चालू घडामोडी
चालू घडामोडी प्रश्नमंजुषा -14 जून 2018
2018 मधील चालू घडामोडी वर आधारित.
2018 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त मालिका
1. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे यावर्षीपासून साहित्यसेवा कृतज्ञता पुरस्कार दिला जाणार असून हा पहिला पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?
A. किर्ती शिलेदार
B. भालचंद्र नेमाडे
C. कविता महाजन
D. प्रा. द. मा. मिरासदार
Click for answer
D. प्रा. द. मा. मिरासदार
2. आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांना राज्यसरकारने पेन्शन जाहीर केली आहे. भारतात आणीबाणी कधी लागू करण्यात आली होती ?
A. 1948-1950
B. 1962-1965
C. 1971-1975
D. 1975-1977
Click for answer
D. 1975-1977
25 जून 1975 पासून लागू झाली. मार्च 1977 सालच्या लोकसभा निवडणुकांनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आली.
निर्णयानुसार, आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अडीच हजार पेन्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
3. युरोपीय महासंघाची सीमा ओलांडणाऱ्या एका गाईला जीवनदान देण्याची घोषणा कोणत्या देशाने केल्याने सदर गाय चर्चेत आहे ?
A. सर्बिया
B. बल्गेरिया
C. स्वित्झर्लंड
D. पोलंड
Click for answer
B. बल्गेरिया
चरता चरता युरोपीय महासंघाची सीमा ओलांडणाऱ्या एका गाईला जीवनदान देण्याची घोषणा बल्गेरिया या देशाने केली आहे.
ही गाय बल्गेरियाची सीमा ओलांडून सर्बियात गेली होती. पेंका असे या गाईचे नाव आहे. बल्गेरियातील माझाराचेव्हे या गावातून 12 मे रोजी ती चरत असताना तिने सर्बियात प्रवेश केला होता. तेथील गावकऱ्यांनी तिच्या कानावरील खुणांवरून तिला ओळखले होते व दोन आठवड्यांनी तिला बल्गेरियात परत आणण्यात आले होते. मात्र तिच्यात काही रोग असण्याच्या संशयावरून तिला मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.
4. दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. हा महान खेळाडू कोणत्या देशाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला ?
A. न्यूझीलंड
B. ऑस्ट्रेलिया
C. इंग्लंड
D. वेस्ट इंडीज
Click for answer
A. न्यूझीलंड
हेडली हे जगातील वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये 400 हून अधिक विकेट घेणारे हेडली हे पहिले खेळाडू आहेत. 1990 साली त्यांनी क्रिकेटमधून संन्सास घेतला. हेडली यांनी 86 टेस्टमध्ये 22.29 या सरासरीने 431 विकेट्स घेतल्या आहेत.
5. 2026 चा फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद कोणाला प्राप्त झाले आहे ?
A. मेक्सिको
B. कॅनडा
C. अमेरिका
D. वरील तीनही
Click for answer
D. वरील तीनही
2026 च्या वर्ल्ड कपच्या यजमानपदाची संधी मेक्सिको, कॅनडा आणि अमेरिकेला देण्यात आली आहे.
फिफाचे अध्यक्ष जिआनी इन्फेंटिनो.
आफ्रिकेतील मोरोक्कोदेखील वर्ल्ड कप यजमानपदाच्या शर्यतीत होता.
अमेरिकेनं 1994 मध्ये फिफा वर्ल्ड कपचं यजमानपद भूषवलं होतं. त्यावेळी पहिल्यांदाच अमेरिकन संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
2026 चा वर्ल्डकप आतापर्यंतचा सर्वात मोठा वर्ल्डकप ठरणार आहे. या वर्ल्डकपमध्ये 48 देश सहभागी होणार असून 34 दिवस चालणाऱ्या या वर्ल्डकपमध्ये 80 सामने होणार आहेत. यातील 60 सामने अमेरिकेत तर प्रत्येकी 10 सामने मेक्सिको आणि कॅनडात होणार आहेत.
2022 च्या वर्ल्ड कपचे यजमानपद कतार भूषवणार आहे.
6. मनिका बत्रा ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. टेबल टेनिस
B. बुध्दिबळ
C. मुष्ठीयुध्द
D. कुस्ती
Click for answer
A. टेबल टेनिस
क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी सुरु केलेलं हे फिटनेस चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, मनिका बत्रा आणि सर्व आयपीएस अधिकारी यांना हे फिटनेस चॅलेंज दिले.
मोदींनी केलेल्या ह्या आवाहनामुळे मनिका बत्रा हिचे नाव सद्या चर्चेत आहे. 21 व्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये टेबल टेनिसच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये चार पदक तिने इतिहास रचला. कॉमनवेल्थ खेळांमध्ये हा कारनामा करणारी ती पहिली भारतीय महिला टेबल टेनिस खेळाडू ठरली.
7. राष्ट्रपति राम नाथ कोविंद कधी 'सोलर चरखा मिशन'ची सुरुवात करणार आहेत ?
A. 15 जून
B. 19 जून
C. 23 जून
D. 27 जून
Click for answer
D. 27 जून
या मिशन अंतर्गत 50 क्लस्टरला दोन वर्षाकरिता 550 कोटींची सबसिडी दिली जाणार आहे. जवळपास 5 कोटी महिलांना या योजनेशी जोडण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त सेल्फ हेल्प ग्रुपला देखील या योजनेशी जोडले जाणार आहे. एका क्लस्टरमध्ये 400 ते 2 हजार लोकांचा सहभाग असणार आहे.
8. सौम्या स्वामीनाथन ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बुद्धीबळ
B. टेबल टेनिस
C. लॉन टेनिस
D. बॅडमिन्टन
Click for answer
A. बुद्धीबळ
भारताची अव्वल बुद्धीबळपटू सौम्या स्वामीनाथनने इराणमध्ये होणाऱ्या चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे. बुरखा आणि हिजाब परिधान करण्याचा नियम म्हणजे मानवाधिकाराचं उल्लंघन असल्याचं सांगत तिने चॅम्पियनशिपमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
9. मॅकडोनिया या देशाचे नवीन नाव काय असणार आहे ?
A. फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया
B. रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया
C. द ग्रेट मॅकडोनिया
D. मेसोपोटेमिया
Click for answer
B. रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया
मॅकडोनिया आणि ग्रीस यांच्यातील यशस्वी बोलणी झाल्यामुळे सुमारे 27 वर्षांनंतर शांतता प्रस्थापित होण्याची पहिल्यांदाच वेळ आली आहे.
मॅकडोनिया हा देश ग्रीसच्या उत्तरेस आहे. फॉर्मर युगोस्लाव रिपब्लिक ऑफ मॅकडोनिया हा देश त्याच्या लांबलचक नावातील प्रत्येक शब्दाच्या आद्याक्षरावरुन एफवायआरओएम किंवा मॅकडोनिया नावाने ओळखला जायचा. याशिवाय, मॅकडोनिया हे नाव ग्रीसच्या उत्तर प्रांताचे नाव होते. हेच नाव 1991 साली तयार झालेल्या नव्या देशाने घेतल्याने ग्रीक लोक संतप्त झाले होते. मॅकडोनियातील राजधानीमधील विमानतळाला ग्रीकमधील प्राचीन योद्धा अलेक्झांडर द ग्रेटचे नाव दिल्याने ही परिस्थिती अधिकच चिघळली होती.
मॅकडोनियाला युरोपियन युनियन आणि नाटोमध्ये प्रवेश देण्यास ग्रीसने विरोध केला होता.
संयुक्त राष्ट्राने अनेकवेळेस मध्यस्थी करुन चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे फलित म्हणून आता हा देश रिपब्लिक ऑफ नॉर्थ मॅकडोनिया नावाने ओळखला जाईल.
ग्रीसचे पंतप्रधान अलेक्सीस त्सायप्रस.
मॅकडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव
10. रिअल माद्रिद या स्पेनमधील बलाढ्य फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदावरून फ्रान्सचा सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू झिनेदिन झिदानने राजीनामा दिल्यावर त्या जागी कोणाची नियुक्ती झाली आहे ?
A. ज्युलन लॉपितेगी
B. इर्नेस्टो व्हेलवेर्डे
C. फ्रॅंक रायकार्ड
D. युनी इमरी
Click for answer
A. ज्युलन लॉपितेगी
स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे 51 वर्षीय प्रशिक्षक ज्युलन लॉपितेगी यांची नियुक्ती रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावर होणार आहे. रशियामधील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या समाप्तीनंतर लॉपितेगी राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होऊन रिअल माद्रिदची धुरा हाती घेतील.
Newer Post
Older Post
Home