चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 जुलै 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून जगातील पहिले मोफत टायफॉइड लसीकरण अभियान कोणती महापालिका राबविणार आहे ?

A. नवी मुंबई महानगरपालिका
B. पुणे महानगरपालिका
C. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
D. नागपूर महानगरपालिका


Click for answer

A. नवी मुंबई महानगरपालिका

दोन टप्प्यात शहरातील 9 ते 15 वर्षे वयोगटातील तब्बल चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. 14 जुलैपासून लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रस्तावावरून महानगरपालिकेने हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाला केंद्र व राज्य सरकारने तांत्रिक मान्यता दिली आहे.

2018 व 2019 मध्ये दोन टप्प्यात 22 नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून हे अभियान राबविण्यात येणार आहे.

दोन वर्षांत चार लाख मुलांना लस देण्यात येणार आहे. यासाठी उत्पादक कंपनीकडून पहिला डोस मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून, उर्वरित 3 लाख डोसेस प्रति डोस 200 रुपये दराने मनपा विकत घेणार आहे. या अभियानासाठी 6 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

2. मुंबईच्या रणजी क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?

A. समीर दिघे
B. विनायक सामंत
C. उन्मेश खानविलकर
D. रमेश पोवार


Click for answer

B. विनायक सामंत

विनायक सामंत हे मुंबईचे माजी यष्टीरक्षक होते.

3. यापुढे बलात्कार आणि छेडछाड प्रकरणातील आरोपींना न्यायालयाचा निकाल येईपर्यंत सरकारी योजनांचा लाभ रद्द करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ?

A. महाराष्ट्र
B. पंजाब
C. हरियाणा
D. उत्तराखंड


Click for answer

C. हरियाणा

अल्पवयीन मुलींवरील बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींविरोधात कठोर कायदे करणाऱ्या हरयाणा सरकारनं आता आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे बलात्कार प्रकरणातील दोषींना वृद्धापकाळात मिळणारं निवृत्ती वेतन, दिव्यांग म्हणून केलं जाणारं अर्थसहाय्य बंद करण्यात येईल. याशिवाय आरोपीचा वाहन आणि शस्त्र परवानासुद्धा रद्द केला जाईल.

मात्र संबंधित आरोपीची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यास त्याला पुन्हा सर्व योजनांचा लाभ दिला जाईल.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर

4. पहिले राज्यस्तरीय 'एलजीबीटीआय' साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?

A. मुंबई
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर


Click for answer

C. पुणे

लेस्बियन-गे (समलिंगी), तृतीयपंथी, बायसेक्शुअल (उभयलिंगी), इंटरसेक्स या घटकांना त्यांचे विचार, वेदना, आशा-आकांक्षा आणि जगणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ म्हणून हे साहित्य संमेलन उपयुक्त ठरेल.

5. फोर्ब्सच्या सेल्फ मेड वूमनच्या यादीत अमेरिकेत स्वत: च्या कर्तृत्वावर ठसा उमटवणार्‍या 60 श्रीमंत महिलांचा समावेश आहे. ह्या यादीत कोणत्या दोन भारतीय वंशांच्या महिलांचा समावेश आहे ?

A. अनु नटराजन आणि सुनेत्रा गुप्ता
B. डॉ. उमा राजन आणि निता सेन गुप्ता
C. शिवानी पंड्या आणि तुलसी गबार्ड
D. जयश्री उल्लाल आणि निरजा सेठी


Click for answer

D. जयश्री उल्लाल आणि निरजा सेठी

या यादीत जयश्री उल्लाल या 18व्या स्थानावर आहेत. तर निरजा सेठी या 21 व्या क्रमांकावर आहेत.

जयश्री उल्लाल (वय 57) यांचा जन्म लंडन येथे झाला, पण त्यांचे पालन-पोषण भारतात झाले आहे. अरिस्टा नेटवर्क या कॉम्प्युटर नेटवर्किंग फर्ममध्ये त्या 2008पासून कार्यरत आहेत. जयश्री यांची एकूण संपत्ती 8800 कोटी रुपये (1.3 अरब डॉलर) आहे.

निरजा सेठी (वय 63) सिन्टेल या कंपनीत कार्यरत आहेत. ही कंपनी आऊटसोर्सिंग आणि आयटी विषयक कन्सल्टिंगचे व्यवहार करते. या कंपनीची स्थापना निरजा आणि त्यांचे पती भरत देसाई यांनी 1980मध्ये केली होती. निरजा यांची संपत्ती एकूण 6800 कोटी रुपये (1 अब्ज डॉलर) आहे.

6. कोणत्या मादाम तुसां म्युझियममध्ये अभिनेत्री अनुष्का शर्माचा मेणाचा पुतळा उभारण्यात येत आहे ?

A. सिंगापूर
B. दिल्ली
C. लंडन
D. पॅरीस


Click for answer

A. सिंगापूर

7. कोणत्या देशाने डिसेंबर महिन्यामध्ये चांद्रमोहीम सुरु करत असल्याची घोषणा केली आहे ?

A. इस्रायल
B. कॅनडा
C. जर्मनी
D. पाकिस्तान


Click for answer

A. इस्रायल

या मोहिमेत इस्रायल एक मानवरहित यान चंद्रावर पाठवणार असून त्याचे वजन 585 किलो असेल. हे यान 13 फेब्रुवारी 2019 रोजी चंद्रावर पोहोचेल असे इस्रायलच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. अमेरिकन अंतराळ उद्योजक एलन मस्कच्या स्पेसेक्स मार्फत हे पाठवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या मदतीने हे यान अंतराळात पाठवले जाईल. चंद्राच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यासही या मोहीमेत केला जाणार आहे.

इस्रायलमधील स्पेसआयएल या संस्थेने इस्रायली सरकारच्या ताब्यातील एरोस्पेस इंडस्ट्रीज या संस्थेबरोबर एकत्र काम करत चांद्रमोहीम सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

8. कोणता दिन हा मलाला दिन म्हणून साजरा केला गेला ?

A. 2 जुलै
B. 6 जुलै
C. 8 जुलै
D. 12 जुलै


Click for answer

D. 12 जुलै

नोबेल पुरस्कारप्राप्त मलाला युसूफझाई हिने महिलांच्या शिक्षणासाठी स्वात खोऱ्यामध्ये जागृती मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे तालिबानी दहशतवाद्यांनी तिला 2012 साली डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ती बचावली.

जगभरातील मुलींना शिक्षणाची संधी मिळायला हवी, असे आवाहन तिने आपल्या 16 व्या वाढदिवशी म्हणजे 12 जुलै 2013 रोजी केले होते. त्यामुळे 12 जुलै हा मलाला दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते.

9. मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवल्याच्या किंवा त्यांच्या शिक्षणात अडथळे आणण्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ______________चा फटका बसत असल्याचे जागतिक बँकेने मलाला दिनानिमित्त प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.

A. 15 ते 30 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स
B. 1.5 ते 3.0 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स
C. 15 ते 30 मिलियन अमेरिकन डॉलर्स
D. 1.5 ते 3.0 मिलियन अमेरिकन डॉलर्स


Click for answer

A. 15 ते 30 ट्रिलियनअमेरिकन डॉलर्स

जागतिक बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस्तिना जॉर्जिएव्हा

10. मलाला युसूफझाई हिच्या आयुष्यावर आधारित कोणता चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे ?

A. आय मलाला
B. माय स्टोरी
C. गुल मकई
D. मलाला - अ जर्नी


Click for answer

C. गुल मकई

नुकताच त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.