चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -5 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. कोणत्या राज्याने नुकताच राज्यातील बेरोजगारांसाठी बेरोजगार भत्ता सुरू केला आहे ?
A. मध्यप्रदेश
B. कर्नाटक
C. आंध्रप्रदेश
D. तामिळनाडू
Click for answer
C. आंध्रप्रदेश
आंध्र प्रदेशात 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत टीडीपी सरकारने बेरोजगारांना भत्ता देऊ असं आश्वासन दिलं होतं. गुरुवारी टीडीपी सरकारने आता तेथील स्थानिक पदवीधर बेरोजगार तरुणांना प्रत्येकी महिना 1000 रुपये देण्याच ठरविलं आहे
2. अलीकडेच युरोपातील कोणत्या देशात एका उंच इमारतीतून पडलेल्या लहान मुलाला वाचवण्यासाठी माली देशाचा एक स्थलांतरित स्पायडरमनसारखा चढून आला. आणि त्याने त्या मुलाला वाचवलं. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला त्या देशाने नागरिकत्व बहाल केलं आहे ?
A. इंग्लंड
B. फ्रान्स
C. इटली
D. स्वित्झर्लंड
Click for answer
B. फ्रान्स
पॅरीस मध्ये घडलेल्या या घटनेत मालीच्या मामुदू गासामा यांनी हे धाडस करत त्या लहानग्याचा जीव वाचवला होता.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मामुदू यांची एलसी पॅलेस येथे भेट घेतली आणि त्यांना फ्रेंच नागरिकत्व देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
3. सोकोट्रा बेटावर अडकलेल्या 38 भारतीयांची सुटका करण्यात भारतीय नौदलला यश आलं आहे. सोकोट्रा बेट कोणत्या देशाचे आहे ?
A. येमेन
B. फ्रान्स
C. मॉरीशस
D. न्यूझीलंड
Click for answer
A. येमेन
येमेनला गेल्या आठवड्यात मेकेनू या वादळाचा तडाखा बसला होता. त्यात हे 38 भारतीय या बेटावर अडकून पडले होते.
त्यांची सुटका करण्यासाठी नौदलाने NISTAR ही विशेष मोहीम राबवली आहे.
4. न्यूझीलंडमध्ये वेगाने पसरत असणाऱ्या कोणत्या रोगाचा अटकाव करण्यासाठी 1 लाख 26 हजार गायींची कत्तल करण्यात येणार आहे ?
A. निपाह
B. मायकोप्लाजम बोविस
C. ॲथ्रँक्स
D. बॉट्युलिझम
Click for answer
B. मायकोप्लाजम बोविस
देशातील डेअरी उद्योग वाचवण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं पंतप्रधान जेसिंडा अॅड्रेन यांनी म्हटलं आहे.
5. पॅरसेल्स आणि स्प्रॅटलीस या दोन साखळी बेटांवरील मालकी हक्कांवरून चीन, तैवान, व्हिएतनाम, फिलिपाईन्स आणि मलेशिया यांच्यात वाद आहे. ही बेटे कोणत्या ठिकाणी वसलेली आहेत ?
A. हिंदी महासागर
B. दक्षिण चीन समुद्र
C. जपानचा समुद्र
D. बंगालचा उपसागर
Click for answer
B. दक्षिण चीन समुद्र
याशिवाय मलेशिया आणि ब्रुनेई या दोन्ही देशांचा दक्षिण चीन समुद्रामधील काही भूभागावर दावा केला आहे.
6. जागतिक मधुमक्षिका दिवस कधी साजरा केला जातो ?
A. 11 मे
B. 21 मे
C. 25 मे
D. 2 जून
Click for answer
B. 21 मे
त्यानिमित्त खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने एका दिवसात सर्वाधिक मधमाशी पेट्या वितरीत करण्याचा विश्व विक्रम नोंदवला. दोन वर्षांपूर्वी इस्रायलने मधमाश्यांच्या 841 पेट्यांचे वितरण केले होते. आज काझिरंगा वन क्षेत्रात मधमाश्यांच्या 1000 पेट्यांचे वितरण करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मधुर क्रांती’च्या आवाहनाला प्रतिसाद देत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने ‘हनी मिशन’ हाती घेतले आहे.
7. 5 मे रोजी मुंबईतल्या पहिल्या महिला विशेष उपनगरी रेल्वेला किती वर्षे पूर्ण झाली ?
A. 11 वर्षे
B. 26 वर्षे
C. 50 वर्षे
D. 74 वर्षे
Click for answer
B. 26 वर्षे
5 मे 1992 रोजी जगातली पहिली महिला विशेष ट्रेन चर्चगेट ते बोरिवली दरम्यान धावली
8. आयएनएसव्ही तारीणीच्या सर्व सदस्यांना त्यांनी पृथ्वी परिक्रमा पूर्ण केल्यानंतर कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले गेले ?
A. नारी शक्ती पुरस्कार 2017
B. नौसेना पदक 2017
C. वीरचक्र 2017
D. अर्जुन पुरस्कार 2017
Click for answer
A. नारी शक्ती पुरस्कार 2017
महिला आणि बाल विकास मंत्री मनेका संजय गांधी यांनी नवी दिल्ली येथे आयएनएसव्ही तारीणीच्या सर्व सदस्यांना मानाचा नारी शक्ती पुरस्कार 2017 प्रदान केला. या पथकाच्या सहाही सदस्य महिला होत्या.
यामध्ये लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पतारपल्ली, लेफ्टनंट ऐश्वर्या बोडापत्ती, लेफ्टनंट एस. विजयादेवी, लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश होता.
9. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला जातो ?
A. 11 मे
B. 17 मे
C. 21 मे
D. 28 मे
Click for answer
A. 11 मे
10. सृजनशीलतेसह स्वच्छतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्थानिक कलाकारांच्या सहभागाने ज्या रेल्वे स्थानक परिसरांचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाले होते, अशा रेल्वे स्थानकांमध्ये भारतीय रेल्वे मध्ये सर्वाधिक सुंदर स्थानक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या रेल्वे स्थानकाला गौरविण्यात आले ?
A. भुसावळ
B. चंद्रपूर
C. दादर
D. नांदेड
Click for answer
B. चंद्रपूर
भारतीय रेल्वे मध्ये सर्वाधिक सुंदर स्थानक म्हणून सर्वोत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करणाऱ्या मध्य रेल्वेच्या बल्हारशाह आणि चंद्रपूर स्थानकांना (नागपूर विभाग) प्रथम क्रमांक देण्यात आला. बल्हारशाह आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर ताडोबा अभयारण्याची चित्र आणि मूर्तिकलेने सुशोभित करण्यात आले आहे. दोन्ही स्थानकांना 10 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.
बिहारमधील मध्य रेल्वेच्या मधुबनी रेल्वे स्थानक आणि दक्षिण रेल्वेच्या मदुराई रेल्वे स्थानकातल्या द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे. मधुबनी स्थानकावर मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 100 कलाकारांनी 10 दिवसात मधुबनी चित्र काढली होती, द्वितीय पुरस्कार विजेत्या स्थानकांना 5 लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
कोटा स्थानक (पश्चिम मध्य रेल्वे), गांधीधाम स्थानक (पश्चिम रेल्वे) तसेच सिकंदराबाद स्थानकाला (दक्षिण मध्य रेल्वे) तृतीय पुरस्कार जाहीर केला आहे. तृतीय पुरस्कार विजेत्या स्थानकांना तीन लाख रुपयांचे बक्षिस देण्यात आले.
Newer Post
Older Post
Home