चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -24 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घेतलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2018 मध्ये देशातील स्वच्छ राजधानीच्या शहराचा मान कोणत्या शहरास मिळाला आहे ?

A. मुंबई
B. जयपूर
C. बेंगळूरू
D. हैदराबाद


Click for answer

A. मुंबई

एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत नवी मुंबईने 9 आणि पुण्याने दहावा क्रमांक मिळवला आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातील 100 शहरांपैकी पाचगणी, शिर्डी, काटोल, मलकापूर, लोणावळा, औसा व भोर या सात शहरांचा समावेश झाला आहे..

हे सर्वेक्षण जानेवारी 2018 मध्ये झाले होते. त्यात सुमारे 40 निकषांवर हे सर्वेक्षण घेण्यात आले.

या सर्वेक्षणात राष्ट्रीय स्तरावर आलेले पहिले तीन शहरे आहेत (अनुक्रमे)- इंदूर, भोपाळ आणि चंडीगड.

सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत अमरावती जिल्ह्यातील शेंदुर्जना घाट शहराला आणि पुणे जिल्ह्यातील सासवडला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

2. कोणत्या देशाने आज पासून महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार प्रदान केला ?

A. कुवेत
B. इराण
C. अफगाणिस्तान
D. सौदी अरेबिया


Click for answer

D. सौदी अरेबिया

26 सप्टेंबर 2017 ला सौदीच्या राज्यांनी काढलेल्या फर्मानानुसार महिलांना वाहन चालविण्याचा अधिकार आजपासून प्रदान केला.

महिला हक्क कार्यकर्ते सौदीत 1990 पासूनच या अधिकाराची मागणी करत होते. न्यायपालिका आणि शिक्षणाच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणा-या काही मूलतत्ववादी मौलवींचा याला विरोध होता.

3. पाकिस्तानचे माजी अध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. ते कोणत्या पक्षाचे पक्षप्रमुख होते ?

A. अवामी नॅशनल पार्टी(ANP)
B. ऑल पाकिस्तान मुस्लिम लिग (एपीएमएल)
C. पाकीस्तान मुस्लिम लीग
D. जमाते इस्लामी


Click for answer

B. ऑल पाकिस्तान मुस्लिम लिग (एपीएमएल)

ेशावर उच्च न्यायालयाने त्यांना राजकारणापासून आजीवन अपात्र ठरवल्यामुळे मुशर्रफ यांनी एपीएमएलच्या प्रमुख पदाचा राजीनामा पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडे पाठविला आहे.

मुशर्रफ पक्षाचे सर्वोच्च नेते राहतील. मुशर्रफ यांनी एपीएमएलची स्थापना 2010 मध्ये केली होती. 73 वर्षीय मुशर्रफ यांनी पाकिस्तानवर 9 वर्ष (1999-2008) सत्ता केली.

त्यांच्यावर अनेक न्यायालयीन प्रकरणे चालु आहेत ज्यात 2007 मधील माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या कथित हत्येचाही समावेश आहे. अशा प्रकरणांमुळे ते 2013 ची निवडणूक लढवू शकले नव्हते.

पाकिस्तानचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती साकिब निसार यांनी मुशर्रफ यांना पाकिस्तानला परत येण्याचे आदेश दिला होता आणि 14 जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते, परंतु मुशर्रफ अपयशी ठरले.

4. कनिष्ठ कर्मचाऱ्यासोबत रिलेशनशीपमध्ये असल्यामुळे टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीतील अग्रगण्य कंपनींपैकी एक मानल्या जाणाऱ्या कोणत्या कंपनीचे सीईओ ब्रायन क्रेझनिक यांना राजीनामा द्यावा लागला आहे ?

A. मायक्रोसॉफ्ट
B. इंटेल
C. एबीसी
D. ट्वीटर


Click for answer

B. इंटेल

काही काळापूर्वी 58 वर्षीय क्रेझनिक हे एका ज्युनिअरसोबत परस्पर संमतीने रिलेशनशीपमध्ये होते. पण या नातेसंबंधांमुळे कंपनीच्या मॅनेजर्ससाठी लागू असलेल्या धोरणांचे उल्लंघन झाले असल्याचे अंतर्गत आणि बाह्य समितीच्या चौकशीत उघड झाले. मे 2013 पासून पाच वर्ष त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरची धुरा सांभाळली आहे.

क्रेझनिक पायउतार झाल्यानंतर रॉबर्ट स्वॉन यांना अंतरिम सीईओपद देण्यात आले आहे.

5. केंद्रीय ऊर्जा मंत्रालय एअर कंडिशनरसाठी लवकरच किमान तापमानाची मर्यादा किती करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे ?

A. 16 अंश सेल्सियस
B. 20 अंश सेल्सियस
C. 22 अंश सेल्सियस
D. 24 अंश सेल्सियस


Click for answer

D. 24 अंश सेल्सियस

केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग 'एसी' चालू केला की त्याचे तापमान आपोआप 24 अंश सेल्सिअसवरच राहील अशी व्यवस्था (डिफॉल्ट टेम्परेचर) उत्पादकांना त्या यंत्रातच करायला सांगण्याचा सरकारचा विचार आहे. हे अंमलात आल्यास विजेचा वापर कमी होऊन कोट्यवधींची बचत होईल.या सर्वांचे 'डिफॉल्ट सेटिंग' केले तर 40 दशलक्ष युनिट विजेची रोज बचत होऊ शकेल.

6. इमरसन मंगाग्वा हे कोणत्या आफ्रिकन देशाचे अध्यक्ष आहेत ?

A. केनिया
B. इथोपिया
C. झिंबाब्वे
D. दक्षिण आफ्रिका


Click for answer

C. झिंबाब्वे

झिंबाब्वेचे अध्यक्ष इमरसन मंगाग्वा यांच्या रॅलीदरम्यान स्फोट झाला आहे. या स्फोटात अध्यक्ष बचावले आहेत. 15 जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

रॉबर्ट मुगाबे यांच्या 37 वर्षांच्या एकछत्री सत्तेनंतर झिंबाव्वेचे अध्यक्ष म्हणून इमरसन मंगाग्वा गेल्या नोव्हेंबरमध्येच निवडून आले. बुलावायो शहरातल्या व्हाईट सिटी स्टेडियममध्ये एका रॅलीला ते उपस्थित होते. तेव्हा हा स्फोट झाला.

7. अॅमेझॉनचे संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी ओळख असणारे ______________यांनी नुकतीच जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळला भेट दिली.

A. जेफ बेजोस
B. बिल गेट्स
C. वॉरन एडवर्ड बफे
D. मार्क इलियट झुकरबर्ग


Click for answer

A. जेफ बेजोस

बेजोस त्यांच्या खासगी विमानाने आले. बेजोस पत्नी आणि मुलांसह अजिंठा आणि वेरूळमधील लेण्या पाहिल्या. यानंतर ते वाराणसीला गेले.

8. पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त कोण आहेत ?

A. राजीव कुमार चंदर
B. अमनदीप सिंह गिल
C. अजय बिसारीया
D. राहुल श्रीवास्तव


Click for answer

C. अजय बिसारीया

पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त अजय बिसारीया यांना शनिवारी पाकिस्तानातील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. अजय बिसारीया यांना रावळपिंडीतील गुरुद्वारा पंजा साहिबमध्ये प्रार्थनेसाठी जायचे होते पण त्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने ते चर्चेत होते.

9. संयुक्‍तराष्ट्रांच्या/चे ______________________ जीन पायरे लॅक्‍रोईक्‍स हे भारताह तीन देशांच्या भेटीवर येत आहेत.

A. महासचिव
B. शांतीसेना विभागाचे प्रमुख
C. आमसभेचे अध्यक्ष
D. सुरक्षा परिषदेचे सचिव


Click for answer

B. शांतीसेना विभागाचे प्रमुख .

23 जुलै पासून 3 जुलै पर्यंत त्यांचा हा दौरा असून प्रथम ते बांगलादेश, नेपाळ या देशांना भेट दिल्यानंतर भारतात येणार आहेत. त्यानंतर ते पाकिस्तानला जातील. संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत या देशांच्या लष्करानेही मोठे योगदान दिले असल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आणि शांतीसेनेच्या कार्याची माहिती देण्यासाठी ते हा दौरा करीत आहेत.

10. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकविणारे आणि त्यासाठी पत्रकार परिषद घेणारे कोणते न्यायाधीश 22 जून रोजी सेवानिवृत्त झाले ?

A. न्यायाधीश जे.चेल्लमेश्वर
B. न्यायाधीश रंजन गोगई
C. न्यायाधीश एम.बी.लोकूर
D. न्यायाधीश कुरीयन जोसेफ


Click for answer

B. न्यायाधीश जे.चेल्लमेश्वर

न्यायाधीश रंजन गोगई, एम.बी.लोकूर आणि कुरीयन जोसेफ यांच्यासोबत चेल्लमेश्वर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यापूर्वी देशात कधीही न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेण्यात आली नव्हती. या पत्रकार परिषदेची धूरा चेल्लमेश्वर यांच्याकडे होती. लोकशाही तसेच न्यायपालिकेच्या स्वतंत्र आणि नि:पक्षपातीपणावर ताशेरे ओढले होते. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवर शंका उपस्थित केली होती.जे.चेल्लमेश्वर 7 वर्षे सर्वोच्च न्यायालयात कार्यरत होते. सेवानिवृत्त होण्याच्या दिवशीच त्यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान रिकामे केले आणि ते मूळ गावी परत गेले.