चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -13 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. संपूर्णपणे सौर उर्जेवर अवलंबून असणारा भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मान कोणत्या विमानतळाने पटकाविला ?
A. कोचीन
B. बेंगळूरू
C. हैदराबाद
D. मुंबई
Click for answer
A. कोचीन
केरळ राज्यातील कोचीन येथे असणारा आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्णपणे सौर उर्जेवर अवलंबून असणारा भारतातीलच नाही, तर जगातील पहिला विमानतळ ठरला आहे. पर्यावरणावर 'कार्बन फुट प्रिंट' कमी करण्याच्या उद्देशाने केले गेलेले हे परिवर्तन कौतुकास्पद आहे.
2. रक्तदात्यांची संख्या वाढवून त्यांना रक्तदानाकरिता प्रोत्साहित करण्याकरता दरवर्षी कोणता दिवस जागतिक ऐच्छिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो ?
A. 4 जून
B. 10 जून
C. 14 जून
D. 18 जून
Click for answer
C. 14 जून
3. इन्स्टंट मेसेजिंग अॅपमधील पहिल्या सेवांपैकी एक असलेली कोणती सेवा 17 जुलै रोजीबंद होणार आहे ?
A. अॅलो' (Allo)
B. याहू मेसेंजर
C. हाइक
D. एमएसएन मेसेंजर
Click for answer
B. याहू मेसेंजर
तिला पर्याय म्हणून याहू कंपनी नवीन अॅप आणणार असून सध्याची सेवा बंद झाल्यावर नवीन अॅप वापरकर्त्यांना उपलब्ध होणार आहे. या सेवेने गेल्या मार्च महिन्यात 20 वर्षे पूर्ण केली होती.
4. संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे ?
A. 1 जून
B. 11 जून
C. 21 जून
D. 25 जून
Click for answer
C. 21 जून
यावर्षी होणाऱ्या चौथ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सर्व शाळांमध्ये योग दिन साजरा करण्याच्या सूचना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय कार्यालयामध्येही आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
5. आध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांनी दुर्दैवीरित्या आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. त्यांना अलिकडेच कोणत्या राज्य सरकारने राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल केला होता ?
A. मध्यप्रदेश
B. महाराष्ट्र
C. उत्तरप्रदेश
D. गुजरात
Click for answer
A. मध्यप्रदेश
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजसेवा या क्षेत्रात त्यांचं मोठं काम होतं. सोलापूर ते पंढरपूरमध्ये राहणाऱ्या सेक्स वर्करच्या 51 मुलांना त्यांनी आपली मुलं म्हणून स्विकारलं होतं. बुलडाण्यात खामगावमध्ये आदिवाशींच्या 700 मुलांसाठी त्यांनी शाळा देखील बनवली.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं उपोषण सोडवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेसच्या काळात झालेल्या या आंदोलनात मध्यस्थाची भूमिका त्यांनी पार पाडली होती. अण्णा हजारेंनी भय्यूजींच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण सोडलं होतं. यामुळे भय्यूजी महाराज चर्चेत आले होते.
6. 'डिफेन्स इनोव्हेशन हब' महाराष्ट्रात कोठे साकारणार आहे ?
A. नाशिक
B. नागपूर
C. पुणे
D. जळगाव
Click for answer
A. नाशिक
संरक्षण अन् हवाई उत्पादन क्षेत्रातील उत्पादनामधील संशोधनाला चालना मिळावी म्हणून नाशिकमध्ये "डिफेन्स इनोव्हेशन हब'ची निर्मिती करण्यात येणार आहे.
7. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्ष पदाला अलीकडेच राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पदावर कोण कार्यरत आहे ?
A. डॉ. अतुल भोसले
B. डॉ. रणजित पाटील
C. मदन येरावार
D. विजय देशमुख
Click for answer
A. डॉ. अतुल भोसले
8. स्वीटी बुरा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. नेमबाजी
B. बॉक्सिंग
C. तिरंदाजी
D. कुस्ती
Click for answer
B. बॉक्सिंग
भारतीय बॉक्सर स्वीटी बुरा हिने रशियात आयोजित बॉक्सिंग स्पर्धेत मंगळवारी सुवर्ण जिंकले. स्वीटीने मिडलवेट (75 किलो) गटाच्या अंतिम सामन्यात अॅना अनफिनोजिनोवा हिच्यावर विजय मिळविला.
9. जागतिक पर्यावरण दिनी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत देशातील 19 राज्यातील 48 नद्या व समुद्र किनार्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. ह्यात महाराष्ट्रातील कोणत्या नद्यांचा समावेश आहे ?
A. भीमा, गोदावरी
B. कृष्णा, मुळा-मुठा
C. गोदावरी, कृष्णा
D. गोदावरी, प्राणहिता
Click for answer
B. कृष्णा, मुळा-मुठा
कृष्णा, मुळा-मुठा नद्या आणि मिर्या व गणपतीपुळे समुद्र किनार्यांचा समावेश या मोहिमेत आहे. स्वच्छता मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या नद्या, समुद्र किनारे, तलावांना स्वच्छ करण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रूपये खर्च करण्यात आले. ही मोहिम 15 मे पासून सुरू करण्यात आली असून ती 5 जूनपर्यंत राबविली गेली.
मुळा-मुठा, कृष्णा (महाराष्ट्र), गोदावरी (आंध्र प्रदेश), मांडवी (गोवा), साबरमती, तापी (गुजरात), पेन्नारा, कावेरी (कर्नाटक), ब्रम्हपुत्रा (केरळ), नर्मदा (मध्यप्रदेश), महानदी (उडीसा), सतलज (पंजाब), राणी चु (सिक्कीम), वाई गयी (तामिळनाडु), मुसी (तेलगंना), कानपूर गंगा, वाराणसी गंगा (उत्तरप्रदेश), गंगा (उत्तराखंड), गंगा (बिहार), बियास, सतलज (हिमाचल प्रदेश), हुगली (पश्चिम बंगाल), चंबळ कोटा (राजस्थान), घग्गर (हरीयाणा) या नद्यांचा यात समावेश होता.
10. शंभर वर्षातील सर्वात मोठं चंद्रग्रहण कोणत्या दिवशी दिसणार आहे ?
A. 27 जून 2018
B. 27 जुलै 2018
C. 27 ऑगस्ट 2018
D. 27 सप्टेंबर 2018
Click for answer
B. 27 जुलै 2018
चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या अगदी मध्यातून जाणार असल्याने हे चंद्रग्रहण सर्वात मोठं असणार आहे. याला ‘उंबर’ म्हणतात.
पृथ्वी आणि चंद्राचं स्थान देखील यात महत्वाची भूमिका बजावेल. चंद्र एका विशिष्ट स्थानात असताना पृथ्वी सूर्यापासून अगदी दूरच्या बिंदूवर असेल. त्यामुळे होणार असं की, पृथ्वीला चंद्रावर जास्त मोठी सावली पाडता येईल आणि चंद्रग्रहणाचा कालावधी वाढेलअसाच चंद्रग्रहणाचा प्रसंग 16 जुलै 2000 साली आला होता. त्यावेळी 47 मिनिटापर्यंत चंद्रग्रहण पाहता आलं होतं.
यानंतर 18 वर्षांनी होणारं चंद्रग्रहण सर्वात मोठं असणार आहे. यावेळी हे ग्रहण तब्बल 1 तास 43 मिनिट बघता येईल.
Newer Post
Older Post
Home