चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -13 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. जागतिक अॅथएलेटीक्स स्पर्धेच्या 20 वर्षांखालील 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्णपदक पटकाविले ?
A. नीरज चोप्रा
B. सीमा अन्टील
C. नवजीत कौर धिल्लन
D. हिमा दास
Click for answer
D. हिमा दास
अंतिम फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये हे अंतर पार करत अव्वल क्रमांक पटकावला .जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. फिनलंडमधील टाम्पेरे येथे झालेल्या IAAF वर्ल्ड अंडर अॅथएलेटीक्स स्पर्धेत तिने हा इतिहास रचला.
आसामची रहिवाशी असलेल्या हिमाने एप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथील राष्ट्रकुलस्पर्धेमध्ये भारतीय अंडर 20 मध्ये सहाव्या स्थानावर राहिली होती.
2. रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासनाने 'रामायण एक्स्प्रेस' या नावाने नवी रेल्वे सुरु केली आहे. 14 नोव्हेंबर रोजी ही रेल्वे कोठून रवाना होणार आहे ?
A. दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन
B. उत्तरप्रदेशातील अयोध्या रेल्वे स्थानकावरून
C. तामिळनाडूतील कन्याकुमारी रेल्वे स्थानकावरून
D. महाराष्ट्रातील नाशिक रेल्वे स्थानकावरून
Click for answer
A. दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन
सुरुवातीला आयोध्या, हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर या ठिकाणी रेल्वे जाईल. त्यानंतर रेल्वे नंदिग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल.
3. 'सूरमा' हा चित्रपट कोणत्या खेळाडूच्या आयुष्यावर बेतलेला आहे ?
A. गौतम गंभीर
B. संदीप सिंह
C. प्रकाश पदुकोण
D. विश्वनाथन आनंद
Click for answer
B. संदीप सिंह
भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांज, तापसी पन्नू, अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत.
4. प्रसिद्ध पत्रकार मोहनदीप यांनी अभिनेत्री रेखा यांच्यावर__________ नावाचे पुस्तक लिहीले आहे ?
A. EUREKHA
B. I REKHA
C. REKHA - AN ERA
D. REKHA - THE LIVING LEGEND
Click for answer
A. EUREKHA
आपण अॅप च्या आता पर्यंतच्या प्रवासाविषयी समाधानी असल्यास प्ले स्टोअर ला आम्हाला 5 रेटिंग द्या. काही सूचना/नवीन काही गोष्टी अॅप मध्ये हव्या असल्यास आम्हाला mpsc.mitra@gmail.com या मेल आय डी वर मेल करा.
5. क्रोएशियाच्या अध्यक्षा कोण आहेत ?
A. डोरिस लिउथार्ड
B. कोलिंडा ग्रेबर कितारोविक
C. लॉरा चिनचिया मिरांदा
D. अमीना गुरीब-फकीम
Click for answer
B. कोलिंडा ग्रेबर कितारोविक
50 वर्षीय कोलिंडा क्रोएशियाच्या चौथ्या राष्ट्राध्यक्षा आहेत. जानेवारी 2015 मध्ये त्या क्रोएशियाच्या राष्ट्राध्यक्ष झाल्या. नाटोमध्ये त्यांनी असिस्टेंट सेक्रेटरी जनरलचं पद देखील सांभाळलं आहे.
कोलिंडा यांना क्रोएशियन शिवाय इंग्लिश, स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषेचं देखील ज्ञान आहे. याशिवाय त्या फ्रेंच, जर्मन आणि इटली भाषा देखील बोलतात.
6. योग्य व्हीसा नसल्याचे कारण देत भारताने ब्रिटीश खासदार लॉर्ड अलेक्झांडर कॅरलिल यांना दिल्ली विमानतळावरून परत पाठविले. ते कोणाचे वकील म्हणून काम पाहत आहेत ?
A. तस्लिमा नसरीन
B. खालिदा झिया
C. नवाझ शरीफ
D. परवेझ मुशर्रफ
Click for answer
B. खालिदा झिया
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि बीएनपी पक्षाच्या अध्यक्षा खालिदा झिया सध्या तुरुंगात आहेत. लॉर्ड कॅरलिल त्यांचा खटला चालवत असून त्या खटल्याबाबत पत्रकार परिषद घेण्यासाठी ते भारतात आले होते. मात्र त्यांच्याकडे योग्य व्हीसा नसल्याचे सांगत विमानतळावरूनच माघारी जाण्यास सांगण्यात आले.
7. अमेरिकेतील मिशिगन राज्याने गुरुदेव श्री श्री रवि शंकर ह्यांच्या प्रति विशेष आदर व्यक्त करीत, त्यांच्या नावे _________हा दिवस दरवर्षी 'श्री श्री रवि शंकर दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.
A. 2 जुलै
B. 7 जुलै
C. 10 जुलै
D. 12 जुलै
Click for answer
B. 7 जुलै
लक्षावधी लोकांना योग आणि ध्यानाद्वारे जीवनात आनंद फुलविण्याच्या कार्याप्रति आदर व्यक्त करीत डेट्रॉईटच्या महापौरांनी ही घोषणा केली. अमेरिका आणि कॅनडाच्या पंचवीसहून अधिक शहरे यामध्ये सहभागी झाली आहेत. श्री श्री रविशंकर यांच्या सन्मानाप्रति त्यांना तीन देशांकडून सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त झालेला आहे.
8. चीनने एक संतती धोरण कोणत्या वर्षी स्वीकारले होते ?
A. 1965 साली
B. 1971 साली
C. 1979 साली
D. 2016 साली
Click for answer
C. 1979 साली
त्यामुळे देशात युवकांची संख्या कमी होऊन वृद्ध लोकांची संख्या वाढत होती. हे धोरण 2016 रद्द केले होते, मात्र पती - पत्नीला केवळ दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली.चीन सरकारने स्वीकारलेल्या संतती नियोजनाच्या धोरणामुळे 2050 पर्यंत देशाची लोकसंख्या भारताच्या लोकसंख्येच्या केवळ 65 टक्के एवढी असेल, असा इशारा देताना चीनमधील युनिव्हर्सिटी ऑफ व्हिस्कॉन्सिन - मॅडिसन येथील संशोधक यी फुजियान यांनी हे वादग्रस्त धोरण रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
9. श्रीनिवास शिंदगी यांचे 12 जुलै रोजी निधन झाले. ते ___________________चे जनक म्हणून ओळखले जातात.
A. संगीत रंगभूमी
B. प्रायोगिक रंगभूमी
C. बाल रंगभूमी
D. व्यावसायिक रंगभूमी
Click for answer
C. बाल रंगभूमी शिंदगी
याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी 'बालरंगभूमीचे जनक ' अशी उपाधी दिली होती. अनेक सामाजिक संस्थांच्या मदतीसाठी शिंदगी यांच्या अनेक बालनाट्याचे प्रयोग सादर करण्यात आले आहेत. श्रीनिवास शिंदगी यांनी आजवर 20 नाटके लिहिली त्यापैकी 15 बालनाट्ये आहेत. त्यांचे पुंगीवाला हे नाटक अभिनेत्री सुलभा देशपांडे यांनी दिग्दर्शित केले. शिंदगी यांनी लिहिलेली पुंगीवाला, एक मुंगी नेसली लुंगी, मिठाईचे घर, स्वर्गातील माळ, लाटूशेट वाटूळा, बोलका आरसा, भूमिपुत्रांचे वनपूजन, दहा लाखाचा धनी यासारखी अनेक बालनाट्ये गाजली. शिंदगी यांनी सामाजिक जाणिवेचे भान जपत 'भूमिपुत्रांचे वनपूजन' हे संगीतमय बालनाट्य लिहिले. या बाल नाट्याला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङमय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.
10. जगातील सर्वात कमी वयाचा स्वकमाई तून झालेला/ली अब्जाधीश कोण आहे ?
A. मार्क झुकरबर्ग
B. केली जेनर
C. अलेक्झांडर आंद्रेसन
D. जॉन कॉलीसन
Click for answer
B. केली जेनर
फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हा 23 व्या वर्षी अब्जाधीश झाला होता. पण वयाच्या विसाव्या वर्षी केली जेनर हिने अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय.
केलीची सध्याची संपत्ती ही 61 अब्ज 74 कोटींच्या घरात असल्याचे ‘फोर्ब्स’ मासिकानं म्हटले आहे. दोन वर्षांपूर्वी केलीने सुरू केलेल्या ‘केली कॉस्मेटिक्स’या प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनी च्या यशाने हे साध्य झाले आहे.
केली ही मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे.
आतापर्यंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता.
आपण अॅप च्या आता पर्यंतच्या प्रवासाविषयी समाधानी असल्यास प्ले स्टोअर ला आम्हाला 5 रेटिंग द्या. काही सूचना/नवीन काही गोष्टी अॅप मध्ये हव्या असल्यास आम्हाला mpsc.mitra@gmail.com या मेल आय डी वर मेल करा.
Newer Post
Older Post
Home