चालू घडामोडी
विज्ञान प्रश्नसंच -12
विज्ञान -तंत्रज्ञान घटकावर आधारित.
1. 'रातांधळेपणा' हा नेत्रविकार खालीलपैकी कोणत्या कारणाने होतो ?
A. 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावाने
B. मोतीबिंदुमुळे
C. पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे
D. अत्याधिक प्रमाणात टीव्ही पाहण्याने
Click for answer
A. 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावाने
2. कर्करोग कशामुळे होतो ?
A. कवकामुळे
B. पेशींची अपसामान्य वाढ
C. जीवाणू
D. परजीवी आदिजीव
Click for answer
B. पेशींची अपसामान्य वाढ
3. खालीलपैकी कोणता नेत्रदोष बहिर्वक्र भिंगाचा वापर करून दूर केला जातो ?
A. निकटदृष्टीता
B. दृष्टिवैषम्य
C. दूरदृष्टीता
D. मोतीबिंदू
Click for answer
C. दूरदृष्टीता
4. 1 मेट्रीक टन म्हणजे __________________.
A. 10 किलोग्रॅम
B. 100 किलोग्रॅम
C. 1000 किलोग्रॅम
D. 300 किलोग्रॅम
Click for answer
C. 1000 किलोग्रॅम
5. खालीलपैकी कोणत्या वायूमध्ये सूर्यप्रकाशातील जंबूपार (UV rays)किरणे शोषून घेण्याची क्षमता आहे ?
A. ओझोन
B. मिथेन
C. क्लोरोफ्ल्युरो कार्बन
D. कार्बन डायऑक्साइड
Click for answer
A. ओझोन
6. खालीलपैकी विदयुत प्रभाराचे एकक कोणते ?
A. ओहम
B. कुलोम
C. अॅम्पिअर
D. व्होल्ट
Click for answer
B . कुलोम
7. सापेक्ष अणुवस्तुमान व्यक्त करण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याच्या अणूचा संदर्भ घेतला जातो ?
A. कार्बन
B. ऑक्सीजन
C. सोडीअम
D. हायड्रोजन
Click for answer
D. हायड्रोजन
8. ट्रान्सफॉर्मर दूरध्वनीयंत्रातील इअरफोन विदयुतघंटा ही विदयुतधारेच्या कोणत्या प्रकारच्या परिणामाची उदाहरण आहे ?
A. चुंबकीय
B. प्रकाशीय
C. औष्मिक
D. रासायनिक
Click for answer
A. चुंबकीय
9. खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर समुद्राची खोली मोजण्यासाठी केला जातो ?
A. रडार
B. सोनार
C. डॉप्लर परिणाम
D. लेझर
Click for answer
B. सोनार
10. समुद्रसपाटीपासूनची एखादया स्थानाची उंची निश्चीत करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या यंत्राचा वापर केला जातो ?
A. अॅनेमीटर
B. मॅनोमीटर
C. अल्टिमीटर
D. स्पिरीट लेव्हल
Click for answer
C. अल्टिमीटर
Newer Post
Older Post
Home