चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -8 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. बँकांच्या प्रचंड तुंबलेल्या अनुत्पादित मालमत्ता (एनपीए)चे वेगाने निराकरण करण्यासाठी विविध कर्जदात्या संस्थांमध्ये प्रभावी समन्वय आणि आदानप्रदानासाठी 'आंतर-कर्जदाता सामंजस्य' आकृतीबंधाला बँकप्रमुखांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे बिगर-कार्यकारी अध्यक्ष सुनील मेहता यांच्या समितीच्या कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत शिफारसींनुसार हा आकृतीबंध बँकांच्या संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर या महिनाअखेपर्यंत आकाराला येणे अपेक्षित आहे ?

A. प्रोजेक्ट पुनर्निर्माण
B. प्रोजेक्ट सशक्त
C. प्रोजेक्ट जीवन
D. प्रोजेक्ट अमृत


Click for answer

A. प्रोजेक्ट सशक्त

सुनील मेहता यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा तिढा सोडविण्यासाठी स्वतंत्र सरकारी मालमत्ता व्यवस्थापन कंपनी स्थापण्याची सूचना केली आहे.

मेहता समितीने सादर केलेल्या आराखडय़ात 50 कोटी रुपयांपर्यंत, 50 ते 500 कोटी रुपयांपर्यंत तसेच 500 कोटी रुपयांवरील थकित कर्जे अशी वर्गवारी करताना त्यासाठी विविध उपाय सुचविले आहेत.

2. भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना किती वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे ?

A. 7 वर्षे
B. 10 वर्षे
C. 5 वर्षे
D. 3 वर्षे


Click for answer

ब. 10 वर्षे

लंडन येथील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही शिक्षा देण्यात आली. याव्यतिरिक्त त्यांची मुलगी मरियम शरीफ हिला 7 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. तर मुलाला एका वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तसेच न्यायालयाने नवाज शरीफ यांना 80 लाख पाउंड आणि मरियम शरीफ हिला 2 लाख पाउंड दंड सुनावला आहे. लंडन मधील एवनफिल्ड हाऊस मध्ये 4 घरांच्या खरेदी संदर्भातला हा घोटाळा आहे.

पनामा पेपर प्रकरणात आलेल्या निर्णयानंतर शरीफ यांना त्यांचे पंतप्रधानपद गमवावे लागले.

3. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णयापाठोपाठ आता कोणत्या राज्याने 15 जुलै पासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्याची घोषणा केली आहे ?

A. उत्तरप्रदेश
B. कर्नाटक
C. पश्चिम बंगाल
D. गुजरात


Click for answer

A. उत्तरप्रदेश

4. 'नीट' आणि 'जेईई' ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. ह्या परीक्षा अनुक्रमे कोणत्या विद्याभ्यासाच्या शाखांत प्रवेश मिळविण्यासाठी द्याव्या लागतात ?

A. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शास्त्र
B. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय
C. वैद्यकीय आणि औषधनिर्माण
D. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी


Click for answer

D. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी

या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार आहेत.

5. 'ओम शिनरिकयो' या अघोरी पंथाची स्थापना करणाऱ्या शोको असहारा या व्यक्तीला कोणत्या देशाने नुकतेच फासावर लटकवले ?

A. उत्तर कोरिया
B. दक्षिण कोरिया
C. सिंगापूर
D. जपान


Click for answer

D. जपान

20 मार्च 1995 साली त्याने मेट्रो ट्रेनमध्ये सरीन नावाचा विषारी वायू सोडला, ज्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला तर 6 हजार जण अत्यवस्थ झाले होते. सुदैवाने त्याचा कट फसला अन्यथा जपानमधल्या हजारो लोकांचा जीव गेला असता.

असहारा अंध होता.

6. वर्ल्ड चॉकलेट डे कधी साजरा करण्यात आला ?

A. 4 जुलै
B. 5 जुलै
C. 6 जुलै
D. 7 जुलै


Click for answer

D. 7 जुलै

दरवर्षी 7 जुलै हा दिवस वर्ल्ड चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो

7. जस्टिन ट्रुडो हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?

A. कॅनडा
B. इटली
C. जपान
D. स्वीडन


Click for answer

A. कॅनडा

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो हे एका महिला पत्रकाराची छेड काढल्याच्या आरोपावरून वादात सापडले आहेत. 2000 साली एका स्थानिक वृत्तपत्राबरोबर काम करताना या महिला पत्रकाराबरोबर ही घटना झाल्याचं वृत्त अलीकडेच आलं होतं.

ट्रुडोंनी महिला पत्रकाराच्या विनयभंगाचा आरोप फेटाळला आहे.

8. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रामध्ये ____________ लोक मराठी भाषा तर 13 टक्के लोक हिंदी बोलतात.

A. 100 टक्के
B. 87 टक्के
C. 69 टक्के
D. 43 टक्के


Click for answer

C. 69 टक्के

9. सर्वात धनाढ्य उद्योजकांच्या यादीत वॉरन बफे यांना पिछाडीवर टाकत फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग जगातले कितव्या क्रमांकाचे धनाढ्य व्यक्ती बनले आहेत ?

A. चौथ्या
B. तिसऱ्या
C. दुसऱ्या
D. प्रथम


Click for answer

B. तिसऱ्या

त्यांच्या पुढे फक्त अॅमेझॉन संस्थापक जेफ बेझोस आणि मायक्रोसॉफ्ट फाउंडर बिल गेट्स आहेत. इतिहासात पहिल्यांदाच टॉप-3 धनाढ्य लोकांमध्ये सगळेच केवळ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीमंत बनलेले लोक आहेत.

10. कोणत्या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही राज्यातील शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे ?

A. पवित्र
B. सारथी
C. गुरुजी
D. महा-गुरू


Click for answer

A. पवित्र

खासगी शिक्षण संस्थांच्या शाळा त्याचप्रमाणे समाज कल्याण विभाग, आदिवासी विभाग यांच्या अंतर्गत होणारी शिक्षक भरती ही त्या-त्या विभागाकडून स्वतंत्रपणे केली जात होती, परंतु आता 'पवित्र' या वेबपोर्टलच्या माध्यमातून ही शिक्षक भरती केंद्रीय पद्धतीने एकाच प्रणालीमार्फत केली जाणार आहे.