चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -12 जुलै 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. "An Uncertain Glory: India and its Contradictions"(भारत आणि त्याचे विरोधाभास ) ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
A. अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ
B. संजीव वर्मा
C. सत्या नादेला
D. यशवंत सिन्हा आणि विनय श्रीवास्तव
Click for answer
A. अमर्त्य सेन आणि जीन ड्रेझ
अमर्त्य सेन यांच्या 'भारत और उसके विरोधाभास' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच पडला. यावेळी बऱ्याच गोष्टी चुकीच्या वळणावर गेल्या आहेत. यापूर्वीच्या सरकारच्या काळात शिक्षण आणि आरोग्यासाठी पुरेशी तजवीज झाली होती, असे नव्हे. मात्र, 2014 पासून ही दोन क्षेत्रे कमालीच्या वेगाने चुकीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे सेन यांनी सांगितले.
2. तब्बल 66 वर्षानंतर नखे कापण्यामुळे चर्चेत आलेले गृहस्थ कोण ?
A. श्रीधर चिल्लाल
B. श्रीधर देशपांडे
C. श्रीधर जोग
D. श्रीधर कुलकर्णी
Click for answer
A. श्रीधर चिल्लाल
श्रीधर चिल्लाल असे या गृहस्थांचे नाव असून त्यांचे वय आता 82 वर्षे आहेत. त्यांनी शेवटची नखे कापली 1952 साली. नखे कापण्याचा कार्यक्रम न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये होणार आहे. त्यांच्या नखांमुळे त्यांची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.
श्रीधर चिल्लाल हे मूळचे पुण्याचे आहेत. ही नखे कापल्यानंतर रिप्लेज संग्रहालयातच ठेवण्यात येणार आहेत.
3. जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2017 मध्ये जगात कितव्या स्थानी होती ?
A. दुसऱ्या
B. पाचव्या
C. सहाव्या
D. सातव्या
Click for answer
C. सहाव्या
अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटन पहिल्या पाच स्थानावर आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेने फ्रान्सला मागे टाकत सहावे स्थान पटकाविले. सन 2018-19 वर्षासाठी भारताचा जीडीपी 7.3% राहील, असा भारतीय अर्थव्यवस्थेचा अंदाज नोंदवला गेला आहे.
फ्रान्सला मागे टाकत भारताने जगातली सगळ्यात मोठी सहावी अर्थव्यवस्था असं स्थान पटकावलं आहे. गेल्या वर्षीसाठी म्हणजे 2017 साठीचे अद्ययावत आकडे जागतिक बँकेने जाहीर केले असून यानुसार फ्रान्सचा जीडीपी 2.582 लाख कोटी डॉलर्स असून भारताचा जीडीपी 2.597 लाख कोटी रुपये आहे.
4. राज्यसभेतील खासदारांना येत्या पावसाळी अधिवेशनापासून किती भाषांचा वापर करता येईल ?
A. 18
B. 20
C. 22
D. 8
Click for answer
C. 22
डोगरी, काश्मीरी, कोकणी, संथाळी आणि सिंधी या पाच भाषांच्या अनुवादाची सोय केली असल्याने आता या भाषा बोलणाऱ्या खासदारांना आपल्या मातृभाषेत सभागृहात बोलता येईल. आता राज्यघटनेच्या 8 व्या सूचीत नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये खासदार बोलू शकतील.
सूचिमध्ये समाविष्ट असणाऱ्या 22 भाषांपैकी 12 भाषांमध्ये तात्काळ अनुवादाची सोय आहे. यामध्ये आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू भाषांचा समावेश आहे.
5. पद्मनाभस्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
A. केरळ
B. तामिळनाडू
C. आंध्रप्रदेश
D. तेलंगणा
Click for answer
A. केरळ
तिरूवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिरातील खजिना एका हायटेक संग्रहालयात मांडण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. मात्र केरळचे माजी राजे असलेल्या त्रावणकोरच्या राजघराण्यातील सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे.
6. जगभरात गाजलेल्या केंब्रिज अॅनालिटिका डेटा चोरी प्रकरणात कोणत्या कंपनीला ब्रिटनच्या सूचना रेग्युलेटरीकडून तब्बल $664,000 म्हणजे जवळपास 4.56 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे ?
A. गुगल
B. मायक्रोसॉफ्ट
C. वोडाफोन
D. फेसबुक
Click for answer
D. फेसबुक
जवळपास 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा त्यांच्या परवानगीविना वापरण्यात आल्यामुळे फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका ही राजकीय डेटा विश्लेषक कंपनी वादात सापडली होती.
7. 2018 चा फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या संघांत होणार आहे ?
A. फ्रान्स आणि इंग्लंड
B. क्रोएशिया आणि इंग्लंड
C. फ्रान्स आणि क्रोएशिया
D. इंग्लंड आणि क्रोएशिया
Click for answer
C. फ्रान्स आणि क्रोएशिया
क्रोएशिया या लहान देशाने सर्वाना चकित केले आहे. क्रोएशिया- लोकसंख्या 4,154,200 क्षेत्रफळ - 56,594 चौ.किमी(तुलनात्मक विचार - महाराष्ट्र - लोकसंख्या 112,372,972 क्षेत्रफळ 307,713 चौ.किमी)
8. 'क्राय' या सामाजिक संस्थेने भारतातील 15 ते 18 वयोगटातील मुलांबाबत प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार या वयोगटात देशात किती बालकामगार आहेत ?
A. 2.3 कोटी
B. 3.2 कोटी
C. 4.5 कोटी
D. 1.2 कोटी
Click for answer
A. 2.3 कोटी
2015-16 च्या नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि 2016 चा राष्ट्रीय कुटुंब आरोग्य अहवातील आकडेवारीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
देशातील 23 दशलक्ष बालकामगारांपैकी 19 दशलक्ष जणांवर केवळ शिक्षण आणि नोकरी या दोन्हीचा ताळमेळ साधता न आल्याने शिक्षण सोडण्याची वेळ आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये देशामध्ये लहान मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढले असून अपहरण झालेल्या मुलींमधील 60 टक्के मुली 15 ते 18 वयोगटातील आहेत. तर 25 टक्के बलात्काराच्या घटनांमधील पीडित या वयोगटातील आहेत.
9. स्त्री आणि पुरुष यांच्यात बाहेरख्याली पणात भेदाभेद करणाऱ्या कोणत्या कलमाविषयी निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा खटला घटनापिठाकडे वर्ग केला आहे ?
A. इंडियन पीनल कोड मधील कलम 497
B. भारतीय राज्यघटनेतील कलम 497
C. क्रिमिनल प्रोसिजर कोड मधील कलम 497
D. सिविल प्रोसिजर कोड मधील कलम 497
Click for answer
A. इंडियन पीनल कोड (भारतीय दंड संहिता) मधील कलम 497
केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात या याचिकेला विरोध केला असून ती फेटाळून लावण्याची विनंती सुप्रीम कोर्टाला केली आहे. IPC मधील 497 कलमामुळे देशातील लग्नसंस्था टिकून आहेत, हे कलम नसेल तर लग्नसंस्था कमकुवत होतील, असे केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात म्हटले आहे.
विवाहबाह्य संबंधांत दोषी आढळल्यास पुरुषांना शिक्षा देण्यात येते तर महिलांना मात्र शिक्षा होत नाही. म्हणून हा कायदा भेदभाव करणारा आहे. आणि या कायद्याला असंविधानिक असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी याचिकाकर्त्यांने याचिकेत केली आहे.
10. पाकिस्तानसाठी दोन उपग्रहांचे प्रक्षेपण कोणत्या देशातून केले गेले ?
A. चीन
B. इराण
C. रशिया
D. भारत
Click for answer
A. चीन
Newer Post
Older Post
Home