चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -2 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. कोणत्या देशात नुकत्याच घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये गर्भपातासंदर्भातील अतिशय कडक कायदे रद्द करण्याच्या बाजूने जनतेने मुख्यत्वे कौल दिला आहे ?

A. इंग्लंड
B. आर्यलंड
C. आईसलँड
D. ग्रीनलँड


Click for answer

B. आर्यलंड

आयर्लंडमध्ये गर्भपाताच्या संदर्भात अतिशय कडक कायदे आहेत. आयरीश घटनेनुसार गर्भ आणि मातेला जगण्याचे समान अधिकार बहाल करण्यात आले आहेत.आयर्लंडच्या राज्यघटनेतील आठव्या कलमानुसार गर्भपात करणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे. यासाठी 14 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.

28 ऑक्टोबर 2012 ला भारतीय वंशाच्या आणि मूळच्या कर्नाटकातल्या असलेल्या पेशानं डेंटीस्ट असलेल्या सविता हलप्पनावार यांचा वेळीच गर्भपात न झाल्यानं मृत्यू झाला होता. त्या गरोदर होत्या. त्यांना त्रास होऊ लागल्यानं त्यांचा गर्भपात करणं आवश्यक होतं. परंतु, इथल्या कायद्यानुसार, गर्भपात करणं अवैध असल्यानं त्या अॅडमिट असलेल्या युनिव्हर्सिटी हॉस्पीटल गॉलवेनं गर्भपात करण्यास नकार दिला. या दरम्यान, प्रथम सविता यांच्या पोटातील बाळाचा तर काही दिवसांत सविता यांचा मृत्यू झाला.

सविता यांच्या अशा परिस्थितीतल्या मृत्यूनंतर संपूर्ण आयर्लंडमध्ये गर्भपातावरील बंदी विरोधात आंदोलन उसळलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हे सार्वमत घेण्यात आले.

आयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर या कायद्यात बदल व्हावा या मताचे आहेत. वराडकर हे मूळचे भारतीय वंशाचे असून त्यांचे वडील महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्गातले आहेत.

2. मारिआनो रेजॉय हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत ?

A. स्पेन
B. फ्रान्स
C. इटली
D. स्वित्झर्लंड


Click for answer

A. स्पेन

स्पेनचे पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांच्यासमोर पद गमावण्याची वेळ आली आहे. देशातल्या एका प्रमुख पक्षानं रेजॉय यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं आहे. पंतप्रधान मारिआनो रेजॉय यांच्या पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सँचेझ यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला.

पीपल्स पार्टीचे माजी खजिनदार लुइस बार्सेनस यांना 33 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर भ्रष्टाचाराचं प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर या घडामोडी होत आहेत.

3. आंतरराष्ट्रीय बालदिन कधी साजरा केला गेला ?

A. 14 नोव्हेंबर
B. 21 मार्च
C. 30 मे
D. 1 जून


Click for answer

D. 1 जून

Save the Children या संस्थेनं नुकताच सादर केलेल्या अहवालात म्हटल्याप्रमाणे गरिबी, युद्ध किंवा संघर्ष आणि लिंगभेद या तीन मुख्य कारणांमुळे जगातल्या अर्ध्या मुलांचं आयुष्य धोक्यात आहे.

Save the Children या संस्थेनं सर्व्हे केलेल्या 175 देशांच्या यादीत भारताचा 113वा क्रमांक लागतो. जगातली तब्बल 30 टक्के गरीब मुलं भारतात राहतात, असं या संस्थेचं म्हणणं आहे.बालकांची स्थिती तुलनेने सगळ्यांत चांगली असलेल्या देशांमध्ये सिंगापूर आणि स्लोव्हेनिया देशांचा अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक असून नायजर, माली आणि सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकमधली मुलं सगळ्यात जास्त धोक्यात आहेत.

Save the Children यांच्या End of Children Indexनुसार जगातल्या सुमारे 1.2 अब्ज मुलांचं आयुष्य धोक्यात आहे.

4. येत्या सहा महिन्यांत लॅपटॉप कसे चालवायचे, हे शिका नाहीतर मंत्रिमंडळातून तुम्हाला काढून टाकण्यात येईल, असा इशारा कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्या सहकाऱ्यांना नुकताच दिल्याने ते चर्चेत होते ?

A. अमेरिका
B. नेपाळ
C. भारत
D. स्वीडन


Click for answer

B. नेपाळ

असा इशारा नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपल्या नवीन मंत्र्यांना दिला आहे. पंतप्रधानांच्या कार्यालयाला येत्या सहा महिन्यांत पेपरलेस केले जाईल, असेही ओली यांनी जाहीर केले आहे.

ओली यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा पदभार स्वीकारला होता.

5. महातीर मोहंमद हे कोणत्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान आहेत ?

A. इंडोनेशिया
B. मलेशिया
C. थायलंड
D. मालदीव


Click for answer

B. मलेशिया

6. नुकतेच ट्रम्प प्रशासनाने आपल्या अमेरिका पॅसेफिक कमांडचे नाव बदलून काय केले आहे ?

A. हिंद पॅसेफिक कमांड
B. मध्यआशिया कमांड
C. सेन्ट्रल की कमांड
D. इंडिया ऑस्ट्रेलिया कमांड


Click for answer

A. हिंद पॅसेफिक कमांड

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्थापन करण्यात आलेली अमेरिका पॅसेफिक कमांड यापुढे हिंद पॅसेफिक कमांड म्हणून ओळखली जाणार आहे. या बदलाने अमेरिकेच्या रणनीतीमध्ये असणारे हिंद महासागराचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

7. भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याच्या नव्या राजकीय पक्षाची नुकतीच औपचारिक स्थापना झाली. त्याच्या पक्षाचे नाव काय आहे ?

A. नवीन फॉरवर्ड ब्लॉक
B. हमरो सिक्कीम पार्टी
C. सिक्कीम तृणमूल कॉंग्रेस
D. सिक्कीम सन्मान पक्ष


Click for answer

B. हमरो सिक्कीम पार्टी

भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतिया याच्या नव्या राजकीय पक्षाची औपचारिक स्थापना झाली. हमरो सिक्कीम पार्टी (एचएसपी) असे नाव पक्षाला देण्यात आला आहे. भुतियाचा पक्ष सिक्कीममध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक लढवण्यास सज्ज झाला आहे.

भुतियाने तृणमूल कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात उडी घेतली. तृणमूलच्या तिकिटावर त्याने पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकही लढवली होती.

8. तुतिकोरिन येथे वेदांत ग्रुपच्या स्टरलाइट कॉपर प्रकल्पाविरोधात गेले महिनाभर सुरु असलेल्या आंदोलनानंतर तेथील राज्यसरकारने या प्रकल्पाला टाळे लावले आहे . हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. केरळ
D. आंध्रप्रदेश


Click for answer

B. तामिळनाडू

प्रकल्पाविरोधात लोकांनी आंदोलन पुकारल्यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 13 जणांचा मृत्यू झाला होता. अखेर सामान्य नागरिकांच्या लढ्याला यश मिळालं असून, सरकारने प्रकल्प कायमस्वरुपी बंद केला आहे. तामिळनाडू सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाला कॉपर प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. भूजल प्रदुषित होत असून यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांनी म्हटले होते.

वेदांत उद्योग समुहातील 'स्टरलाइट कॉपर' नावाच्या कंपनीचा तुतिकोरीन येथील तांबेनिर्मिती प्रकल्प कायमचा बंद करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले आहेत. या प्रकल्पातून वर्षाला 4 लाख टन तांबेनिर्मिती व्हायची. देशभरात दरवर्षी 10 लाख टन तांबेनिर्मिती होते. म्हणजेच देशातील तांब्याच्या उत्पादनात तुतिकोरीन प्रकल्पाचा वाटा 40 टक्के इतका होता.

तांब्याचा वापर प्रामुख्याने इलेक्ट्रीकल सेक्टरमध्ये होतो. वायर आणि ट्रान्सफॉर्मरसाठी तांब्याचा वापर केला जातो.

9. अभियांत्रिकी क्षेत्रातील अग्रणी लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोने आपल्या विद्युत आणि स्वयंचालन (ई अ‍ॅण्ड ए) व्यवसायाचे अंग पूर्णपणे 14000 कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यात कोणत्या जागतिक कंपनीकडे हस्तांतरणाचा करार केला आहे ?

A. श्नायडर इलेक्ट्रिक
B. जनरल इलेक्ट्रिक(GE)
C. ABB
D. क्रॉम्प्टन ग्रीव्हज


Click for answer

A. श्नायडर इलेक्ट्रिक

एल अ‍ॅण्ड टीच्या गैर-मूलभूत व्यवसायातून अंग काढून घेण्याच्या व्यापक रणनीतीचा एक भाग म्हणून ई अ‍ॅण्ड ए व्यवसायातून ही निर्गुतवणूक करण्यात आली आहे. यातून आपल्या भागधारकांसाठी दीघरेद्देशी मूल्य निर्मितीस हातभार लागणार आहे, असे लार्सन अ‍ॅण्ड टुब्रोचे मुख्याधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रह्मण्यन यांनी स्पष्ट केले.आहे.

10. जागतिक दूध दिन (World Milk Day) कधी पाळण्यात आला ?

A. 24 मे
B. 27 मे
C. 31 मे
D. 1 जून


Click for answer

D. 1 जून