चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -19 जून 2018


2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका

1. कोणत्या देशाने भारताशी झालेला ऍसम्प्शन बेटावरील नौदल तळ करार रद्द केला आहे ?

A. मालदीव
B. हवाई
C. सेशेल्स
D. न्यूझीलंड


Click for answer

C. सेशेल्स

ऍसम्प्शन बेटावर नौदल तळ परियोजनेचा करार सन 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेशेल्स भेटीत करण्यात आला होता.

2. कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) असलेल्या रुपर्ट स्टॅडलर यांना नुकतीच अटक करण्यात आली ?

A. ऑडी
B. फोक्सवॅगन
C. निसान
D. सुझुकी


Click for answer

A. ऑडी

फोक्सवॅगनच्या डिझेल कारमधून होणाऱ्या प्रदूषणाबाबत फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ऑडी ही जर्मनीतील जगविख्यात कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीनीचीच फोक्सवॅगन ही पेरेंट कंपनी आहे.

युरोपातील ग्राहकांना विकण्यात आलेल्या डिझेल कारमध्ये स्टॅडलर यांनी बनावट सॉफ्टवेअर टाकून त्यांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.

3. कोणत्या राज्यात राज्यसरकार आणि आयएएस अधिकारी यांच्यातील विसंवादामुळे कामकाज ठप्प झाल्याचा आरोप तेथील मुख्यमंत्र्यांनी केला आहे ?

A. दिल्ली
B. पद्दुचेरी
C. तेलंगणा
D. पश्चिम बंगाल


Click for answer

A. दिल्ली

4. मुंबईच्या सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आल्याने खालीलपैकी कोणास राज्यमंत्रीपद मिळाले ?

A. आदेश बांदेकर
B. मिलिंद नार्वेकर
C. संजय राऊत
D. शिशिर शिंदे


Click for answer

A. आदेश बांदेकर

5. सॅव्ही वुमन एम्पॉवरमेंट पुरस्कार सोहळ्यात 'आउटस्टेंडिंग कॉन्ट्रिब्युशन इन फिल्म्स' ह्या पुरस्काराने कोणत्या मराठी अभिनेत्रीला सम्मानित करण्यात आले ?

A. क्रांती रेडकर
B. सई ताम्हणकर
C. अमृता खानविलकर
D. सोनाली कुलकर्णी


Click for answer

B. सई ताम्हणकर

सॅव्ही पुरस्कार मिळणारी ती मराठीतली पहिली अभिनेत्री आहे.

6. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल ह्यांना शेरेबाजी आणि असभ्य वर्तनाला सामोरे जावे लागल्याने महिला सुरक्षतेचा मुद्द पुन्हा चर्चेला आला. अनुप्रिया पटेल या कोणत्या खात्याच्या राज्यमंत्री आहेत ?

A. पंचायती राज
B. वाणिज्‍य एवं उद्योग (स्‍वतंत्र प्रभार)
C. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण
D. वस्त्र


Click for answer

C. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण

7. कोणत्या देशातील ओसाका शहराला नुकताच 6.1 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला ?

A. दक्षिण कोरिया
B. जपान
C. चीन
D. मंगोलिया


Click for answer

B. जपान

8. आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी आता खालीलपैकी कोण बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत ?

A. संदीप पांडे
B. संदीप पटेल
C. संदीप बक्षी
D. संदीप महाजन


Click for answer

C. संदीप बक्षी

आयसीआयसीआय बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी बक्षी यांची संचालक आणि मुख्य परिचालन अधिकारीपदी नियुक्ती केली. त्यामुळे आता आयसीआयसीआय प्रुडेंशिअलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी संचालक पदावर कार्यरत असलेले बक्षी 19 जूनपासून बँकेचे सीओओ पद सांभाळतील.

व्हिडिओकॉन उद्योग समुहाला दिलेल्या कर्ज प्रकरणावरुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांच्या जागी आता संदीप बक्षी हे बँकेचे नवे पूर्णवेळ संचालक असणार आहेत.

9. बीसीसीआयने कोणत्या नवीन रणजी संघाला मान्यता दिली आहे ?

A. उत्तराखंड
B. मणिपूर
C. अरुणाचल प्रदेश
D. सिक्कीम


Click for answer

A. उत्तराखंड

उत्तराखंड क्रिकेट संघटनेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये असणारे वाद आता मिटले आहेत. यानंतर सर्वानुमते उत्तराखंडच्या रणजीमधील सहभागाला हिरवा कंदील दर्शवला आहे.

याआधी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मेघालय या 5 राज्यांनी आगामी रणजी करंडक स्पर्धेत आपला स्वतंत्र संघ उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात रणजी क्रिकेट स्पर्धा रंगतदार होण्याची शक्यता आहे .

10. श्रीलंकन क्रिकेट संघाचा कर्णधार असलेल्या कोणावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करण्यात आला आहे ?

A. धनंजय डिसिल्वा
B. रंगना हेराथ
C. दिमुथ करुणारत्ने
D. दिनेश चंडीमल


Click for answer

D. दिनेश चंडीमल