चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -17 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. भारतीय वंशाच्या 39 वर्षीय दिव्या सूर्यदेवरा कोणत्या ऑटो कंपनी जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ ( मुख्य वित्त अधिकारीपदी ) बनल्या आहेत ?

A. फॉक्सवॅगन मोटर्स
B. हुंडाई मोटर्स
C. जनरल मोटर्स
D. टेस्ला मोटर्स


Click for answer

C. जनरल मोटर्स

भारतीय वंशाच्या 39 वर्षीय दिव्या सूर्यदेवरा अमेरिकेतील बलाढ्य ऑटो कंपनी जनरल मोटर्सच्या पहिल्या महिला सीएफओ( मुख्य वित्त अधिकारीपदी ) बनल्या असून त्या त्याचा पदभार सप्टेंबर मध्ये स्वीकारणार आहेत.

जनरल मोटर्सच्या सीईओ मेरी बर्स्त.

सूर्यदेवरा सध्या जनरल मोटर्समध्ये कॉर्पोरेट फायनान्स उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत.

मेरी बारा या 2014 पासून कंपनीच्या सीईओ असून ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. दोन प्रमुख पदांवर महिला कार्यरत असलेली जनरल मोटर्स ही पहिली कंपनी बनली आहे.

मुळच्या चैन्नइच्या असलेल्या दिव्या सूर्यदेवरा यांनी मद्रास विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी वयाच्या 22 व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए करून अमेरिका गाठली. 2005 मध्ये म्हणजे वयाच्या 25 व्या वर्षी त्या जनरल मोटर्सशी जोडल्या गेल्या. तत्पूर्वी त्या यूबीएस आणि प्राइस वॉटर हाऊस कूपर्समध्ये काम केले होते.

वर्ष 2016 मध्ये त्यांना ऑटोमोटिव्ह न्यूज रायजिंग स्टारसाठी नामांकित करण्यात आले होते.

2. न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या 223 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच सीईओ म्हणून कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे ?

A. स्टेसी कनिंघम
B. मरिया बार्रा
C. मर्लिन हेसन
D. एलिसा इलीस


Click for answer

A. स्टेसी कनिंघम

जनरल मोटर्समध्ये मरिया बार्रा, लॉकहीड मार्टिन मर्लिन हेसन, फोर्ड फाउण्डेशनच्या एलिसा इलीस, आयबीएमच्या गिनी रॉपेटी आणि पेप्सीच्या इंद्रा नूयी या महिलांनी आपल्या कार्यातून जागतिक पातळीवर छाप सोडली आहे. नुकतीच अमेरिकेच्या सीआयएच्या संचालक म्हणून जीना हॉस्पेल यांची निवड झाली आहे.

3. कर चोरी प्रकरणात रिअल माद्रिदच्या कोणत्या स्टार खेळाडूने दोन वर्षांची शिक्षा स्विकारली आहे ?

A. क्रिस्टियानो रोनाल्डो
B. लिओनेल मेस्सी
C. रोनाल्डिन्हीओ
D. काका


Click for answer

C. क्रिस्टियानो रोनाल्डो

क्रिस्टियानो रोनाल्डोवर याशिवाय 18.8 मिलियन यूरो (21.8 मिलियन डॉलर)चा दंड देखील लागणार आहे. तो स्पॅनिश कायद्यानुसार तुरुंगात न जाता देखील शिक्षा भोगू शकतो. 33 वर्षाच्या फुटबॉलरवर 14.7 मिलियन यूरोचा टॅक्स चोरल्याचा आरोप आहे. पण आपल्या एजेंटच्या माध्यमातून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.

4. यावर्षीच्या फुटबॉल विश्वचषकात प्रथमच 'वॉर' प्रणालीचा वापर करण्यात आहे . 'वॉर' हे कसले संक्षिप्त रूप आहे ?

A. Video aided referee technology
B. Video assistant referal technology
C. Video aided referance technology
D. Video assistant referee technology


Click for answer

D. Video assistant referee technology (VAR)

याचा पहिला लाभ फ्रान्सला झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नव्या प्रणालीअंतर्गत फ्रान्सला पेनल्टी बहाल करण्यात आली.

5. यावर्षीचा फुटबॉल विश्वचषकाची सुरूवात जगविख्यात पॉप गायक रोबी विलियम्स याने गायिलेल्या कोणत्या शुभारंभी गीताने झाली ?

A. लेट मी एन्टरटेन यू
B. लिव्ह इट अप
C. कलर्स
D. मॅजिक इन द एयर


Click for answer

A. लेट मी एन्टरटेन यू

6. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत __________ टिंकरिंग प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी आणखी 3000 शाळांची निवड करण्यात आली आहे.

A. परिवर्तन
B. अब्दुल कलाम आझाद
C. अटल
D. श्यामाप्रसाद मुखर्जी


Click for answer

C.अटल

यामुळे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असणाऱ्या शाळांची संख्या 5,441 होणार आहे. निवड झालेल्या शाळांना या अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी पाच वर्षांकरिता 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. देशभरातल्या माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि उद्योजकतेची जोपासना व्हावी हा या प्रयोगशाळांमागचा उद्देश आहे.

लवकरच देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यामुळे कल्पकता, नवनवे शोध यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन तंत्रविषयक कल्पकतेमध्ये परिवर्तन घडणे सुलभ होणार आहे.

अटल इनोव्हेशन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथन रामानन.

7. रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट व निती आयोग यांनी सन 2017 मध्ये संयुक्तपणे आयोजित केलेल्या चलनवलन विकास संदभार्तील चँलेज या उपक्रमात कोणत्या शहराची भारतातील पहिले दीपस्तंभ शहर म्हणून निवड झाली ?

A. पुणे
B. मुंबई
C. नागपूर
D. औरंगाबाद


Click for answer

A. पुणे

पुण्याचे प्रशासन, सुव्यवस्थाविषयक नेतृत्व, शहरी चलनवलनासंबधी दिसणारी कार्यशिलता व स्मार्ट शहर चळवळ या निकषांवर पुणे शहराची यात निवड करण्यात आली आहे. रॉकी माऊंटन चे व्यवस्थापकीय संचालक जेम्स ल्युकोंब यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांनी पत्र पाठवून याची माहिती दिली.

8. 'गुजरात फाइल्स : अॅनाटॉमी ऑफ अ कवर-अप' या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत ?

A. नीलम सक्सेना चंद्रा
B. अरुंधति रॉय
C. सुधा मूर्ती
D. राणा अय्युब


Click for answer

D. राणा अय्युब

2002ला झालेल्या गुजरात दंगलींवर 'गुजरात फाइल्स : अॅनाटॉमी ऑफ अ कवर-अप' हे पुस्तक लिहिणाऱ्या पत्रकार राणा अय्युब यांनी म्हटलं आहे की त्यांना खुनाच्या आणि सामूहिक बलात्काराच्या धमक्या येत आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या (UN) मानवीहक्क परिषदेने याची दखल घेत यावर चिंता व्यक्त केली असून सरकारने राणा अय्युब यांच्या सुरक्षेची सरकारने तजवीज करावी असं म्हटलेलं आहे.

9. कोणत्या देशाचे माजी राष्ट्रपती असलेल्या मौमून अब्दुल गयूम यांना तेथील न्यायालयाने 19 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे ?

A. इंडोनेशिया
B. मालदिव
C. फिलिपाईन्स
D. बांगलादेश


Click for answer

B. मालदिव

19 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा मालदिवचे माजी राष्ट्रपती मौमून अब्दुल गयूम यांच्यासह इतर दोन जणांना सुनावण्यात आली आहे. मालदिवचे माजी सरन्यायाधीश अब्दुल्ला सईद आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अली हमीद यांचा शिक्षा सुनावण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. पोलीस तपासात सहकार्य न केल्याचाच आरोप या दोघांवरही ठेवत त्यांनाही प्रत्येकी 19 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

10. सरकारी अधिकारी, कर्मचा-यांना दमबाजी, मारहाण करणे त्यांच्यावर लोकप्रतिनिधींकडून हल्ला होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. त्याला आळा बसावा राज्य सरकारने भारतीय दंडविधानाच्या कलम 332, 353 आणि दंडप्रक्रिया संहिता कलम 309 मध्ये सुधारणा करीत अशा गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाल्यास कमाल किती शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे ?

A. तीन वर्षे
B. पाच वर्षे
C. सात वर्षे
D. दहा वर्षे


Click for answer

B. पाच वर्षे

कलम 353 खाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस दोन वर्षे शिक्षेची तरतूद होती. आता या दोन्ही कलमांखाली दोषी ठरलेल्या व्यक्तीस यापुढे पाच वर्षे शिक्षा भोगावी लागणार आहे. दंडप्रक्रिया संहितेच्या कलम 309 मधील बदलामुळे शासकीय अधिकारी, कर्मचा-यांवर हल्ला करणा-या व्यक्तीच्या विरोधातील खटला सहा महिन्यांच्या आत चालवून त्याचा निकाल दिला जाणार आहे.

भारतीय दंडविधान कलम 332, 353 अन्वये दाखल होणारे खटले यापुढे दखलपात्र, अजामीनपात्र झाले असून ते सत्र न्यायालयात चालविले जाणार आहेत.