चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -22 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे ?

A. डॉ. श्रीराम नेने
B. डॉ. अतुल गावंडे
C. डॉ. प्रितेश पंड्या
D. डॉ. समीर धर्माधिकारी


Click for answer

B. डॉ. अतुल गावंडे

अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत.

पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे एंडोक्राइन सर्जन आहेत. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.

अतुल गावंडे जसे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहेत, तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यांमुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे.

अमेरिकेत राबवण्यात आलेल्या ओबामा केअर या आरोग्य योजनेमध्ये डॉ. गावंडे यांचा मोठा वाटा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी ती बंद केली. मात्र ओबामा केअरच्या आधारे भारतात सुरू होत असलेली आयुष्मान योजना आता मोदीकेअर नावाने ओळखली जात आहे.

2. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कोठे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी 1 लाख 10 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला ?

A. वडगाव बुद्रुक जि. पुणे
B. बालगाव (ता. जत) जि. सांगली
C. आमळगाव(ता. अंबड) जि. जालना
D. बारड(ता. यवतमाळ) जि. यवतमाळ


Click for answer

B. बालगाव (ता. जत) जि. सांगली

3. 21 जून 2018 ला साजरा झालेल्या योगदिनी कोणत्या ठिकाणी 2 लाखांहून अधिक लोकांसोबत बाबा रामदेव यांनी एकाच वेळी योग करत विश्वविक्रम केला आहे ?

A. हरिद्वार (उत्तराखंड)
B. कोटा (राजस्थान )
C. धरमशाला (हिमाचल प्रदेश )
D. डेहराडून (उत्तराखंड)


Click for answer

B. कोटा (राजस्थान )

या कार्यक्रमाचे आयोजन राजस्थान सरकारने केले होते. या कार्यक्रमासाठी राजस्थान सरकारने रामदेव बाबांना निमंत्रण दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची टीमदेखील यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होती. दोन लाखांहून अधिक लोकांनी एकाच वेळी योगासने केल्याने याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.

4. देशभरात राष्ट्रीय महामार्गांचे जाळे उभारण्यासाठी केंद्र सरकारने कोणता प्रकल्प सुरू केला आहे ?

A. पथदर्शक
B. भारतमाला
C. विजययात्रा
D. विजयमाला


Click for answer

B. भारतमाला

भारतमाला प्रकल्पातील पहिल्या फेरीतील निविदा प्रक्रियेला 2018 च्या अखेरपर्यंत सुरवात करण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत 60 हजार किमीपेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात येणार असून सरकारकडून 6.92 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येतील. पहिल्या फेरीमध्ये 24,800 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग उभारण्याचे काम करण्यात येणार आहे.

5. जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू केल्यानंतर छत्तीसगड केडरचे वरिष्ठ आयएएस बीवीआर सुब्रमण्यम यांना जम्मू काश्मीरच्या मुख्य सचिवपदी नियुक्त केले आहे. याशिवाय राज्यपालांचे सल्लागार म्हणून विजय कुमार यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते कोणत्या संवर्गातील अधिकारी आहेत ?

A. IAS
B. IPS
C. IRS
D. जम्मू आणि काश्मीर राज्य सेवा


Click for answer

B. IPS

विजयकुमार यांनी ऑपरेशन 'कोकून' अंतर्गत 18 ऑक्टोबर 2004 रोजी कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचा खात्मा केला होता. त्यांनी याबाबत एक पुस्तकही लिहिले आहे.

मनमोहन सिंह यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या कार्यकाळादरम्यान बीवीआर सुब्रमण्यम ययांचा आपले स्वीय सचिव नियुक्त केले होते. तसेच मनमोहन सिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांची संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. छत्तीसगडचे गृहसचिव म्हणून काम करताना त्यांनी नक्षलग्रस्त भागात उल्लेखनीय काम केले. त्यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळेच नक्षलग्रस्त बस्तर भागात 700 किमीचा रस्ता बनवणे शक्य झाले.

6. कोणते देवस्थान ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने अलिकडेच घेतला आहे ?

A. शनि शिंगणापूर
B. महालक्ष्मी मंदिर
C. शिखर शिंगणापूर
D. शिर्डीतील साई देवस्थान


Click for answer

A. शनि शिंगणापूर

कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर आणि शिर्डीतील साई देवस्थानच्या पार्श्‍वभूमीवर शनि शिंगणापूर येथील शनैश्‍वर देवस्थानाचा कारभारही राज्य सरकारच्या ताब्यात येणार आहे.

1963 सालापासून शिंगणापूरची अध्यक्ष निवडीची परंपरा मोडित निघणार आहे.

काही दिवसांपूर्वी शनी चौथर्‍यावर महिला प्रवेशासाठी देवस्थान संपूर्ण देशात चर्चेला आले.

7. फेमिना मिस इंडिया 2018 ची विजेती अनुकृती वास कोणत्या राज्याची रहिवाशी आहे ?

A. आसाम
B. तामिळनाडू
C. गुजरात
D. महाराष्ट्र


Click for answer

B. तामिळनाडू

फेमिना मिस इंडिया 2018 ची अंतिम फेरी मुंबईत पार पडली. या स्पर्धेत हरियाणाची मिनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्रप्रदेशची श्रेया राव ही दुसरी उपविजेती ठरली आहे.

8. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर यांनी कोणत्या राज्य सरकारच्या सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. केरळ
D. आंध्र प्रदेश


Click for answer

D. आंध्र प्रदेश

प्रभाकर यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपावरून व्यथित होऊन त्यांनी हा राजीनामा दिला आहे. दरम्यान, प्रभाकर यांचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे राज्याचे कृषिमंत्री सोमिरेड्डी चंद्रमोहन रेड्डी यांनी म्हटले आहे.

9. राज्य पुरस्कृत नवीन फळबाग लागवड योजना यंदाच्या वर्षापासून राज्यात सुरु करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे . या अंर्तगत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी पात्र ठरू न शकणार्‍या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार असून यंदाच्या वर्षासाठी किती रकमेची तरतूद करण्यात आली आहे ?

A. 1000 कोटी रूपये
B. 500 कोटी रूपये
C. 100 कोटी रूपये
D. 50 कोटी रूपये


Click for answer

C. 100 कोटी रूपये

या निर्णयामुळे राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे. राज्यात सध्या 18 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली आहे.

10. कोणत्या मासिकाच्या मुखपृष्ठावर बाळाला स्तनपान करतानाचा मॉडेलचा फोटो छापल्यामुळे केरळमध्ये प्रचंड वाद निर्माण झाला ? या संबंधीची याचिका केरळ उच्च न्यायालयाने नुकतीच निकालात काढली.

A. गृहशोभिका
B. मल्याळम मनोरमा
C. गृहलक्ष्मी
D. गृहप्रवेश


Click for answer

C. गृहलक्ष्मी

या मासिकाच्या 1 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या आवृत्तीवर मॉडेल गिलू जोसेफ हिचा बाळाला स्तनपान करतानाचा फोटो छापण्यात आला होता. समाजात ब्रेस्टफिडींग विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी विशेषांक काढला होता. मासिकाच्या विरोधात काही जणांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र अश्लिलता ही फोटोत नसून बघणाऱ्याच्या डोळ्यात आहे, असं म्हणत केरळच्या उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जोरदार चपराक दिली आहे.