चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -4 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांनी कोणत्या पिकाच्या वाणावर विशेष संधोधन केले होते ?

A. गहू
B. भात
C. सोयाबीन
D. ज्वारी


Click for answer

B. भात फोर्ब्सलाही आपल्या कृषी संशोधनाने दखल घ्यायला भाग पाडणारे एचएमटी भात आदी वाणांचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना राज्य आणि केंद्र सरकारचे अनेक पुरस्कार मिळाले. तब्बल 9 धान वाणांची निर्मिती दादाजी यांनी केली होती. भात पिकांवर अनेक नवे प्रयोग करून भाताचे नवनवे वाण शोधणारे दादाजी खोब्रागडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड गावाचे रहिवाशी होते . 2006 साली तांदूळ संशोधनातील अमुल्य योगदानाबद्दल राज्य शासनाकडून त्यांना कृषिभुषण पुरस्कारे गौरविण्यात आले होते. 1985 ते 1990 या पाच वर्षांच्या काळात त्यांनी धानाच्या ९ वाणांचा शोध लावला होता. या काळात प्रसिद्ध असणाऱ्या एचएमटी कंपनीच्या घड्याळ्यांमुळे त्यांनी शोधलेल्या एका प्रसिद्ध वाणाला 'एचएमटी' हे नाव देण्यात आले होते.

2. फ्युएगो हा अलीकडेच जागृत झालेला ज्वालामुखी कोणत्या खंडात आहे ?

A. आशिया
B. आफ्रिका
C. उत्तर अमेरिका
D. दक्षिण अमेरिका


Click for answer

C. उत्तर अमेरिका मेक्सिकोच्या दक्षिणेत असलेल्या ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीपासून 40 किमी अंतरावर असलेल्या ग्वाटेमालामधल्या फ्युएगो ज्वालामुखीचा उद्रेक होऊन 25 जणांचा मृत्यू आणि किमान 300 लोक जखमी झाले आहेत. या ज्वालामुखीचा हा 1974 नंतरचा हा सर्वांत मोठा उद्रेक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. राष्ट्राध्यक्ष जिम्मी मोराल्स

3. जागतिक सायकल दिन कधी साजरा केला गेला ?

A. 3 जून
B. 2 जून
C. 1 जून
D. 31 मे


Click for answer

A. 3 जून

4. अमेरिकेतील कोणत्या प्रांताच्या गव्हर्नर पदासाठीच्या निवडणुकीत 22 वर्षीय मुळ भारतीय वंशाचा तरूण तंत्रज्ञ उमेदवार शुभम गोयल म्हणून उभा राहिला आहे ?

A. कॅलिफोर्निया
B. फ्लोरिडा
C. टेक्सास
D. मिशिगन


Click for answer

A.कॅलिफोर्निया त्याचा जन्म अमेरिकेतच झाला असला तरी त्याचे मुळ उत्तरप्रदेशात आहे.

5. सोशल मीडियावर गोविंदा आणि मिथुन स्टाईल डान्स करुन सगळ्यांची मने जिंकणारे व्हायरल काका संजीव श्रीवास्तव यांची मध्यप्रदेशातल्या कोणत्या महापालिकेचे ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. भोपाळ
B. इंदूर
C. झाशी
D. विदिशा


Click for answer

D. विदिशा

6. जागतिक पर्यावरणदिन कधी साजरा करतात ?

A. 2 जून
B. 3 जून
C. 4 जून
D. 5 जून


Click for answer

D. 5 जून 2018 च्या जागतिक पर्यावरणदिनाचे यजमानपद भारत भूषवित असून ह्या वर्षीची मध्यवर्ती संकल्पना (Theme)आहे -'प्लास्टिक प्रदूषणाची समाप्ती'

7. भारताकडून संपूर्ण स्वदेशी बनावटीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5 ची यशस्वी चाचणी अलीकडे कधी करण्यात आली ?

A. 2 जून
B. 3 जून
C. 4 जून
D. 5 जून


Click for answer

B. 3 जून भारताकडूनसंपूर्ण स्वदेशी बनावटीचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण ओडिशाच्या बालासोर येथील अब्दुल कलाम समुद्रीय बेटावर करण्यात आले. 5 हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असणार्‍या अग्नी-5मुळे संपूर्ण चीन या आंतरखंडीय क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असणार आहे. यासोबतच युरोप आणि आफ्रिका खंडातील काही भागदेखील या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात असतील. 'अग्नी-5'ची सहावी चाचणी पार पडली. यापूर्वी या क्षेपणास्त्राची चाचणी 18 जानेवारीला झाली होती. एप्रिल 2012 नंतर यामध्ये चारवेळा सुधारणा करण्यात आली.

8. भारत कोणत्या देशाकडून 'स्पाईक' ही रणगाडा भेदी क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे ?

A. अमेरिका
B. रशिया
C. इस्त्राईल
D. फ्रान्स


Click for answer

C. इस्त्राईल डीआरडीओच्या मदतीने रणगाडाभेदी क्षेपणास्त्रे बनवली जात आहेत. तथापि यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, त्यामुळे तातडीने ही खरेदी होण्याची शक्यता आहे.

9. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत देशातील ग्रामीण रस्ते प्रकल्पांना अतिरिक्त वित्त पुरवठा करण्यासाठी भारत सरकार आणि खालीलपैकी कोणा दरम्यान नुकताच 500 दशलक्ष डॉलर रकमेचा कर्ज करार झाला ?

A. आशियाई विकास बँक
B. जागतिक बँक
C. बँक ऑफ जपान
D. सार्क बँक


Click for answer

B. जागतिक बँक ग्राम विकास मंत्रालयाच्या या ग्रामीण रस्ते प्रकल्पांसाठी 7 हजार किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. यापैकी 3 हजार 500 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम हरित तंत्रज्ञानाचा वापर करून केले जाईल. 2004 सालापासून जागतिक बँकेने प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला सहाय्य केले आहे. बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मेघालय, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये रस्ते बांधण्यासाठी जागतिक बँकेने आतापर्यंत 1.8 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत आतापर्यंत 35 हजार किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम झाले असून सुमारे 8 दशलक्ष नागरिकांना या रस्त्यांचा लाभ झाला आहे.

10. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान पदी पेद्रो सँचेझ यांनी शपथ घेतली आहे ?

A. स्विडन
B. नॉर्वे
C. स्पेन
D. जर्मनी


Click for answer

C. स्पेन सत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानं त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली. अविश्वास प्रस्तावानंतर पराभूत होणारे राहॉय हे आधुनिक स्पेनमधले पहिलेच नेते ठरले आहेत. ते 2011पासून ते पंतप्रधान होते. सँचेझ यांच्या पक्षाकडे संसदेतल्या एकूण जागांपैकी फक्त एक चर्तुर्थांश जागा आहेत परंतु सँचेझ यांना देशातल्या इतर 6 पक्षांचा पाठिंबा मिळाला, म्हणून त्यांनी स्पेनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. ते अर्थतज्ज्ञ आणि माजी बास्केटबॉलपटू आहेत. 46 वर्षीय सँचेझ हे नास्तिक असून त्यांनी बायबलशिवाय शपथ घेतली, असे करणारे ते स्पेनचे पहिलेच पंतप्रधान ठरले.