चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -3 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नुकतीच शपथ घेतली ?

A. नसीर उल मुल्क
B. शाहीद खाकन अब्बासी
C. शौकत अज़ीज़
D. यूसुफ रजा गिलानी


Click for answer

A.नसीर उल मुल्क

पाकिस्तानचे माजी सरन्यायाधीश नसीर उल मुल्क यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून आज शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी मुल्क यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पाकिस्तानच्या विद्यमान संसदेचा कार्यकाळ 31 मे रोजी संपला आहे.

देशात 25 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर नसीर उल मुल्क यांच्याकडे पंतप्रधानपदाची सूत्रे देण्यात आली असून निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवे सरकार स्थापन होईपर्यंत मुल्क हे काळजीवाहू पंतप्रधान राहणार आहेत.

2. पाकिस्तानचे मावळते पंतप्रधान शाहीद खाकन अब्बासी यांच्या लोकनियुक्त सरकारने पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर आता पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूका होऊ घालत्यात. 1947 पासून आजतागायत पाकिस्तानात किती लोकनियुक्त सरकारांनी त्यांचा कालावधी पूर्ण केला ?

A. फक्त एक
B. दोन
C. सहा
D. नऊ


Click for answer

B. दोन

1947 नंतर शांततापूर्ण मार्गाने निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची ही दुसरी वेळ आहे. आतापर्यंत देशात लोकनियुक्त दोन सरकारेच आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलेली आहेत.

बहुतेकदा नवनिर्वाचित सरकारला हटवून सेनाप्रमुखांनीच पाकिस्तानात शासन केलेलं आहे.

3. जुजेपी कोंटे यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून खालीलपैकी अलीकडेच शपथ घेतली ?

A. इटली
B. न्यूझीलंड
C. स्पेन
D. मंगोलिया


Click for answer

A.इटली

कोंटे हे पतंप्रधानपदी विराजमान झाले असून आजच्या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

नवे सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे.

4. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा अध्यादेश केंद्रीय मंत्रीमंडळाने 23 मे 2018 रोजी जारी केला ?

A. नागपूर(महाराष्ट्र)
B. डेहराडून(उत्तराखंड)
C. इंफाळ(मणिपूर)
D. दिसपूर(आसाम)


Click for answer

C. इंफाळ(मणिपूर)

राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र असलेले हे विद्यापीठ अशा प्रकारचे देशातील पहिले विद्यापीठ असेल. मागील वर्षी लोकसभेत सादर करण्यात आलेल्या राष्ट्रीय विद्यापीठ विधेयक 2017 च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अध्यादेश 2018 सादर करण्यात आला.

क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन व क्रीडा शिक्षण यांच्यासह या विद्यापीठाचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी आपल्या 2014-15 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केला होता.

विद्यापीठाच्या स्थापनेसाठी मणिपूर सरकारने इंफाळ जिल्ह्यातील कौटरुक येथे 325 एकर जमीन उपलब्ध करुन दिली आहे.

5. कोणत्या छोट्या देशाने एक महिना फेसबुकवर बंदी घालण्याचे जाहीर केल्याने तो देश चर्चेत होता ?

A. माल्टा
B. पापुआ न्यू गिनीआ
C. टूवालू
D. व्हॅटिकन सिटी


Click for answer

B. पापुआ न्यू गिनीआ

पापुआ न्यू गिनीआ सरकारने एक महिना फेसबुकवर बंदी घालण्याचे जाहीर केले आहे. फेसबुकच्या वापरकर्त्याचा व्यवहार समजून घेणे आणि खोट्या बातम्यांपासून त्यांचे संरक्षित करणे, हा या पावलामागचा हेतू आहे.

6. ल्युएनबक प्राणी संग्रहालय कोणत्या देशात आहे ?

A. फ्रान्स
B. न्यूझीलंड
C. जर्मनी
D. कॅनडा


Click for answer

C. जर्मनी

जर्मनीच्या ल्युएनबक प्राणी संग्रहालयातून काही प्राण्यांनी पलायन गेल्याने ते चर्चेत होते. या प्राण्यांमध्ये दोन सिंह, दोन वाघ आणि एका जाग्वारचा समावेश आहे.

7. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किंम जाँग उन यांची भेट कधी होणे नियोजित आहे ?

A. 9 जून
B. 12 जून
C. 18 जून
D. 23 जून


Click for answer

B. 12 जून

8. कोणत्या देशाने नागरिकांकडून व्हॉटस ऍप, ट्‌विटर, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या वापरावर दररोज 200 शिलिंग म्हणजे सुमारे 3.75 रुपये कर आकारणी करण्याचा निर्णय घेतल्याने तो देश चर्चेत होता ?

A. केनिया
B. युगांडा
C. मेक्सिको
D. चिली


Click for answer

B. युगांडा

युगांडा सरकारने हा निर्णय जाहीर केला आहे. याचा मुख्य हेतू "गॉसिप' वर नियंत्रण घालणे हा आहे. मात्र काही लोक याचा अर्थ बोलण्याच्या स्वातंत्र्यवर गदा आणणे असा काढ़त आहेत. सन 2016 च्या अहवालानुसार युगांडाचे दरडोई उत्पन्न 666. 10 अमेरिकन डॉलर्स आहे. य तुटपुंज्या उत्पन्नात लोकांना उदरनिर्वाह करणे मुश्‍किल झालेले आहे, अशा अवस्थेत हा कर लादणे अन्याय असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.

युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी

9. कोणत्या देशाच्या माजी राजदूत टॉमी कोह यांना भारत सरकारचा पद्‌मश्री पुरस्कार नुकताच प्रदान केला गेला ?

A. अमेरिका
B. सिंगापूर
C. कॅनडा
D. दक्षिण आफ्रिका


Click for answer

B. सिंगापूर

सिंगापुरच्या दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापुरचे माजी राजदूत टॉमी कोह यांना भारत सरकारचा पद्‌मश्री पुरस्कार प्रदान केला. यावर्षी भारत सरकारने असियान देशातील दहा जणांना पद्‌म पुरस्कार जाहीर केले होते.

सिंगापुरचे पंतप्रान ली लूंग यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोह हे सध्या 80 वर्ष वयाचे असून त्यांनी सिंगापुरचे राजदूत म्हणून अमेरिका आणि संयुक्तराष्ट्रांमध्ये काम केले आहे.

सध्या ते आंतरराष्ट्रीय लॉ युनिव्हर्सिटीचे प्रमुख म्हणून काम करीत आहेत.

10. झिनेदीन झिदानने कोणत्या फुटबॉल संघाच्या प्रशिक्षक पदाचा नुकताच राजीनामा दिला ?

A. आर्सेनल एफ सी
B. चेल्सी एफ़.सी.
C. रियाल माद्रीद
D. मँचेस्टर यूनाइटेड एफ़.सी.


Click for answer

C. रियाल माद्रीद

स्पॅनिश क्लब रियाल माद्रीदला सलग तिसऱ्या वर्षी वर्ल्ड कप जिंकून देणारा प्रशिक्षक झिनेदीन झिदानने आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. झिदानने राजीनाम्याची घोषणा करताच फुटबॉल वर्तुळात जोरदार आश्चर्य व्यक्त केला आहे.