकरी समुदायावर हल्ला केला होता. त्यात 86 जण मृत्युमुखी पडले

5. आयसीआयसीआई बॅंकेने नुकतेच खालीलपैकी कोणाला गैर कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे ?

A. गिरीशचंद्र चतुर्वेदी
B. एम. के. शर्मा
C. संदीप बक्षी
D. चंदा कोचर


Click for answer

A. गिरीशचंद्र चतुर्वेदी

आयसीआयसीआई बॅंकेने माजी पेट्रोलियम सचिव गिरीशचंद्र चतुर्वेदी यांना गैर कार्यकारी चेअरमन म्हणून नियुक्त केले आहे. एम. के. शर्मा यांचा कार्यकाळ 30 जून 2018 रोजी संपत आहे.

1 जुलै 2018 पासून तीन वर्षांसाठी चतुर्वेदी यांची नियुक्ती प्रभावी ठरणार आहे.

त्याआधी बँकेने 19 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बक्षी (सीओओ) बनविले होते.

व्हिडीओकॉन कर्जाच्या प्रकरणांत अंतर्गत तपासणी पूर्ण होईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर सुट्टीवर असणार आहेत.

6. माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र सरकारने देशभरात कितवा क्रमांक पटकावला आहे ?

A. पहिला
B. दुसरा
C. चौथा
D. सातवा


Click for answer

B. दुसरा

केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ राज्य देशात प्रथम, महाराष्ट्र द्वितीय आणि तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे

. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला वर्ष 2030 पर्यंत प्रत्येकी 1000 गर्भवती महिलां मागे 70 पर्यंत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य दिले होते. केरळ राज्याने हा मृत्यूदर 46 पर्यंत आणलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर 61 पर्यंत असून तामिळनाडूमध्ये हा दर 68 पर्यंत आहे.

7. महान संत आणि कवी कबीर यांची कितवी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली ?

A. 100 वी पुण्यतिथी
B. 200 वी पुण्यतिथी
C. 300 वी पुण्यतिथी
D. 500 वी पुण्यतिथी


Click for answer

D. 500 वी पुण्यतिथी

संत कबिरांची समाधी उत्तरप्रदेशातील मगहर येथे आहे .

8. मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी कोणता म्युझिक व्हिडीओ स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत असलेल्या 'युएन वुमन इंडिया'ने लाँच केला आहे ?

A. आज की नारी , सब पे भारी
B. छोटीसी आशा
C. मुझे हक है
D. आज मै उपर


Click for answer

C. मुझे हक है

आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी युएन वुमन्स ही संस्था आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील सशक्त महिलांना ह्या व्हिडिओमध्ये चित्रीत करण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉ. सईदा हमिद यांसोबत सई ताम्हणकरलाही स्थान मिळाले आहे.

9. सामाजिक संस्था बचपन बचाव आंदोलन आणि कॅपजेमिनी यांनी तयार केलेल्या हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी साहाय्यकारी ठरू शकणाऱ्या कोणत्या मोबाइल ॲप्लिकेशनचा शुभारंभ केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाला ?

A. क्राय मी
B. किड्स हेल्प
C. रियुनाइट
D. रेनबो


Click for answer

C. रियुनाइट

बेपत्ता मुलांची छायाचित्रे, नाव-पत्ता यासह संपूर्ण माहिती, पोलीस ठाण्यातली नोंद या ॲपवर पालक आणि नागरिक देऊ शकतात. छायाचित्रांचे मोबाईल फोनच्या फिझिकल मेमरीत जतन होणार नाही. ॲण्ड्राइड आणि आयओएस दोन्हीवर हे ॲप उपलब्ध आहे.

नोबेल पुरस्कार विजेते आणि बचपन बचाव आंदोलनाचे संस्थापक कैलाश सत्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

10. महान संख्याशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने किती रुपयाचे विशेष नाणे प्रकाशित केले आहे ?

A. 50 रूपये
B. 75 रूपये
C. 100 रूपये
D. 125 रूपये


Click for answer

D. 125 रूपये

2007 सालापासून केंद्र सरकारने 29 जून हा दिवस सांखिकी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

महान संख्याशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक प्रशांतचंद्र महालनोबीस यांच्या 29 जून रोजीच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने त्याचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने 125 रु.चे विशेष नाणे प्रकाशित केले असून उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू याच्या हस्ते हे नाणे शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. याचबरोबर 5 रु.मूल्याचे नवे नाणेही प्रकाशित झाले आहे.

सांख्यिकी शास्त्राच्या सामाजिक आर्थिक योजना व गणना यामध्ये उपयोजितेत महालनोबीस याचे योगदान फार मोठे आहे. महालनोबीस यांनी त्यांच्या साथीदारांसह इंडिअन स्टॅटीसटिकल इन्सटीट्युटची स्थापना 1931 साली केली होती.

गुगलनेही 29 जून रोजी महानोलबीस याच्यावर डूडल बनवून त्यांचे स्मरण केले आहे.