चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -21 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पदावर विराजमान होते ?
A. नीती आयोगाचे उपाध्यक्ष
B. पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार
C. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार
D. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया चे गव्हर्नर
Click for answer
C. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार
अमेरिकेत त्यांचे कुटुंब असून कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी आपण हा राजीनामा दिल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.
अरविंद सुब्रमण्यम यांची ऑक्टोबर 2014 मध्ये भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी दिल्लीच्या स्टिफन्स महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथून एमबीए केले. त्यानंतर युकेमधील जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठातून त्यांनी M.Phil आणि D.Phil केले. त्याचबरोबर पिटरसन इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स येथे ते वरिष्ठ पदावर काम करीत होते.
नियुक्तीच्या तीन वर्षांनंतर सुब्रमण्यम यांचा मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा कार्यकाळ 16ऑक्टोबर 2017 रोजी संपला होता. त्यानंतर त्यांना गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत एक वर्षांसाठी त्यांची मुदत वाढवण्यात आली होती.
जेटली यांनी 'थँक यू अरविंद' या मथळ्याखाली फेसबुकवर ब्लॉग पोस्ट करून त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे .पीटरसन इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्सचे फेलो असणाऱ्या सुब्रमण्यन यांनी अमेरिकेत परत जाण्याचा निर्णय घेतला आहे .
2. जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A. बीव्हीआर सुब्रमण्यम
B. बी. बी. व्यास
C. विजय कुमार
D. संपत चौधरी
Click for answer
A. बीव्हीआर सुब्रमण्यम
राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर ही महत्त्वाची नियुक्ती मानली जाते. ते सध्या मुख्य सचिव असलेल्या बी. बी. व्यास यांची जागा घेतील.
तसेच निवृत्त प्रशासकीय अधिकारी विजय कुमार आणि बी. बी. व्यास यांची राज्यपालांच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3. संगीतकार ए. आर. रहमान यांची कोणत्या राज्याच्या ब्रॅंड ऍम्बॅसिडरपदी नेमणूक करण्यात आली आहे ?
A. सिक्कीम
B. तेलंगणा
C. तामिळनाडू
D. राजस्थान
Click for answer
A. सिक्कीम
रहमान हे या राज्याच्या पर्यटनाचे राजदूत म्हणून या आधी कार्यरत होते आता त्यांना संपुर्ण राज्याचेच ब्रॅन्ड ऍम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी देण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले आहे.
सिक्कीम हे राज्य गेली दोन दशके जागतिक इको टुरिझम सेंटर म्हणून जगभरात प्रख्यात झाले आहे. हे राज्य शंभर टक्के सेंद्रीय शेतीसाठी प्रसिद्ध आहे.
4. उत्तर प्रदेशच्या पाठोपाठ कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने आदेशानुसार तेथील माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगले सोडावे लागणार आहेत ?
A. हरियाणा
B. मध्यप्रदेश
C. कर्नाटक
D. राजस्थान
Click for answer
B. मध्यप्रदेश
एका जनहित याचिकेवर दिलेल्या या आदेशानुसार ज्यांना सरकारी बंगले सोडावे लागतील त्यांत कैलास जोशी, उमा भारती, बाबुलाल गौर व दिग्विजय सिंग यांचा समावेश आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठाने तसा आदेश दिला. सरकार माजी मुख्यमंत्र्यांना तहहयात राहण्यासाठी सरकारी बंगले देऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेशातील प्रकरणात दिला. त्याच धर्तीवर आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा निकाल आला आहे.
5. "अनफिनिश्ड" हे कोणत्या अभिनेत्रीचे येवू घातलेले स्वत:च्या अनुभवांवर आधारित पुस्तक आहे ?
A. सुश्मिता सेन
B. माधुरी दीक्षित
C. श्रीदेवी
D. प्रियांका चोप्रा
Click for answer
D. प्रियांका चोप्रा प्रियांकाशी संबंधित काही जुन्या आठवणी, सिनेतील काही मान्यवरांबरोबरचे किस्से आणि काही कडू गोड अनुभवांचा समावेश असेल. आता प्रियांकाने हे पुस्तक लिहायला सुरुवात केली आहे. पुढील वर्षी तिचे हे पुस्तक प्रकाशित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आयुष्मान खुराना यांनी आपापल्या अनुभवांच्या आधारे पुस्तक लिहून प्रकाशित केले आहे.
6. शेतमालाला रास्त भाव मिळवून देण्यासह बाजार समित्यांच्या कामकाजामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी राज्यातील किती मोठ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) पोर्टलशी जोडण्याच्या योजनेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे ?
A. 45
B. 100
C. 105
D. 145
Click for answer
D. 145
केंद्र शासनाने शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी देशपातळीवर एक बाजार या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय कृषि बाजार (ई-नाम) योजना सुरु केली आहे.
ई-नाम योजनेत 60 तसेच जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्पांतर्गत 25 अशा राज्यातील एकूण 85 बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव योजना यापूर्वीच सुरु झाली आहे.
ई-लिलाव पद्धतीचे कामकाज अधिक परिणामकारक व्हावे, यासाठी राज्यातील अन्य 145 बाजार समित्यादेखील ई-नाम अंतर्गत जोडण्यासाठी राज्य शासनाने ही नवीन योजना आणली आहे.
7. 2018 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची मध्यवर्ती संकल्पना (Theme)काय आहे ?
A. शांततेसाठी योग (Yoga for Peace)
B. आरोग्यासाठी योग (Yoga for Health)
C. तंदुरुस्तीसाठी योग (Yoga for Wellness)
D. सर्वंकष आरोग्यासाठी योग (Yoga for Holistic Health)
Click for answer
A. शांततेसाठी योग (Yoga for Peace)
21 जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पंतप्रधान मोदींनी या दिवशी 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी हा ठराव स्विकारला.
14 जून 2015 ला पहिला 'आंतरराष्ट्रीय योग दिन ' साजरा करण्यात आला.
8. कोणत्या महिला संघाने टी-20 क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली आहे ?
A. इंग्लंड
B. न्यूझीलंड
C. भारत
D. ऑस्ट्रेलिया
Click for answer
A. इंग्लंड
इंग्लंडच्या पुरुष संघाने वन डेतील सर्वोच्च धावसंख्या गाठली असतानाच इंग्लंडच्या महिला संघानेही टी- २० क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येची नोंद केली
इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाची तिरंगी टी- 20 मालिका सुरु असून या मालिकेत बुधवारी पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका तर दुसरा सामना इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडला.
यातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने एका विकेटच्या मोबदल्यात 20 षटकांत 216 धावा होत्या. महिला टी- 20 मधील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. मात्र, हा विक्रम अवघ्या काही तासांमध्ये इंग्लंडने मोडला.
9. प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगणा संध्या पुरेचा आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2017 चा ________________________जाहीर झाला आहे.
A. साहित्य अकादमी पुरस्कार
B. संगीत नाटक अकादमी पुरस्कार
C. संगीत नाटक अकादमी फेलोशिप
D. साहित्य अकादमी फेलोशिप
Click for answer
B. संगीत नाटक अकादमी पुरस्कार
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या संगीत नाटक पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. वर्ष 2017च्या नाट्य अकादमी पुरस्कारासाठी देशभरातील 42 कलाकारांची, तर उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कारासाठी 34 कलाकारांची निवड करण्यात आली.
त्यात प्रसिद्ध नाट्य लेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ नृत्यांगणा संध्या पुरेचा आणि तबला वादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2017 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
तर सावनी शेंडे आणि आदित्य खांडवे यांची उस्ताद बिस्मील्ला खॉं युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तसेच,नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप जाहीर झाली आहे.
10. अमेरिकच्या डाऊ जोन्स निर्देशांकातून (Dow Jones Index) कोणत्या 126 वर्षे जुन्या कंपनीला पहिल्यांदाच वगळण्यात आले आहे ?
A. जनरल इलेक्ट्रिक (GE)
B. IBM
C. बोईंग
D. अमेरिकन एक्सप्रेस
Click for answer
A. जनरल इलेक्ट्रिक (GE)
Newer Post
Older Post
Home