चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -18 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. अमेरिकेतील अॅण्डी नेतृत्व संस्थेच्या यंग विमेन पीस बिल्डर्स कार्यक्रमासाठी निवड झालेली एकमेव भारतीय महिला कोण ?
A. राधिका चव्हाण
B. सावनी पालकर
C. सलमा हुसेन
D. सीतला देवी
Click for answer
C. सलमा हुसेन
आसामची सलमा हुसेन 5 ऑगस्टपासून शांतता प्रशिक्षणात सहभागी होणार आहे.
नॅशनल फाऊंडेशन ऑफ इंडियाचा युवा शांती पुरस्कार तिला 2017-18 मध्ये मिळाला होता.
अमेरिकेतील अॅण्डी फाऊंडेशन ही 2008 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे, ती अशा महिलांना प्रशिक्षण देते ज्या मानवतावाद, राजनीती यांसारख्या क्षेत्रात चांगले काम करतात.
2. लेखिका ओल्गा टोकार्झुक यांच्या कोणत्या कादंबरीला यावर्षीचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार अलीकडेच मिळाला ?
A. फ्लाइट्स
B. लिंकन इन द बर्डो
C. अ हॉर्स वॉक्स इनटू अ बार
D. द सेलआउट
Click for answer
A. फ्लाइट्स
हा पुरस्कार मॅन बुकर पुरस्काराचेच भावंड असून तो इंग्रजीत अनुवादित कादंबऱ्यांना देण्यात येतो. ‘फ्लाइट्स’ या कादंबरीचे इंग्रजी भाषांतर हे जेनिफर क्रॉफ्ट यांनी केले असून या पुरस्काराची ५०हजार पौंडाची रक्कम दोघींना समान वाटली जाणार आहे. त्यांच्या ‘फ्लाइटस’ या कादंबरीला यापूर्वी पोलंडचा सर्वोच्च नाइके साहित्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर जर्मन पोलिश इंटरनॅशनल ब्रिज पुरस्कारही त्यांना लाभला.
3. इस्त्रायलमधील अशकेलॉन शहाराच्या महापौरपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय वंशाची कोणती महिलाही उतरली आहे ?
A. डॉ. शॉना पंड्या
B. डॉ. रिंकी सहाय
C. अनु नटराजन
D. पिया सिन्हा
Click for answer
A. डॉ. रिंकी सहाय
डॉ. रिंकी सहाय असे या उमेदवाराचे नाव असून त्या मुळच्या महाराष्ट्रातील आहेत. बडोदा आणि अशकेलॉन शहरात झालेल्या करारामुळे निवडणूक लढण्यास आपण प्रेरित झाल्याचे रिंकी यांनी म्हटले आहे. त्यांचे आई-वडील हे महाराष्ट्रीयन ज्यू आहेत. 1964 मध्ये ते इस्त्रायलमध्ये स्थायिक झाले होते. अशकेलॉन शहरात महाराष्ट्रातील ज्यू समुदाय मोठ्याप्रमाणात आहे. रिंकी यांना त्यांचा चांगला पाठिंबा मिळत आहे.
4. अलीकडेच वनस्पतिशास्त्रातील मानाचा लिनियन पुरस्कार मिळालेले भारतीय वैज्ञानिक कोण ?
A. डॉ. कैलाशनाथ कौल
B. डॉ. लालजी सिंह
C. डॉ. अभय अष्टेकर
D. डॉ. कमलजित बावा
Click for answer
D. डॉ. कमलजित बावा
लिनियन सोसायटी ऑफ लंडनचा हा पुरस्कार मिळालेले ते पहिलेच भारतीय वैज्ञानिक. सध्या डॉ. बावा बंगळूरु येथील ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी’ संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे संशोधन हे जैवविविधता व वनस्पतिशास्त्रातील आहे.
हिमालयाच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यात डॉ. कमलजित बावा यांचे मोठे योगदान आहे.
5. मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी कोणाला जाहीर झाला आहे ?
A. डॉ. बाबा आढाव,
B. डॉ. आ. ह. साळुंखे
C. प्रा. एन.डी. पाटील
D. सत्यपाल महाराज
Click for answer
D. सत्यपाल महाराज
मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर झाला आहे.
समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या गोष्टीं मुळापासून नष्ट करण्यासाठी लोकजागृती केली. मनोरंजनाच्या माध्यमातून सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाजातील लोकांपर्यंत पोचवली.
या पुरस्काराने आतापर्यंत डॉ. भा.ल. भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. एन.डी. पाटील, रामकृष्णदादा बेलूरकर, शरद जोशी, डॉ. सदानंद मोरे, अॅड. मा.म. गडकरी, गिरीश कुबेर यांना गौरविण्यात आले आहे.
6. बेगम खलिदा झिया या कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान आहेत ?
A. पाकिस्तान
B. इंडोनेशिया
C. बांगलादेश
D. मलेशिया
Click for answer
C. बांगलादेश
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खलिदा झिया या सध्या अत्यवस्थ असून त्या स्वत: चालू देखील शकत नाहींत इतक्या गंभीर आजारी आहेत . 72 वर्षीय खलिदा झिया या तीन वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्यांना एका भ्रष्टाचार प्रकरणात पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.
7. गुल बुखारी कोण आहेत?
A. पाकिस्तानी पत्रकार
B. इराणी व्यावसायिक
C. बांगलादेशातील प्राध्यापिका
D. काश्मीर मधील वार्ताहर
Click for answer
A. पाकिस्तानी पत्रकार
पाकिस्तानातील लष्करशाहीला आणि लष्करी प्रभावाला सातत्याने विरोध करणाऱ्या पत्रकारांपैकी त्या एक आहेत. अलीकडे त्यांचे अपहरण झाल्याने त्या चर्चेत होत्या.
8. पत्रकार शुजात बुख़ारी यांची अलीकडेच श्रीनगर येथे हत्या करण्यात आली. ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ?
A. रायझिंग काश्मीर
B. द डॉन
C. द हिंदू
D. व्हॅली
Click for answer
A. रायझिंग काश्मीर
9. अॅलन बीन यांचे मे 2018 मध्ये निधन झाले. ते कोण होते ?
A. अमेरिकेतील राजकीय भाष्यकार
B. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ
C. अमेरिकेचे माजी उप राष्ट्राध्यक्ष
D. चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चांद्रवीर
Click for answer
D. चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चांद्रवीर .
चंद्रावर ज्या बारा लोकांनी पाऊल ठेवले, त्यातील ते एक. ते चंद्रावर पाऊल ठेवणारे अमेरिकेचे चौथे चांद्रवीर होते . शिवाय चित्रकार होते.
10. मे 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून मिया मोट्ले यांना निवडण्यात आले आहे ?
A. बार्बाडोस
B. मोरोक्को
C. उझबेकिस्तान
D. बेलारूस
Click for answer
A. बार्बाडोस
Newer Post
Older Post
Home